'हिंदूहृदय सम्राट','धर्मवीर' अशा पदव्या मागून मिळत नाहीत; उद्धव ठाकरेंचा टोला

'हिंदूहृदय सम्राट','धर्मवीर' अशा पदव्या मागून मिळत नाहीत; उद्धव ठाकरेंचा टोला

धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे या चित्रपटाच्या ट्रेलर लाँच सोहळ्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं वक्तव्य

हिंदूहृदय सम्राट, धर्मवीर या पदव्या कधीही मागून मिळत नाहीत, असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी टोलेबाजी केली आहे. धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे या चित्रपटाच्या ट्रेलर लाँच सोहळ्यात त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना विशिष्ट पदव्या देऊन त्यांची पोस्टर्स लावण्यात आली होती. त्यानंतर आता आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेली टोलेबाजी चर्चेत आहे.

'हिंदूहृदय सम्राट','धर्मवीर' अशा पदव्या मागून मिळत नाहीत; उद्धव ठाकरेंचा टोला
राज ठाकरे 'हिंदू हृदयसम्राट' नाही, 'मराठी हृदयसम्राट'च -मनसे

काय म्हणाले उद्धव ठाकरे?

आनंद दिघे हे नुसते शिवसैनिक नव्हते तर निष्ठा काय असते ते त्यांच्याकडून शिकण्यासारखं होतं. त्यांचं निधन झालं तेव्हा ते ५० वर्षांचे होते. मात्र त्यांनी जे दिवसरात्र काम केलं आणि कार्यकर्ते घडवले ते पाहता त्यांनी १०० वर्षांचं काम केलं असंच म्हणावं लागेल. शिवसैनिकांचे डोळे आजही त्यांच्या आठवणीने ओलावतात. हिंदू हृदय सम्राट, धर्मवीर या ज्या पदव्या असतात त्या कुणालाही मागून मिळत नाहीत. त्या जनता ठरवत असते.

'हिंदूहृदय सम्राट','धर्मवीर' अशा पदव्या मागून मिळत नाहीत; उद्धव ठाकरेंचा टोला
Dharmaveer Anand Dighe :धर्मवीर आनंद दिघे यांची 'आर्माडा' बघितलीत का?

बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांची आठवण

या सिनेमाच्या टिझरमध्ये बाळासाहेब ठाकरेंसोबत आनंद दिघे आहेत असा एक क्षण दाखवला आहे. त्यात बाळासाहेब चिडलेले आहेत असं दिसतंय. ते बरोबरच आहे. ठाण्यातल्या शिवसैनिकांना सकाळी ११ ची वेळ दिली की किती वाजता येतील तेव्हा ११ वाजलेले असतात. बाळासाहेब ठाकरे वेळेचे भोक्ते होते. आनंद दिघेंना सकाळी ११ ची वेळ दिली असेल तर २ पर्यंत पत्ता नसायचा. दोन वाजता ते यायचे तेव्हा बाळासाहेब चिडलेले असायचे. आनंद दिघे एकटे येऊन उभे राहायचे मग बाळासाहेब ठाकरे यांचा राग वाहून जायचा. आनंद दिघे हे दबंग होते. आनंद दिघेही झुकेगा नहीं म्हणणारेच होते. जो समोर येईल त्याचं आव्हान स्वीकारत पुढे जाणारे होते. लाखमोलाचे साथी, सोबती बाळासाहेब ठाकरेंना लाभले. त्यानंतर ते माझेही साथी झाले यापेक्षा मोठं भाग्य काय? असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

शिवसेना हा गुरू शिष्याचं नातं जपणारा एकमेव पक्ष आहे. त्यामुळेच शिवसेना संपवण्याचे प्रयत्न ज्यांनी ज्यांनी केले त्या सगळ्यांना संपवून हा पक्ष पुढे गेला आहे. आनंद दिघेंच्या आयुष्यावर आलेला हा सिनेमा फक्त सिनेमा किंवा मनोरंजन म्हणून पाहू नका तर कडवट निष्ठा काय असते ते अनुभवण्यासाठी हा सिनेमा पाहा. आनंद दिघे हे कट्टर शिवसैनिक होते आणि विशेष बाब म्हणजे त्यांनी तसेच कट्टर शिवसैनिक घडवले. ही सगळी माणसं आज आपल्यात नसली तरीही कोणत्या ना कोणत्या रूपाने ती आपल्यात असतातच असंही यावेळी उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.

Related Stories

No stories found.