CM Uddhav Thackeray: 'एकदा काय तो सोक्षमोक्ष लावूनच टाकायचा', मुख्यमंत्री ठाकरे असं का म्हणाले?
cm uddhav thackeray will hold a public meeting soon strong criticism on bjp(फोटो सौजन्य: CMO)

CM Uddhav Thackeray: 'एकदा काय तो सोक्षमोक्ष लावूनच टाकायचा', मुख्यमंत्री ठाकरे असं का म्हणाले?

CM Uddhav Thackeray Criticized to BJP: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे लवकरच एक जाहीर सभा घेणार आहेत. पाहा याविषयी काय म्हणाले मुख्यमंत्री.

मुंबई: राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज (25 एप्रिल) मुंबईतील 'बेस्ट'च्या एका जाहीर कार्यक्रमात बोलताना भाजपवर जोरदार निशाणा साधला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी एक मोठी घोषणा देखील केली. जे विरोधक उद्धव ठाकरेंवर हल्ला चढवत आहेत त्या सगळ्यांना उत्तर देण्यासाठी ते लवकरच एक जाहीर सभा घेणार आहेत.

'मला जास्त काही बोलायचं नाहीए. लवकर लवकरत एक जाहीर सभा घ्यायचा माझा इरादा आहे. तिकडे मला मास्क काढून बोलायचं आहे. तिकडे मला एकदा काय तो सोक्षमोक्ष लावूनच टाकायचा आहे. हे तकलादू हिंदुत्ववादी आलेले आहेत. त्यांचा समाचार एकदा मला घ्यावा लागणार आहेच. तो घ्यायचा तेव्हा घेईन.' असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपण भाजपचा समाचार घेण्यासाठी सज्ज असल्याचा एक प्रकारे इशाराच दिला आहे.

पाहा मुंबईतील कार्यक्रमात उद्धव ठाकरेंनी नेमकं काय म्हटलं:

'बाबरी पाडली तेव्हा सुद्धा तुम्ही बिळात लपला होतात'

'गेल्या काही दिवसात जे चाललं आहे की, शिवसेनेनं हिंदुत्व सोडलं, हिंदुत्व सोडलं.. म्हणजे काय सोडलं.. हिंदुत्व म्हणजे काय धोतर आहे का ओ... म्हणजे घातलं नेसलं आणि सोडलं.. एक मुद्दा मी मुद्दामून सांगेन.'

'जे आम्हाला हिंदुत्व शिकवतायेत त्यांनी लक्षात ठेवायला पाहिजे की, काय तुम्ही हिंदुत्वासाठी केलेलं आहे. ज्या वेळेला बाबरी पाडली गेली तेव्हा सुद्धा तुम्ही बिळात लपला होतात. राम मंदिर सुद्धा बांधण्याचा निर्णय हा तुमच्या सरकारने घेतलेला नाही तो कोर्टाने दिलेला आहे.'

'मंदिर बांधताना सुद्धा तुम्ही लोकांपुढे झोळ्या पसरलेल्या आहेत. तुमचं हिंदुत्व आहे कुठे?' अशी घणाघाती टीका उद्धव ठाकरे यांनी यावेळी केली आहे.

'घंटाधारी हिंदुत्ववाद्यांनी आम्हा गदाधारी हिंदुत्ववाद्यांना शिकवू नये'

'शिवसेनाप्रमुखांनी जे हिंदुत्व आम्हाला शिकवलं ते हेच हिंदुत्व आहे की, शिवसेनप्रमुखांनी हेच सांगितलं होतं की, मला देवळात घंटा बडवणारा हिंदू नकोय तर अतिरेक्यांना बडवणारा हिंदू हवा आहे. हे कुठले आहे घंटाधारी हिंदुत्ववादी. घंटाधारी हिंदुत्ववाद्यांनी आम्हा गदाधारी हिंदुत्ववाद्यांना हिंदुत्व शिकविण्याच्या भानगडीत पडू नये.' असं म्हणत उद्धव ठाकरेंनी भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे.

'...तर दादागिरी कशी मोडून काढू'

'या आमच्या घरी यायचं असेल तर या.. हनुमान चालीसा तुमच्या घरी पद्धत नसेल तर आमच्या घरी या. जरुर पण त्याला एक पद्धत असते. आमच्या घरी साधू-संत हे नेहमीच येतात. आम्ही त्यांचं स्वागत करतो. पण दादागिरी करुन याल तर दादागिरी कशी मोडायची हे आम्हाला शिवसेनाप्रमुखांनी हिंदुत्वाच्या व्याख्येत समजून सांगितलं आहे.' असा इशाराही यावेळी मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना दिला आहे.

cm uddhav thackeray will hold a public meeting soon strong criticism on bjp
दादागिरी करुन घरी येणार असाल तर...उद्धव ठाकरेंनी नाव न घेता राणा दाम्पत्याला सुनावलं

'एकदा काय तो सोक्षमोक्ष लावूनच टाकायचा आहे.'

'मला जास्त काही बोलायचं नाहीए. लवकर लवकरत एक जाहीर सभा घ्यायचा माझा इरादा आहे. तिकडे मला मास्क काढून बोलायचं आहे. तिकडे मला एकदा काय तो सोक्षमोक्ष लावूनच टाकायचा आहे. हे तकलादू हिंदुत्ववादी आलेले आहेत. त्यांचा समाचार एकदा मला घ्यावा लागणार आहेच. तो घ्यायचा तेव्हा घेईन.' असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी जाहीर केलं.

Related Stories

No stories found.