'पोपटासारखं बोलणाऱ्यांनी...'; अजित पवारांनी राज ठाकरेंना काय दिलं आव्हान?

Ajit Pawar Vs Raj Thackeray : अजित पवारांनी साताऱ्यात नाव न घेता राज ठाकरेंना डिवचलं
'पोपटासारखं बोलणाऱ्यांनी...'; अजित पवारांनी राज ठाकरेंना काय दिलं आव्हान?
Deputy CM Ajit pawar Slams Raj Thackeray about his Speech on Loud Speakers and Ultimatum

मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे गुढीपाडव्यापासून झालेल्या तीन सभांपासून महाराष्ट्रात चांगलेच चर्चेत आहेत. भोंग्यांचा प्रश्न राज ठाकरेंनी पुन्हा समोर आणला. त्यानंतर राज ठाकरे यांच्यावर सातत्याने शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसकडून पुन्हा टीका होताना दिसते आहे. त्यांच्यावर साताऱ्यात अजित पवार यांनी पुन्हा एकदा राज ठाकरेंचं नाव न घेता टीका केली आहे.

Deputy CM Ajit pawar Slams Raj Thackeray about his Speech on Loud Speakers and Ultimatum
"धुडगूस घालायला अक्कल लागत नाही" अजित पवारांनी पुन्हा घेतला राज ठाकरेंचा समाचार

काय म्हणाले आहेत अजित पवार?

सातारा हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे. या जिल्ह्यात जेवढी मदत करता येईल तेवढी आम्ही करणार आहोत. राज्याला दिशा देण्याचं काम साताऱ्याने केलं आहे. साखर कारखाना चालवणं हे काही येड्यागबाळ्याचं काम नाही. किसनवीर कारखान्यात ५२ हजार सभासद आहेत. याबाबत आमदार मकरंद पाटील यांच्यासोबत बैठक घेणार आहेत. जे पोपटासारखे बोलतात त्यांनी कारखाना चालवून दाखवावा.

आणखी काय म्हणाले अजित पवार?

मकरंद पाटील यांनी किसनवीर कारखान्याकडे लक्ष घातलं नाही तर आमदारकी धोक्यात येईल. साखर कारखान्यांमध्ये चुकीचं बोर्ड चालवून आले तर नागरिकांच्या प्रपंचाला फटका बसतो. राज्यात काही लोक धार्मिक तेढ निर्माण करत आहेत. सातारकरांनी बळी पडू नका. काही लोक पावसाळ्यातल्या छत्रीप्रमाणे उगवतात. कधी टोल बंद करा म्हणतात, कधी यूपी-बिहारच्या लोकांना हाकला म्हणतात, आता भोंगे बंद करा म्हणत आहेत. पण सुप्रीम कोर्टाने निकाल दिलेला दिसला नाही का? कायदा सगळ्यांसाठी सारखा आहे समंजस भूमिका घेऊन मार्ग काढू शकतो असंही त्यांनी सुचवलं आहे.

Deputy CM Ajit pawar Slams Raj Thackeray about his Speech on Loud Speakers and Ultimatum
मनसे अध्यक्ष राज ठाकरे शरद पवारांना का टार्गेट करत आहेत?

दोन दिवसांपूर्वीच अजितदादांनी राज ठाकरेंवर टीका केली होती

अल्टिमेटम वगैरे महाराष्ट्रात कुणीही देऊ नये. मशिदींवरच्या भोंग्यावरून हे असले लोक अल्टिमेटम देतात त्यानंतर धरपकड कार्यकर्त्यांची होते आणि हे गॅलरीत येरझारा घालत बसतात, असं म्हणत राज ठाकरेंना अजित पवारांनी सुनावलं होतं. हे सरकार कायदा, नियम आणि संविधानाने चालते. कायदा हातात घेण्याचं धाडस कोणीही करु नये.' 'महाराष्ट्रात कोणीही अल्टिमेटमची भाषा करू नये' असा इशारा अजित पवारांनी दिला होता.

औरंगाबादमध्ये मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची सभा पार पडली. या सभेत शरद पवारांना राज ठाकरेंनी टार्गेट केलं तसंच पुरंदरे आणि जेम्स लेन यांच्याबद्दलचा विषय कसा चुकीचा आणला गेला? हे देखील त्यांनी सांगितलं होतं. त्यानंतर अजित पवारांनी त्यांच्यावर टीका केली होती. त्यानंतर येवल्यातल्या सभेत अजित पवारांनी पुन्हा एकदा राज ठाकरेंवर टीका केली.

विष कालवणाऱ्या माणसाने काय काम केलं आहे? साधी दूध सोसायटी काढली नाही पठ्ठ्याने. एक खरबूज, टरबूज सोसायटीदेखील नाही. संस्था चालवायला डोकं लागतं. धुडगूस घालण्यासाठी अक्कल लागत नाही" असं म्हणत अजित पवारांनी राज ठाकरेंचा समाचार घेतला.

अजित पवार पुढे म्हणाले की, "राज ठाकरे यांचं जेवढं वय नाही तेवढं शरद पवारांनी राजकारण केलं आहे. योगी आदित्यनाथ यांनी भोंगे बंद केल्याचं कौतुक राज ठाकरे करत आहेत. मात्र त्यांनी फक्त मशिदींवरचे नाही तर मंदिरांवरचे भोंगेही उतरवले आहेत हे लक्षात घ्या

Related Stories

No stories found.