कार्यकर्त्यांची धरपकड होते आणि हे गॅलरीत ये-जा करतात: अजितदादांनी राज ठाकरेंना पुन्हा डिवचलं

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मशिदीवरील भोंग्यांचा मुद्दा राज्याच्या राजकारणात चर्चेला आणणाऱ्या राज ठाकरेंना राज्याचे उप-मुख्यमंत्री अजित पवार यांनी पुन्हा एकदा डिवचलं आहे. बोलणारे बोलून जातात आणि घरी राहतात. कार्यकर्त्यांची धरपकड होते आणि नेते गॅलरीत ये-जा करतात अशा शब्दांत अजितदादांनी राज ठाकरेंना डिवचलं आहे.

मी मागेही सांगितले होतं की, बोलणारे बोलतात आणि आपल्या घरी जातात. आपल्या गॅलरीमधून इकडे-तिकडे बघतात आणि जातात, मात्र, कार्यकर्त्यांना नोटीसा जाऊन त्यांच्यावर केसेस दाखल होतात आणि त्यांची धरपकड होते. त्यामुळे कार्यकर्त्यांनीही ही गोष्ट लक्षात घ्यावी अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांना टोला लगावला आहे. ते पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते.

आम्हाला महाराष्ट्रातील कायदा सुव्यवस्था बिघडवू द्यायचा नाही. मग कायदा मोडणारा कुठल्या पक्षाचा, कुणाचा समर्थक, सत्ताधारी किंवा विरोधी पक्षाचा असो हे आम्ही हे बघणार नाही. जो सविधानाने दिलेल्या नियमाचे उल्लंघन करत असेल नियम मोडणार असेल तर आम्ही सहन करणार नाही, असंही अजित पवार म्हणाले.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

राज ठाकरेंनी आजपर्यंत केलेले एकही आंदोलन यशस्वी झाले नसून त्यामुळे राज्याचे आणि समाजाचे नुकसानच झाल्याची टीका पवारांनी केली आणि राज यांच्या आतापर्यंत आंदोलनाची यादीत वाचून दाखवली.

पवार म्हणाले, “मागे याच व्यक्तीने सांगितले होते की टोल बंद करणार पण काय झालं? एक दिवस फक्त टोल नाक्यावर जमले. पुढे काहीच झालं नाही. राज ठाकरेंची आतापर्यंत केलेली आंदोलने ही राज्याच्या आणि समाजाच्या नुकसानीची होती. टोल बंद झाली तर देशातील राष्ट्रीय महामार्गांची जी कामे झाली त्याचे काय होईल? नितीन गडकरी हे वारंवार सांगत आहेत की, टोल घेतल्यामुळेच महामार्गाचे काम झाले आहे. आता समृद्धी महामार्गाचे काम 45 हजार कोटींचे चालले आहे. पुणे-मुंबई महामार्गचे काम त्याकाळात झाले मात्र त्याच्या दुरूस्तीचे कामकाज हे टोल घेतला नसता तर झाले असते का? छोट्या रस्त्यावर टोल योग्य नाही ते आपण काढले आहे. त्यामुळे त्यांचं टोलचं आंदोलन फेल गेलं आहे.”

ADVERTISEMENT

यापुढे बोलताना पवारांनी, राज ठाकरेंनी दुसरं आंदोलन युपी-बिहार वाल्यांनो चले जाव म्हणत केलं. हेही आंदोलन केल्यावर मु्ंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद येथे बांधकाम करण्यासाठी कामगार मिळत नव्हते. तेव्हा त्या लोकांना पुन्हा आणावं लागलं. यावेळीही त्यांना त्यांची भूमिका बदलावी लागली. त्यानंतर हॅाकर्स हटवा, फेरीवाल्यांना किंवा टॅक्सीवाल्यांना दोन-चार जण मारतात मग त्यांना फुकट प्रसिद्धी मिळते. काही लोकांना करोडो रूपये खर्च करून प्रसिद्धी मिळते मात्र, काहींना काहीही न करताच प्रसिद्धी मिळत आहे, असा टोला राज ठाकरेंना लगावला.

ADVERTISEMENT

राज ठाकरेंच्या नातवाचे फोटो पाहिलेत का?

    follow whatsapp

    ADVERTISEMENT