"विधान परिषद निवडणुकीसाठी मी..." उद्धव ठाकरे यांचं वक्तव्य चर्चेत

शिवसेना प्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं महत्त्वाचं वक्तव्य चर्चेत
 Cm uddhav thackeray to shivsena mla in westin hotel mumbai mlc election
Cm uddhav thackeray to shivsena mla in westin hotel mumbai mlc election

विधान परिषद निवडणुकीसाठी मी मार्गदर्शन करणार नाही. त्याची गरज नाही. आमदारांची बडदास्त निवडणुकीसाठी ठेवावीच लागते. तशी ठेवली गेली आहे यालाच लोकशाही म्हणतात. आपले आमदार, खासदार, नगरसेवक या सगळ्यांना एकत्र ठेवणं ही लोकशाहीच आहे असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. आजचं हे चित्र आहे की आमदारांना हॉटेलमध्ये ठेवून बडदास्त ठेवली आहे. हे जे चित्र मला दिसतंय ते विधान परिषदेच्या निवडणुकीनंतरही दिसलं पाहिजे. असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात उद्धव ठाकरे यांनी हे वक्तव्य केलं.

मी चिंता करत बसलो नाहीये, कारण मी चिंता करत बसलो तर शिवसेना प्रमुखांनी जे माझ्या धमन्यांमध्ये सळसळतं रक्त भिनवलं आहे त्याचा उपयोग काय? राज्यसभेच्या वेळी आपलं एकही मत फुटलेलं नाही. मग फुटलं कोण? तो अंदाज लागलेला आहे. विधान परिषदेच्या वेळी फाटाफूट होणार नाही कारण गद्दार मनाचा कुणी इथे राहिलेला नाही. कितीही फाटाफूट झाली तरीही शिवसेना मजबुतीने उभी राहिली आहे.

शिवसेनेच्या ५६ व्या वर्धापन दिनाच्या सगळ्यांना शुभेच्छा देतो आहे. मी बाहेर गेलो असतानाच संजय राऊत यांनी फादर्स डेचा उल्लेख केला. नक्कीच आज फादर्स डे आहे कारण शिवसेना माझ्या वडिलांनीच स्थापन केली आहे असं वक्तव्य आज शिवसेना पक्ष प्रमुख तसंच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या ५६ व्या वर्धापन दिनी केलं.

राजकारणात श्रद्धा-अंधश्रद्धा बऱ्याच असतात, पितृ पक्षही अनेक जण मानतात. मी मानत नाही कारण माझा पक्ष हा पितृपक्ष म्हणजे वडिलांनी स्थापन केलेलाच पक्ष आहे. प्रत्येक दिवस हा आपलाच दिवस असतो. ५६ वर्ष शिवसेनेला झाली, अनेक आठवणी माझ्या मनात ताज्या आहेत. शिवसेनेच्या स्थापनच्या क्षण मी जेव्हा पक्ष प्रमुख झालो तेव्हा माझ्या डोळ्यासमोर तरळून गेला.

जेव्हा शपथ घेतली तेव्हा शिवाजी पार्कच्या घरात आजोबा, साहेब, काका, माँ वेळ काळ न बघता शिवसेनेची स्थापना. त्या क्षणाचे साक्षीदार माझे वय सहा वर्ष. शिवाजी महाराज की जय म्हणून नारळ फोडला त्याचे पाणी माझ्या अंगावर. फार मोठी जबाबदारी किती मोठी असेल हे तेव्हा काहीच कळले नाही. तुमच्या साथीने आपण अजून पुढे जाऊ. काहि आहेत काही निघून गेलेत त्या सर्वांना अभिवादन. त्या पिढीचे देसाई रावतॆ पहिल्या पिढीचे. शिवसेनेचा पहिला महापौर १९७१ साली हेच खूप होत. आज तर मुख्यमंत्री आपले आहेत. तुमची जबाबदारी माझी. दोघांनीही रूसवे फुगवे न करता ऐकले. दोघांत आजही शिवसैनिक जिवंत आहे. त्यांना जी जबाबदारी दिली ती यशस्वी करुन दाखवली. मार्मिक छापायला तयार नसतांना दिवाकर रावतेंनी ते शक्य केले.

सुभाष देसाईंचे नाव सुचवले आणि तेव्हापासून देसाई साहेब सामनाला जोडले गेले. वयाने मोठे आहेत पण माझा आदेश समजून काम करताहेत. शिवसेनेसाठी दोघेही हवे आहेत. नव्या दमाचे रोज सैनिक येताहेत. उद्या निवडणूक. एक लोकशाही प्रमाणे बडदास्त ठेवली आहे. यांना एकत्र ठेवणे ही आजची लोकशाही. वर्धापन दिन म्हटल्यावर शिवसैनिक पण आहेत. इतके आमदार दिसायला हवे. रमेश गेला कट्टर कार्यकर्ता. अस म्हटलं जात पायलट त्याचे ट्रेनिंग तसा एखादा कार्यकत्रता गेला तर तो मोठा फटका असतो.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in