Sharad Pawar: ‘C-Voterचा सर्व्हे खरं चित्र दाखवणारा,’ पवारांचंही मोठं भाकीत

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Sharad Pawar while reacting to the India Today-C Voter survey: कोल्हापूर: India Today-C Voter ने केलेल्या सर्व्हेनंतर महाराष्ट्रातील (Maharashtra) राजकारण पुन्हा एकदा ढवळून निघतं आहे. सर्व्हेनुसार आज घडीला लोकसभेच्या निवडणुका (Loksabha Election) झाल्या तर भाजप (bjp) प्रणित NDA ला महाराष्ट्रात मोठा धक्का बसू शकतो. त्यामुळे आता य सर्व्हेनंतर वेगवेगळ्या प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी आज (28 जानेवारी) कोल्हापूरमध्ये (Kolhapur) बोलताना सी-व्होटरचा सर्व्हे हा देशातील सत्तेविरुद्ध खरं चित्र दाखवणारा असल्याचं म्हटलं आहे. (c voters survey will show the true picture sharad pawar also made a big prediction)

महाराष्ट्रात साधारण सहा महिन्यांपूर्वी एकनाथ शिंदेंनी केलेल्या बंडानंतर सत्तांतर झालं. मात्र, त्यानंतर लोकसभा निवडणुकीसाठी करण्यात आलेल्या सी-व्होटरच्या सर्व्हेतून धक्कादायक माहिती समोर आली. ज्यानंतर राजकीय वर्तुळातून वेगवेगळ्या चर्चा समोर येत आहे. याच सर्व्हेबाबत जेव्हा शरद पवारांना विचारणा करण्यात आली तेव्हा त्यांनी असं म्हटलं की, देशातील सत्ताधाऱ्यांविरोधात जनमत आहे.

Mood of the Nation : महाराष्ट्र BJPची झोप उडवणारा कौल, MVA मारणार मुसंडी!

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

पाहा शरद पवार नेमकं काय म्हणाले:

‘तो सर्व्हे मी देखील वाचला. त्यामध्ये साधारणत: स्वच्छ असं दिसतंय की, आज जो सत्ताधारी पक्ष आहे देशामध्ये.. त्याच्याविरुद्ध जनमत आहे. तसंच महाराष्ट्रात जी आकडेवारी आहे ती आकडेवारी सत्ताधारी पक्षाच्या हातून सत्ता जाईल असं दिसणारी आहे. अर्थात हा सर्व्हे आहे. या एजन्सीचे यापूर्वीचे सर्व्हे आपण पाहिले 10 वर्षांपूर्वीचे, पाच वर्षांपूर्वीचे.. तर ही जी एजन्सी आहे त्यांची अचूकता बऱ्याचदा सिद्ध झाली आहे. पण मी एकदम त्याच्यावर जाणार नाही. एक दिशा त्यांनी दाखवलेली आहे. ती दिशा सत्ताधारी पक्षाला सोयीची नाही असं दिसतंय.’

‘काँग्रेसच्या जागा देशात वाढतील असं दिसतंय. उदा. कर्नाटकचा सर्व्हे वेगळा आहे. त्याची माहिती आम्ही अधिक घेतली. त्यात आम्हाला स्वच्छ असं दिसतंय की, कर्नाटकमध्ये भाजपची सत्ता राहणार नाही. लोक त्या ठिकाणी परिवर्तनाला उत्सुक आहेत. असं चित्र कदाचित अनेक ठिकाणी असू शकेल. पण उत्तर प्रदेश हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. त्याची निश्चित माहिती आमच्याकडे नाही.’

ADVERTISEMENT

‘सध्या विरोधी पक्षांना एकत्र आणण्याचे आमचे प्रयत्न आहेत. मी स्वत:ही काही लोकांशी बोलतोय. पण काही ना काही स्थानिक अडचणी आहेत. उदा. केरळ.. केरळमध्ये डावे आणि एनसीपी एकत्र येऊन आमचं सरकार आहे. पण आमचा तिथे मुख्य विरोधक हा काँग्रेस आहे. अशा अडचणी आम्हाला दूर कराव्या लागतील.’ असं म्हणत शरद पवार यांनी राज्यात एनडीए विरोधात वातावरण असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.

ADVERTISEMENT

Mood Of the Nation: देशाच्या राजकारणाची दिशा बदलणारा सर्व्हे

महाराष्ट्राबाबत India Today-C Voter चा नेमका सर्व्हे काय होता?

आजघडीला लोकसभेच्या निवडणुका झाल्या, तर महाराष्ट्रातील निकाल काय असतील? महाराष्ट्रात महाविकास आघाडी वरचढ ठरेल की, भाजपप्रणित एनडीए याबद्दल इंडिया टुडे-सी व्होटरने केलेल्या सर्वेक्षणातील आकडेवारी भाजपची चिंता वाढवणारी आहे तर महाविकास आघाडी दिलासा देणारी आहे.

आज लोकसभेच्या निवडणुका झाल्या तर महाराष्ट्रात NDA आणि UPA ला किती जागा मिळतील?

इंडिया डुटे-C वोटरने केलेल्या सर्व्हेनुसार जर आज लोकसभेच्या निवडणुका झाल्या तर महाराष्ट्रात NDA (भाजप, शिंदे गट आणि RPI) ला फक्त 14 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर UPA (मविआ) ला तब्बल 34 जागा मिळू शकतात. अशी माहिती सर्व्हेतून समोर आली आहे.

India Today च्या सर्व्हेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?

दुसरीकडे याच सर्व्हेबाबत जेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना (CM Eknath Shinde)यांना जेव्हा विचारणा करण्यात आली तेव्हा त्यांनी हा अंदाज निवडणुकांमध्ये चुकीचा ठरेल अशी प्रतिक्रिया दिली होती.

‘खरं म्हणजे मूठभर लोकांमधून सर्व्हे केल्यानंतर वस्तुस्थिती समोर येत नाही. माझ्याकडे आकडे आहेत. देशभरातील किती लोकांना भेटून हा सर्व्हे केलाय. मी त्या आकड्यांमध्ये जाऊ इच्छित नाही. परंतु मूठभर लोकांमधून सर्व्हे करून खरे आकडे, वस्तुस्थिती मांडता येणार नाही. वास्तव लोकांसमोर आणता येणार नाही.’

‘कोणाला हर्षवायू झाला असेल तर मी त्यांचा आनंद हिरावून घेऊ इच्छित नाही. दीड वर्ष असाच आनंद व्यक्त करू. त्यामुळे निवडणुकांची भीती आम्हाला नाही. येणारा काळच तुमच्या या सर्व्हेच्या अंदाजाला उत्तर देईल.’ अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी दिली होती.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT