फडणवीस ते गोगावले : अजित पवारांनी एक तास वाभाडे काढले; सभागृह फक्त ऐकत राहिलं!

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

नागपूर : राज्याच्या हिवाळी अधिवेशनाचा मंगळवारचा संपूर्ण दिवस दोन मुद्द्यांनी गाजला. एक म्हणजे कर्नाटकविरोधातील ठरावातील ठराव आणि दुसरा मुद्दा म्हणजे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांचं भाषण. पुरवणी मागण्यांवरील भाषणात बोलताना अजित पवार यांनी जवळपास एक तास भाषण केलं. या भाषणात त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अगदी आमदार भरत गोगावले यांच्यापर्यंत सर्वांवर जोरदार टीका केली. या दरम्यान त्यांनी अनेकदा गोड बोलत चिमटेही काढले.

नेमकं काय म्हणाले अजित पवार?

फडणवीस यांची तक्रार अमृता वहिनींना करणार :

राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार होत नसल्याच्या मुद्द्यावर अजित पवार यांनी आजच्या भाषणात बोट ठेवलं. तसंच या मंत्रिमंडळात महिलांना स्थान नसल्याचा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला. यावर ते म्हणाले, “आता फडणवीस यांची तक्रार अमृता वहिनींना करतो, त्यांनी मनावर घेतलं की लगेच महिलांना मंत्रिमंडळात स्थान मिळेल…” अजित पवार यांच्या या वक्तव्यानंतर सभागृहात एकच हशा पिकला होता.

गोगावले सुट कधी घालायचा?

आजच्या भाषणादरम्यान, भरत गोगावले मागून काही तरी बोलले. यावरुन अजित पवार यांनी शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांची फिरकी घेतली. मंत्रिमंडळ विस्ताराबाबत बोलताना अजित पवार म्हणाले, भरत गोगावले तो सुट कधी घालायचा? मंत्रिपदाची शपथ घेण्यासाठी ते कधीपासून सूट शिवून बसलेत. त्यांच्या मंत्रिपदाच्या शपथविधीला दुनियेत कुठेही असला तरीही मी तिथे उपस्थिती लावणार, असे सांगताच पवारांनी सभागृहात जोरदार हशा पिकला.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

चंद्रकांत पाटील कोल्हापूरचा ढाण्यावाघ :

चंद्रकांत पाटील यांची फिरकी घेताना अजित पवार म्हणाले, ”मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांचं तर बेस्ट चाललं आहे. देवेंद्रजींना काही विचारलं तर मुख्यमंत्र्यांची संमती आणा आणि मुख्यमंत्र्यांना काही विचारलं तर ते म्हणतात देवेंद्रजींनी म्हटलं की झालं. यांची फक्त इकडून तिकडे टोलवा टोलवी सुरू आहे.

चंद्रकांत दादा, कधी कधी मला तुमची खूप आठवण येते. तुम्ही असता तर अशी टोलवा टोलवी नसती झाली. आमचा कोल्हापूरचा ढाण्यावाघ, त्यांना एक दोन खाती दिली व बाजूला केलं. स्वत: मात्र सहा सहा खाती घेतली. हे बरोबर नाही. तुम्हाला अक्षरश: या लोकांचा तळतळाट लागेल” असा टोला अजित पवारांनी लगावला आहे.

ADVERTISEMENT

सहकार मंत्री अतुल सावे अजून तुम्ही रुळलाच नाही…:

आजच्या भाषणात सहकार मंत्री अतुल सावे यांनाही अजित पवार यांनी लक्ष्य केलं. ते म्हणाले, सावे साहेब, सहा महिने झाले, काय अजून तुम्ही रुळलाच नाहीत, त्यांना काय विचारलं की ते देवेंद्र फडणवीस यांना विचारतो असं म्हणतात. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ६ खाती आहेत, तुमच्या खात्याचा भार त्यांच्याकडे कशासाठी? सहा जिल्ह्यांचे पालकमंत्री ते आहेत. नवे सहा पालकमंत्री नेमले तर काम होणार नाही का?

ADVERTISEMENT

ठरवलं तर त्यांचा करेक्ट कार्यक्रम करेन :

आज अजित पवार यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनाही निशाणा केलं. ते म्हणाले, आपलं सरकार आल्यानंतर एक नेते बारामतीत आले आणि बारामतीत घड्याळ बंद करण्याचा करेक्ट कार्यक्रम करणार अशा वल्गना करतात. आमचं तिथं काम आहे खरंच करेक्ट कार्यक्रम होणार आहे का? मला चॅलेंज देतात मी ठरवलं तर त्यांचा करेक्ट कार्यक्रम करेन, असं अजित पवार म्हणाले.

एसआयटी एसआयटी सुरु आहे :

राज्यात एसआयटी नेमण्याच्या मुद्द्यावरुनही अजित पवार यांनी शिंदे सरकारला लक्ष्य केलं. ते म्हणाले, अनिल देशमुख असतील, छगन भुजबळ असतील किंवा कुणीही असो कुठलाही गुन्हा सिद्ध न होता त्याला वर्ष दोन वर्ष तुरुंगात टाकणं योग्य नाही. सगळं घरदार विचलित होतं. तुम्ही सत्तेत आल्यानंतर उठसूट एसआयटी, एसआयटी लावली जात आहे. राज्याला ईडी, सीबीआय माहिती होती आता मात्र एसआयटी एसआयटी सुरु आहे, असं अजित पवार म्हणाले.

अजित पवार यांचे सविस्तर भाषण ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा…

    follow whatsapp

    ADVERTISEMENT