Chhagan Bhujbal:'जग्गजेता विश्वनाथन आनंद अमित शाह यांच्यासोबत बुद्धीबळ खेळत नाही'

राहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्ष झाल्यानंतर छगन भुजबळ यांनी हा किस्सा सांगितला ज्यानंतर हा हशा पिकला
Chhagan bhujbal Says Viswanathan anand never play chess with amit shah he told joke during assembly session
Chhagan bhujbal Says Viswanathan anand never play chess with amit shah he told joke during assembly session(फाइल फोटो)

महाराष्ट्र विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलवलं गेलंय. रविवारी विधानसभेच्या अध्यक्षपदाची निवडणूक पार पडली. या निवडणुकीत राहुल नार्वेकर जिंकून आले. त्यांना बहुमतापेक्षा जास्त मतं मिळाली. त्यांचं सगळ्यांनी अभिनंदनही केलं. अजित पवार यांचं भाषण चांगलंच गाजलं. याचवेळी विधानसभाच्या अधिवेशनात छगन भुजबळ यांनी मोबाईलवर एक मेसेज वाचून दाखवला ज्यामुळे सभागृहात एकच हशा पिकला.

काय म्हणाले छगन भुजबळ?

जगातल्या सर्व खेळाडूंचा पराभव करणारे भारतीय बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंद यांना देशाचे गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत बुद्धिबळाचा डाव खेळणार का? हे विचारलं गेलं. त्यावर विश्वनाथन आनंद यांनी नकार दिला. त्यांना कारण विचारलं असता विश्वनाथन आनंद म्हणाले की अमित शाह एकच डाव टाकतात त्यानंतर सोंगट्या कुठे जातात सांगता येत नाही. त्यामुळे मी अमित शाह यांच्यासोबत बुद्धिबळ खेळत नाही. असं म्हणत छगन भुजबळ यांनी अमित शाह यांना टोला लगावला.

माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत खुमासदार भाषण केलं. त्यात त्यांनी एकनाथ शिंदे तसंच देवेंद्र फडणवीस यांना आपल्या खास शैलीत चिमटेही काढले. त्यांच्यानंतर बाळासाहेब थोरात भाषण करणार होते. मात्र छगन भुजबळ यांना रहावलं नाही. त्यांनी मधेच उभं राहून अध्यक्षांच्या संमतीने अमित शाह आणि विश्वनाथन आनंद यांचा जोक वाचून दाखवला ज्यानंतर सभागृहात एकच हशा पिकला.

महाविकास आघाडी सरकार पडल्यानंतर पुढचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होतील याच चर्चा होत्या. ३० जूनला दुपारी ३ वाजेपर्यंत हीच चर्चा रंगली होती. मी पुन्हा येईनचे व्हीडिओही व्हायरल झाले होते. मात्र देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे हे पुढचे मुख्यमंत्री असतील हे जाहीर केलं. त्यानंतर सगळ्यांनाच धक्का दिसला. या धक्कातंत्राचा वापर केल्याचा उल्लेख अजित पवार यांनी केला तसंच खुमासदार चिमटे काढले. त्यानंतर छगन भुजबळ यांनी जो जोक सांगितला त्यानंतर सभागृहात हशा पिकला.

काय म्हटलं आहे अजितदादांनी?

आमचं सरकार पडल्यानंतर आम्हाला हे वाटलं होतं की देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील आणि एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री होतील. मात्र देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होतील हे जाहीर केल्यानंतर पत्रकार परिषदेत पिनड्रॉप सायलेन्स होता. भाजपची काही मंडळी तर रडायला लागली. गिरीश महाजन यांचं रडणं बंद होईना. फेटा बांधायला दिला तर डोळ्याचा पाणी पुसायला तो त्यांनी वापरला. भाजपच्या आमदारांनीच सांगावं हे कसं काय झालं?

एकनाथ शिंदे यांनी मला जर कानात सांगितलं की अडीच वर्षे झाली आहेत आता मला मुख्यमंत्रीपदावर बसायचं आहे तर मी उद्धव ठाकरेंशी बोलून तुम्हाला तिथे बसवलं असतं. अजित पवारांनी हे वाक्य उच्चारताच एकच हशा पिकला.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in