शिवसेना नेत्याची भरदिवसा गोळ्या झाडून हत्या; मंदिरासमोर सुरू होतं उपोषण

गोपाळ मंदिराबाहेरील कचऱ्यात देवांच्या मूर्ती सापडल्याच्या निषेधार्थ शिवसेनेचे नेते मंदिराबाहेर धरणे धरून बसले होते.
शिवसेना नेत्याची भरदिवसा गोळ्या झाडून हत्या; मंदिरासमोर सुरू होतं उपोषण

शिवसेना नेते सुधीर सुरी यांची अमृतसरमध्ये शुक्रवारी भरदिवसा गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. गोपाळ मंदिराबाहेरील कचऱ्यात देवांच्या मूर्ती सापडल्याच्या निषेधार्थ शिवसेनेचे नेते मंदिराबाहेर धरणे धरून बसले होते. यादरम्यान गर्दीतून कोणीतरी त्यांच्यावर दोन गोळ्या झाडल्या.यातच त्यांचा मृत्यू झाला आहे.

सुधीर सुरी हे उपोषणाला बसले असताना गर्दीतून दोघांनी येऊन त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. जखमी अवस्थेत त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. जिथे त्याचा मृत्यू झाला. सुधीर सुरी हे खलिस्तान समर्थकांच्या निशाण्यावर होते. काही काळापूर्वी त्यांच्या हत्येचा कट रचण्यात आल्याचं देखील उघड झालं होतं. जे परदेशात बसलेल्या खलिस्तान समर्थकांनी रचला होता, असं बोललं जात आहे.

त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याचबरोबर हल्लेखोरांना पकडण्यासाठी पोलिसांनी नाकाबंदी सुरू केली आहे.सुधीर सुरी हे शिवसेना हिंदुस्थानचे प्रमुख राहिले आहेत. त्यांच्यावर दोन ते तीन गोळ्या झाडण्यात आल्या आहेत. काही काळापासून सुधीर सुरीवर हल्ला करण्याची योजना आखली जात असल्याची माहिती आहे. पोलिसांनी गेल्या महिन्यात काही लोकांना अटकही केली होती. चौकशीत आरोपीने हा खुलासा केला होता.

पोलिसांनी 4 गुंडांना अटक केली होती

पंजाबमध्ये, एसटीएफ आणि अमृतसर पोलिसांनी गेल्या महिन्यात 23 ऑक्टोबर रोजी संयुक्त कारवाईत 4 गुंडांना अटक केली होती. अटक करण्यात आलेले गुंड हे रिंडा आणि लिंडा यांचे गुंड होते. त्यांच्या चौकशीत खळबळजनक खुलासे समोर आले आहेत. अटक करण्यात आलेले गुंड शिवसेना नेते सुधीर सुरी यांच्यावर हल्ल्याचा कट रचत होते. त्यासाठी त्यांनी रेकीही केली होती.

गुन्हा घडण्यापूर्वीच पोलीस आणि एसटीएफने चौघांना पकडले. सुरीवर हल्ला दिवाळीपूर्वी करायचा होता, अशी कबुलीही आरोपींनी दिली होती. या गॅंगस्टर्सना पकडल्याने पंजाबमधील मोठी दुर्घटना टळली होती. पण आता माहिती मिळत आहे की, सुधीर सुरी यांच्यावर दोन हल्लेखोरांनी हल्ला केला होता. त्यापैकी एकाला पोलिसांनी अटक केली असून त्याचं संदीप असे नाव आहे. तर दुसरा हल्लेखोर फरार झाला आहे, अशी माहिती मिळत आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in