"धुडगूस घालायला अक्कल लागत नाही" अजित पवारांनी पुन्हा घेतला राज ठाकरेंचा समाचार

जाणून घ्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आणखी काय काय म्हटलं आहे?
"धुडगूस घालायला अक्कल लागत नाही" अजित पवारांनी पुन्हा घेतला राज ठाकरेंचा समाचार

औरंगाबादमध्ये मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची सभा पार पडली. या सभेत शरद पवारांना राज ठाकरेंनी टार्गेट केलं तसंच पुरंदरे आणि जेम्स लेन यांच्याबद्दलचा विषय कसा चुकीचा आणला गेला? हे देखील त्यांनी सांगितलं होतं. त्यानंतर अजित पवारांनी त्यांच्यावर टीका केली होती. त्यानंतर येवल्यातल्या सभेत अजित पवारांनी पुन्हा एकदा राज ठाकरेंवर टीका केली आहे.

Mandar Deodhar

काय म्हणाले अजित पवार?

"विष कालवणाऱ्या माणसाने काय काम केलं आहे? साधी दूध सोसायटी काढली नाही पठ्ठ्याने. एक खरबूज, टरबूज सोसायटीदेखील नाही. संस्था चालवायला डोकं लागतं. धुडगूस घालण्यासाठी अक्कल लागत नाही" असं म्हणत अजित पवारांनी राज ठाकरेंचा समाचार घेतला.

अजित पवार पुढे म्हणाले की, "राज ठाकरे यांचं जेवढं वय नाही तेवढं शरद पवारांनी राजकारण केलं आहे. योगी आदित्यनाथ यांनी भोंगे बंद केल्याचं कौतुक राज ठाकरे करत आहेत. मात्र त्यांनी फक्त मशिदींवरचे नाही तर मंदिरांवरचे भोंगेही उतरवले आहेत हे लक्षात घ्या" असंही अजित पवारांनी म्हटलं आहे.

"धुडगूस घालायला अक्कल लागत नाही" अजित पवारांनी पुन्हा घेतला राज ठाकरेंचा समाचार
Raj Thackeray Aurangabad Sabha : राज ठाकरे यांचं औरंगाबादेतील भाषण येथे पहा

यांच्या सभा रात्री होतात. सभा दुपारी घेतली का? विरंगुळा म्हणून कार्यक्रम होत आहेत. तसंच सध्याचं राजकारण विचित्र दिशेने चाललं आहे. राजकीय स्वार्थ म्हणून समाजात फूट पाडण्याचं काम केलं जातं आहे. शरद पवार हे फुले, शाहू आंबेडकर यांच्या आणि तसेच छत्रपती शिवरायांच्या विचारानेच काम करतात. आमच्या नसानसांमध्ये छत्रपती आहेत असंही अजित पवार यांनी म्हटलं आहे.

"धुडगूस घालायला अक्कल लागत नाही" अजित पवारांनी पुन्हा घेतला राज ठाकरेंचा समाचार
शरद पवारांना हिंदू शब्दाची अ‍ॅलर्जी, औरंगाबादच्या सभेत राज ठाकरे बरसले

काय म्हणाले होते राज ठाकरे?

शरद पवारांना हिंदू शब्दाची अ‍ॅलर्जी आहे. ते नेहमी फक्त शाहु-फुले आणि आंबेडकरांचा उल्लेख करतात. नक्कीच महाराष्ट्र हा त्यांचा आहेच, परंतू पहिल्यांदा येतात ते आपले छत्रपती महाराज. परंतू शरद पवार शिवाजी महाराजांचं नाव कधीच घेत नाही. त्यांच्या सभांमध्ये शिवाजी महाराजांचे फोटो कधीच दिसत नाहीत. मी इथे कोणत्याही ब्राम्हणांची बाजू घ्यायला आलेलो नाही. परंतू महाराष्ट्रातल्या 18 पगड जातींमध्ये तुम्ही विष कालवलं आहेत.

या भाषणाच्या शेवटी राज ठाकरेंनी भोंग्याबद्दल पुन्हा एकदा 3 मे च्या डेडलाईनचा उल्लेख करत भोंगे हे उतरलेच गेले पाहिजेत असा पुनरुच्चार केला.

Related Stories

No stories found.