मुख्यमंत्री एकनाथ शिंदे Exclusive: समृद्धी महामार्गाला उद्धव ठाकरेंचाच विरोध होता?

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

समृद्धी महामार्गाचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. हा प्रकल्प सुरू करण्यात आला तेव्हा एकनाथ शिंदे हे नगरविकास मंत्री होते. आता ते नगरविकास मंत्री तर आहेतच शिवाय महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीही आहेत. हा प्रकल्प सुरू करताना काय काय अडचणी आल्या? मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मुंबई तकला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं आहे. मुंबई तकचे संपादक साहिल जोशी यांनी ही मुलाखत घेतली.

साहिल जोशी:समृद्धी महामार्ग सुरू करणं हे किती कठीण होतं?

एकनाथ शिंदे: हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग हा नागपूर ते शिर्डी या मार्गाचं लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते ११ डिसेंबरला करण्यात येतं आहे. हे उद्घाटन करत असताना मला खूप आनंद होतो आहे. या समृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव दिलं गेल्याचा मला खूप आनंद आहे. आनंद आणि अभिमान यासाठी वाटतो आहे की ज्या वेळी मागच्या सरकारमध्ये म्हणजे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते तेव्हा MSRDC चा मंत्री म्हणून माझ्यावर विश्वास दाखवला. तो प्रकल्प मी इथपर्यंत आणू शकलो याचा आनंद आहे.

आमचं सरकार आता स्थापन झाल्यानंतर पहिल्यांदाच देशाचे पंतप्रधान महाराष्ट्रात येत आहेत. समृद्धी महामार्गाचं उद्घघाटन त्यांच्या हस्ते केलं जातं आहे याचा मला विलक्षण आनंद आहे. हा प्रकल्प सुरू करताना खाचखळगे, अडचणी आल्या तर सुरूवातीला अनेक आव्हानं होती. या प्रकल्पाला विरोधही केला गेला.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

साहिल जोशी: प्रकल्प सुरू करताना दोन प्रकारच्या प्रमुख अडचणी येतात त्यातला पहिला भाग म्हणजे भू संपादन आणि निधी उभा करणं हा असतो तर दुसरा भाग असतो तो राजकीय विरोधाचा. कारण कुठलाही प्रकल्प सुरू करतान सरसकट मंजुरीच मिळते असं नसतं. यावर कशी मात केलीत?

एकनाथ शिंदे: हा प्रकल्प तयार करताना सगळ्यात मोठी अडचण होती ती भूसंपादन हीच. कुठलाही प्रकल्प अस्तित्वात आणताना तो यशस्वी करायचा असेल तर जमीन अधिग्रहण करणं हे वेगाने व्हायला हवं असतं. काही ठिकाणी शेतकऱ्यांचा विरोध होता काही ठिकाणी. विरोध करायला भागही पाडलं जात होतं. कोण होतं त्यात आता मी पडत नाही. अडचणी होत्या, विरोधही काही लोकांनी केला. उद्धव ठाकरेंनी विरोध दर्शवला होता. मला त्यात पडायचं नाही. ज्यांनी विरोध केला त्यांना ते समजून घेत असतील यात एकच आहे. की मी या प्रकल्पाच्या मुळाशी गेलो.

मी शेतकऱ्यांकडे गेलो, योग्य मोबदला दिला. त्यांना हा प्रकल्प किती महत्त्वाचा आहे ते सांगितलं. त्या शेतकऱ्यांना विश्वासच नव्हता की पैसे मिळतील. जमीन दिल्यावर सहजासहजी पैसे मिळत नाहीत. हा त्यांचा अनुभव होता. त्यावरही त्यांची समजूत घातली. RTGS ने पैसे मिळतील ही ग्वाही दिली. मी त्यांना खात्री दिली. पैसे जमा झाल्याचे मला फोनही आले. त्यावेळी विश्वास हळूहळू डेव्हलप होत गेला. भूसंपादनात अडचणी होत्या पण त्या दूर केल्या.

ADVERTISEMENT

समृद्धी महामार्ग हा गेमचेंजर प्रकल्प आहे. कारण हा ७०० किमीचा महामार्ग आहे. नागपूर ते मुंबई आहे. १७ तासांऐवजी सात ते आठ तास म्हणजे जवळपास निम्मं अंतर होणार आहे. हा वर्ल्ड क्लास रस्ता आहे. या रस्त्यावर विमानाच्या स्पीडने गाड्या चालू शकतात पण आपण स्पीड लिमिट १२० ठेवलं आहे. जे शेतकरी त्यांचा माल तीन दिवसांनी पोहचवत होते ते १० ते १२ तासात पोहचवू शकतात. मुंबई ते नागपूर हा रस्ता सुरू झाल्यानंतर खूप फायदा होणार आहे. जेएनपीटीमध्ये कनेक्ट होता येतं. १० जिल्हे, २६ तालुके या हायवेला कनेक्ट होत आहेत. हे या प्रकल्पाचं महत्त्व आहे असंही एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.

ADVERTISEMENT

साहिल जोशी: सध्या शिर्डीपर्यंत आपण हा मार्ग सुरू केला आहे, जेव्हा पार्ट सुरू होईल म्हणजे शिर्डी ते मुंबई महामार्गावरच्या जमिनींच्या अधिग्रहणाचं आव्हान कसं पूर्ण करणार?

एकनाथ शिंदे: मुंबई पर्यंत महामार्ग आणण्यासाठी आमचं काम सुरू झालं आहे. १०० टक्के भू संपादन झालं आहे. शिर्डीच्या पुढे जे कठीण काम आहे जे टनेल आहेत ते वर्षभरात पूर्ण होईल. त्यामुळे कुठलीही अडचण या प्रकल्पात नाही. ११ लाख झाडं आपण या मार्गात लावली आहे त्यामुळे ग्रीन हायवे आहे. वन्य प्राण्यांच्या रक्षणासाठी आम्ही पैसे खर्च केले आहेत. १२०० शेततळी उभारली आहेत. २५० मेगावॅट सोलार एनर्जी जनरेट करणार आहोत. हा रस्ता खऱ्या अर्थाने समृद्धी देणारा आहे असंही एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT