"ऐ 'भोगी' कुछ तो सीख हमारे 'योगी'से" अमृता फडणवीस यांची उद्धव ठाकरेंवर टीका

अमृता फडणवीस यांची उद्धव ठाकरेंवर नाव घेता खोचक शब्दांमध्ये टीका
"ऐ 'भोगी' कुछ तो सीख हमारे 'योगी'से" अमृता फडणवीस यांची उद्धव ठाकरेंवर टीका
Amruta Fadnavis slammed and advised CM Uddhav Thackeray to learn from Yogi over illegal Loudspeakers

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा खोचक ट्विट करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. ऐ भोगी कुछ तो सीख हमारे योगी से असं ट्विट अमृता फडणवीस यांनी केलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा उल्लेख भोगी असा केला आहे.

मशिदींवरच्या भोंग्यांच्या मुद्द्यावरून राज्यातलं राजकारण सध्या चांगलंच तापलं आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी यासंदर्भात राज्य सरकारला ३ मे पर्यंत अल्टिमेटम दिला आहे. हा मुद्दा राज ठाकरे यांनी उपस्थित केल्यानंतर उत्तर प्रदेशातल्या धार्मिक स्थळांवरचे खासकरून मशिदींवरचे भोंगे योगी आदित्यनाथ सरकारने उतरवले आहेत. यानंतर ऐ भोगी कुछ तो सीख हमारे योगीसे असं म्हणत अमृता फडणवीस यांनी खोचक शब्दात उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे.

Amruta Fadnavis slammed and advised CM Uddhav Thackeray to learn from Yogi over illegal Loudspeakers
औरंगाबादमध्ये भोंगे वाजवण्यासाठी मनसे सज्ज, जाणून घ्या काय आहे मनसेचा R प्लान?

एकीकडे अमृता फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंचं नाव न घेता हे ट्विट केलं आहे. तर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी योगी आदित्यनाथ यांचं मशिदींवरचे भोंगे उतरवल्याबद्दल अभिनंदन केलं आहे.

काय म्हणाले आहेत राज ठाकरे?

उत्तर प्रदेशातील धार्मिक स्थळांवरचे, विशेषतः मशिदींवरचे भोंगे उतरवल्याबद्दल योगी सरकारचं मनःपूर्वक अभिनंदन आणि आभार. आमच्या महाराष्ट्रात योगी कुणीच नाही. आहेत ते फक्त सत्तेचे भोगी महाराष्ट्र सरकारला सद्बुद्धी मिळो हीच आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना. असं ट्विट राज ठाकरे यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून केलं आहे.

अमृता फडणवीस यांनी २४ एप्रिललाही ठाकरे सरकारवर टीका केली होती. महाराष्ट्रात जे काही चाललं आहे त्या परिस्थितीवरून हे दोन ट्विट केले आहेत. २०१४ च्या निवडणुकीच्या वेळी कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा ही भाजपची टॅगलाईन होती. त्याच टॅगलाईनवर आधारित टीका अमृता फडणवीस यांनी केली आहे.

काय होतं अमृता फडणवीस यांचं पहिलं ट्विट?

थोडक्यात उत्तर द्यावे;

(उत्तर दिलेल्या विकल्पांमधूनच एक किंवा सर्व पर्याय निवडून धावे)

उद्वस्थ ठ_ _ ने कुठे नेवुन ठेवला आहे #Maharashtra आमचा ?

1 वसुलीच्या ताब्यात

२ विकृत अघाडीच्या ताब्यात

३ लोड shedding च्या ताब्यात

४ Traffic Jam आणि अव्यवस्थेच्या ताब्यात

५ गुंडांच्या ताब्यात

काय आहे अमृता फडणवीस यांचं दुसरं ट्विट?

बाळा साहेब के नाम पे करते सभी अब रास लीला है,

मैं करूँ तो साला, character ढीला है !

असे दोन ट्विट करत अमृता फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in