Praniti Shinde उजनीच्या पाण्यावरून आक्रमक म्हणाल्या, 'मला सत्तेशी...'

सोलापूरचं पाणी पळवण्याचा प्रयत्न केला तर रान पेटवू - प्रणिती शिंदेंचा इशारा
Praniti Shinde उजनीच्या पाण्यावरून आक्रमक म्हणाल्या, 'मला सत्तेशी...'

राज्यात सत्तेत असलेल्या महाविकास आघाडी सरकारमधील घटकपक्षांमध्ये नवीन वाद रंगण्याची चिन्ह निर्माण झाली आहेत. सोलापूरच्या उजनी धरणातलं पाणी इंदापूर आणि बारामतीला वळवण्याच्या निर्णयाला काँग्रेस आमदार प्रणिती शिंदेंनी विरोध केला आहे.

सोलापूरचं पाणी वळवण्याचा प्रयत्न केला तर रान पेटवू असा इशारा प्रणिती शिंदे यांनी दिला आहे. उजनी धरणातलं 5 टीएमसी पाणी इंदापूर आणि बारामतीला वळवण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला होता.

मला सत्तेशी काही घेणंदेणं नाही. मी लहानपणापासून सत्ता पाहिली आहे. उजनीचं पाणी 20 वर्षांपूर्वी सुशीलकुमार शिंदे यांनी पाईपलाईनद्वारे सोलापूरला आणले. आताच्या घडीला उजनी धरणार पुरेसा पाणीसाठा असूनही महापालिकेतर्फे याचं नियोजन होत नाहीये. काँग्रेसची सत्ता असताना दुष्काळातही सोलापूरमध्ये दोन दिवसाआड पाणी मिळत होतं. आज शहरात 6-8 दिवसांनी पाणी मिळतंय. काँग्रेसची सत्ता असताना पाणीसाठा कमी असतानाही आम्ही पुरवठा सुरळीत ठेवला होता अशी टीका प्रणिती शिंदे यांनी केली.

पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना एका रात्रीत दोन कोटींचा खर्च करुन सेक्शन पंपाद्वारे एका रात्रीत आम्ही पाणी आणलं. दुष्काळातही दोन दिवसाआड पाणी येत होतं. आता उजनी धरणात पुरेसा पाणीसाठा असतानाही आमचं पाणी दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न होत असेल तर आम्ही काय मेलो आहोत का? असा प्रश्न प्रणिती शिंदेंनी विचारला.

सोलापूरकरांचं पाणी वळवत असाल तर खबरदार आम्ही रान पेटवल्याशिवाय राहणार नाही. आम्हाला रोज पाणी द्या आणि आमच्या पाण्याला हात लावू नका अशी जाहीर भूमिका प्रणिती शिंदेंनी घेतली आहे.

Praniti Shinde उजनीच्या पाण्यावरून आक्रमक म्हणाल्या, 'मला सत्तेशी...'
पवारांनो वेळीच सुधारा, नाहीतर...: गोपीचंद पडळकरांचा गर्भित इशारा

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in