'पराचा कावळा करू नका'; चंद्रकांत पाटील सुप्रिया सुळेंबद्दलच्या विधानावर ठाम

'दिल्लीत जा, नाही तर मसणात जा', असं विधान चंद्रकांत पाटील यांनी सुप्रिया सुळेंबद्दल बोलताना केलं होतं
'पराचा कावळा करू नका'; चंद्रकांत पाटील सुप्रिया सुळेंबद्दलच्या विधानावर ठाम

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केलं होतं. या विधानावरून टीका झाल्यानंतर पाटील यांनी त्यांची भूमिका स्पष्ट करत विरोधकांना उत्तर दिलं.

चंद्रकांत पाटील यांनी आज मुंबईतील भाजपच्या प्रदेश कार्यालयात माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं.

'पराचा कावळा करू नका'; चंद्रकांत पाटील सुप्रिया सुळेंबद्दलच्या विधानावर ठाम
चंद्रकांत पाटील सुप्रिया सुळेंना म्हणाले, 'घरी जा स्वयंपाक करा', सदानंद सुळे संतापले

प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ओबीसी आरक्षणावरून खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर टीका केली होती. टीका करताना 'दिल्लीत जा, नाही तर मसणात जा. तुम्ही घरी घरी जा, स्वयंपाक करा', असं विधान पाटील यांनी केलं होतं. त्यावरून त्यांच्यावर टीका होत आहे.

या विधानावर खुलासा करताना पाटील म्हणाले, 'महाविकास आघाडी सरकार तिहेरी चाचणी पूर्ण करून ओबीसी राजकीय आरक्षण पुन्हा मिळवत नाही, याचा संताप व्यक्त करताना आपण राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याविषयी ग्रामीण पद्धतीनं बोललो. ज्या ओबीसी समाजाच्या प्रेमातून हा सात्विक संताप व्यक्त केला, त्यांना त्यामुळे आनंदच झाला. यामध्ये सुप्रिया सुळे किंवा कोणत्याही महिलेचा अनादर करण्याचा मुद्दा नाही. आपण जे मत व्यक्त केले त्याबाबतीत पराचा कावळा करू नये,' असं पाटील म्हणाले.

'पराचा कावळा करू नका'; चंद्रकांत पाटील सुप्रिया सुळेंबद्दलच्या विधानावर ठाम
सुप्रिया सुळेंनी डिवचताच चंद्रकांत पाटलांनी दिला घरी जाण्याचा सल्ला

भाजप तिसरा उमेदवार उतरवणार?

राज्यात राज्यसभेच्या निवडणुकीसाठी राजकीय हालचाली सुरू आहेत. सहाव्या जागेसाठी शिवसेनेनं संजय पवार यांना उमेदवारी दिली आहे. याबद्दल पाटील म्हणाले, 'शिवसेनेने या निवडणुकीत काय करावे हा त्या पक्षाचा प्रश्न आहे. परंतु, राज्यसभा निवडणुकीत प्राधान्यक्रमाच्या मतदानाच्या पद्धतीमुळे दोन उमेदवार लढविण्याच्या प्रयत्नात कधी कधी मूळ उमेदवार पराभूत होतो, हे ध्यानात घ्यावे,' असं ते म्हणाले.

'भाजपच्या केंद्रीय नेतृत्वानं आदेश दिला, तर प्रदेश भाजप राज्यसभेची तिसरी जागा लढवेल आणि जिंकेलही. भाजपचं विधानसभेतील संख्याबळ ध्यानात घेता राज्यसभा निवडणुकीत पक्षाचे दोन उमेदवार सहज निवडून येतात. त्याखेरीज अतिरिक्त मतांच्या जोरावर भाजपा तिसरी जागा लढवून जिंकू शकते. या निवडणुकीच्या बाबतीत पक्षाचे केंद्रीय नेतृत्व निर्णय घेत असल्याने त्यांच्या सूचनेनुसार पुढील कारवाई होईल,' असं पाटील यांनी स्पष्ट केलं.

परबांवरील ईडीच्या कारवाईबद्दल चंद्रकांत पाटील म्हणाले,'केंद्रीय तपास यंत्रणा संविधानाच्या चौकटीत स्वतंत्रपणे काम करत आहेत. त्याविषयी आपण टिप्पणी करणार नाही.'

'तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर कारवाई होत नसल्याचे पाहून जयश्री पाटील उच्च न्यायालयात गेल्या. त्यांच्या अर्जाच्या आधारावर उच्च न्यायालयाने सीबीआय चौकशीचा आदेश दिला व कारवाई झाली हे विसरता येणार नाही. न्यायालयाचा दरवाजा सर्वांसाठी खुला आहे. केंद्रीय यंत्रणांकडून होणाऱ्या कारवाईबाबत शिवसेनेला काही गैर वाटत असेल तर त्यांनी न्यायालयाकडे दाद मागावी,' असा सल्ला पाटील यांनी शिवसेनेला दिला.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in