'मनापासून सांगतो अजूनही वेळ गेलेली नाही'; बंडखोर आमदारांना ठाकरेंची शेवटची हाक

बंडखोरी करून गुवाहाटीत गेलेल्या आमदारांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आवाहन
'मनापासून सांगतो अजूनही वेळ गेलेली नाही'; बंडखोर आमदारांना ठाकरेंची शेवटची हाक

महाविकास आघाडीतून बाहेर पडण्यासह विविध मागण्यांसाठी शिवसेनेच्या अनेक आमदारांनी बंडखोरी केली. गेल्या आठवडाभरापासून राजकीय नाट्य रंगलं असून, दिवसागणिक राजकीय नाट्याला वेगळं वळण मिळताना दिसत आहे. सध्या देवेंद्र फडणवीस हे दिल्लीत असताना आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बंडखोर आमदारांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला आहे.

मुख्यमंत्री ठाकरे काय म्हणाले?

शिवसैनिक आमदार बांधवानो आणि भगिनींनो

जय महाराष्ट्र !

आपण गेल्या काही दिवसांपासून गुवाहाटी येथे अडकून पडलेले आहात. आपल्याबाबत रोज नवीन माहिती समोर येत आहे. आपल्यातील बरेच संपर्कातही आहेत आपण आजही मनाने शिवसेनेत आहात. आपल्यापैकी काही आमदारांच्या कुटुंबातील सदस्यांनी देखील संपर्क साधून आपल्या मनातील भावना मला कळवल्या आहेत.

'मनापासून सांगतो अजूनही वेळ गेलेली नाही'; बंडखोर आमदारांना ठाकरेंची शेवटची हाक
फडणवीस-अमित शाह भेट; राज्यपालांच्या भूमिकेकडे लक्ष, केसरकरांचं मोठं वक्तव्य!

आपल्या भावनांचा मी शिवसेनेचा कुटुंबप्रमुख म्हणून आदर करतो. कुटुंबप्रमुख म्हणून तुम्हाला मनापासून सांगतो अजूनही वेळ गेलेली नाही. माझं आपल्याला सगळ्यांना आवाहन आहे. आपण या माझ्या समोर बसा.

शिवसैनिकांच्या आणि जनतेच्या मनातील संभ्रम दूर करा. यातून निश्चित मार्ग निघेल. आपण एकत्र बसून यातून मार्ग काढू. कोणाच्याही कोणत्याही भूल थापांना बळी पडू नका. शिवसेनेने जो मान सन्मान तुम्हाला दिला तो कुठेही मिळू शकत नाही.

'मनापासून सांगतो अजूनही वेळ गेलेली नाही'; बंडखोर आमदारांना ठाकरेंची शेवटची हाक
उद्धव ठाकरेंनी सांगावं गुवाहाटीत आलेला कोणता आमदार तुमच्या संपर्कात? एकनाथ शिंदे यांचं आव्हान

समोर आलात बोललात तर मार्ग निघेल. शिवसेना पक्ष प्रमुख आणि कुटुंब प्रमुख म्हणून आजही मला तुमची काळजी वाटत आहे. समोर येऊन बोला आपण मार्ग काढू.

आपला नम्र

उद्धव बाळासाहेब ठाकरे

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in