Hardik Patel : हिंदूंशी निगडीत गोष्टींशी काँग्रेस अंतर राखून असतं, याचा पक्षाला फटका बसतो

भाजप मध्ये जाण्याबाबत हार्दिकची सावध भूमिका, परंतू महत्वाच्या मुद्द्यांवरुन पुन्हा भाजपचं कौतुक
Hardik Patel : हिंदूंशी निगडीत गोष्टींशी काँग्रेस अंतर राखून असतं, याचा पक्षाला फटका बसतो

काँग्रेसमधून राजीनामा दिलेल्या हार्दिक पटेलने पुन्हा एकदा पक्षाचे कान टोचले आहेत. हिंदूंशी निगडीत गोष्टींपासून काँग्रेस नेहमी अंतर राखून असतं याचाच पक्षाला फटका बसत असल्याचं हार्दिक पटेलने सांगितलं. ज्ञानव्यापी मशिद विवाद प्रकरणावर हार्दिक अहमदाबादमध्ये बोलत होता.

"देशभरात महादेवाचे अनेक भक्त आहेत. जर मशिदीत किंवा इतर कोणत्या ठिकाणी शिवलींग सापडत असेल तर ही बाब अनेकांच्या श्रद्धेशी जोडली गेली आहे. आपण या गोष्टीचं स्वागत करायला हवं. परंतू हिंदूशी निगडीत असलेल्या गोष्टींशी काँग्रेसचे नेते अंतर राखून असतात. पक्षाला याचाच फटका बसतो", असं हार्दिक म्हणाला.

हार्दिक पटेलने नुकताच काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांना पत्र लिहून हार्दिक पटेलने वरिष्ठ नेत्यांवर गंभीर आरोप केले होते. देशाला गरज असताना काँग्रेसचे नेते देशाबाहेर होते. राज्यातील काँग्रेसचे नेते फक्त दिल्लीतून येणाऱ्या नेत्यांना चिकन सँडवीच मिळतंय की नाही, डाएट कोक मिळतंय की नाही याची काळजी करत असतात असं म्हणत हार्दिकने आपली नाराजी बोलून दाखवली होती.

यावेळी हार्दिक पटेलने आपण भाजपमध्ये सहभागी होत असल्याची शक्यता फेटाळून लावली. 2017 साली हार्दिक पटेलने गुजरातमध्ये पटेल समाजाच्या आरक्षणासाठी आंदोलन केलं होतं. यावेळी हार्दिक पटेलने भाजपवर सडकून टीका केली होती. परंतू आता हार्दिकने भाजपबद्दल नरमाईची भूमिका घेतली आहे.

Hardik Patel : हिंदूंशी निगडीत गोष्टींशी काँग्रेस अंतर राखून असतं, याचा पक्षाला फटका बसतो
काँग्रेस सगळ्यात मोठा जातीयवादी पक्ष ! राजीनाम्यानंतर हार्दिक पटेलचं आणखी एक टिकास्त्र

"जर पक्ष लोकांच्या विकासासाठी काम करत असेल तर मी त्या पक्षाचं कौतुकच करेन. भाजप अयोध्येत राम मंदिर बांधत आहे. 2019 साली सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिल्यानंतर मी त्याचं स्वागत केलं होतं आणि त्यासाठी माझं योगदानही दिलं होतं." जम्मू काश्मीरमधून कलम 370 हटवल्याबद्दलही हार्दिकने भाजपचं कौतुक केलं. त्यामुळे येणाऱ्या काळात हार्दिक आपल्या राजकीय प्रवासाबाबत नेमकी कोणती भूमिका घेतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in