AU विरुद्ध ES वाद तापला : एकनाथ शिंदेंचं संजय राऊतांंच्या आरोपांना प्रत्युत्तर

'त्या' डायरीतील ES म्हणजे कोण? या सवालावरुन राजकारण तापलं
Sanjay Raut and Eknath Shinde
Sanjay Raut and Eknath ShindeMumbai Tak

मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत आणि दिशा सालियन आणि मृत्यू प्रकरणात AU म्हणजे कोण? या प्रश्नावरुन राजकारण तापलं आहे. बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजपकडून AU म्हणजे आदित्य ठाकरे असा आरोप केला आहे. या आरोपांवरुन शिंदे सरकारने दिशा सालियन मृत्यू प्रकणात SIT ची स्थापना करण्याची घोषणा केली आहे.

AU विरुद्ध ES : वाद तापला

AU चा हा वाद ताजा असतानाच ठाण्यातील बिल्डर सुरज परमार यांच्या डायरीतील ES म्हणजे कोण? या सवालावरुन राजकारण तापू लागलं आहे. याच प्रकरणात TV9 मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आणि खासदार अरविंद सावंत यांनी SIT चौकशीची मागणी केली आहे. त्यांच्या मागणीला दुजोरा देत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते संजय राऊत यांनीही SIT चौकशीची मागणी केली आहे.

संजय राऊत काय म्हणाले?

आमचे खासदार अरविंद सावंत यांनी एक विषय मांडला. ठाण्यातील एक बिल्डर 'सुरज परमार' यांच्या आत्महत्येनंतर जी डायरी सापडली त्या डायरीत सांकेतिक नावं आहेत. ती नावं कोणाची आहेत ती आम्हाला माहिती आहेत. लावा त्यांच्याविरोधात एसआयटी चौकशी, असं आव्हान संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिलं आहे.

एकनाथ शिंदेंनी दिलं प्रत्युत्तर :

दरम्यान या आरोपांवर औरंगाबाद येथ बोलताना एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिलं. ते म्हणाले, ही मागणी त्यांचा केविलवाणा प्रयत्न आहे. सगळ्या चौकशांना आम्ही सामोरं जाऊ शकतो. आमचं पारदर्शक सरकार आहे. ठाकरे गटाला फक्त आरोप करत राजकारण करायचं आहे. भूखंड प्रकरणात आरोप केला होता त्यात ते तोंडघशी पडले. कोर्टाने त्यांना जागा दाखवली आहे.” असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संजय राऊत यांना प्रत्युत्तर दिलं.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in