Devendra Fadnavis यांचा पर्मनंट टॅटू काढणाऱ्या नेत्याने सरकराविरुद्धच थोपटले दंड

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Narendra Patil news :

नवी मुंबई (निलेश पाटील) : माथाडी कामगारांच्या प्रलंबित समस्येकडे कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी ढुंकूनही बघितलं नसल्याचं म्हणतं आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी शिंदे-फडणवीस सरकारला घरचा आहेर दिला. तसंच येत्या १ फेब्रुवारीला लाक्षणिक संपाचा इशाराही पाटील यांनी दिला असून आपल्या आंदोलनावर माथाडी कामगार ठाम असल्याचं त्यांनी सांगितलं. (DCM Devendra Fadnavis’s trusted leader Narendra Patil of announce agitation against government)

माथाडी कामगारांच्या विविध समस्या प्रलंबित आहेत. यात प्रामुख्याने माथाडी संरक्षण कायदा, माथाडी बोर्डाची पुनर्रचना, चेंबूरमधील घरांचा प्रश्न प्रलंबित आहेत. याशिवाय माथाडी मंडळात कामगारांच्या मुलांना सामावून घेण्याबाबत माथाडी कामगार संघटना वारंवार आंदोलन करत आहे, मात्र शासन याकडे कानाडोळा करत आहे, असा आरोप करत येत्या एक फेब्रुवारीला संपावर जाण्याचा पाटील यांनी व्यक्त केला.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

Exclusive : Election Commission समोर शिंदे-ठाकरे गटाचे फायनल दावे!

कॅबिनेट दर्जाच्या महामंडळाचे अध्यक्ष असलेले नरेंद्र पाटील हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अगदी विश्वासातील नेते आहे. इतकचं नाही तर फडणवीसांवरील प्रेमामुळे त्यांनी त्यांचा पर्मनंट टॅटूही काढला आहे. मात्र आमचं सरकार असून देखील माथाडी कामगाराच्या समस्यांना न्याय मिळत नसल्याने पुढील अधिवेशनात आंदोलन अधिक तीव्र करु, वेळ पडल्यास मंत्र्यांच्या गाड्या देखील अडवू असा इशारा पाटील यांनी यावेळी दिला. माथाडी संरक्षण कायद्याचा मसुदा तयार असूनही याची अंमलबजावणी होत नसल्यानं त्यांनी यावेळी नाराजीही व्यक्त केली.

ADVERTISEMENT

रेल्वे बोर्डात कार्यरत असल्याने एका व्यापाऱ्याने सुमारे दीडशे कोटींचा भरणा माथाडी बोर्डात केला नसल्यानं माथाडी कामगारांना फटका बसत आहे. माथाडी बोर्डाची रचना रखडल्यानं माथाडी कामगारांच्या हक्काचे पैसे व्यापारी भरण्यास टाळाटाळ करत असल्याकडे पाटील यांनी लक्ष वेधले आहे. तत्कालीन मंत्री विनोद तावडे यांनी माथाडी कामगारांशी संबंधित विधेयक रद्द केल्याने आजही मथडी कामगार वंचित असल्याचा गंभीर आरोपही करण्यात आला आहे.

ADVERTISEMENT

Bharat Jodo Yatra : १३६ दिवस, ३५७० किमी; राहुल गांधींमध्ये असा झाला बदल

कामगार मंत्री म्हणून सुरेश खाडे यांनी मंत्रिपदाचा कारभार हाती घेतल्यापासून एकदाही माथाडी कामगारांच्या समस्यांबाबत वेळ दिला नसल्याने खाडे यांच्यावर अधिक नाराजी व्यक्त करण्यात आली. माथाडी कामगारांच्या समस्या सोडवण्यात हे सरकार अपयशी ठरल्याने आंदोलनाची धार अधिक तीव्र करण्याचा इशारा देत व्यापाऱ्यांनी या आंदोलनाला पाठींबा दिल्याचा दावा माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांनी केला आहे .

    follow whatsapp

    ADVERTISEMENT