मोदींनी महाराष्ट्राच्या नफेखोरीची ‘पोलखोल’ करताच तुमचे अरण्यरुदन सुरू; फडणवीस भडकले

Devendra Fadnavis Vs Uddhav Thackeray : पेट्रोल-डिझेल कर कपातीवरून फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार
मोदींनी महाराष्ट्राच्या नफेखोरीची ‘पोलखोल’ करताच तुमचे अरण्यरुदन सुरू; फडणवीस भडकले

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पेट्रोल-डिझेलवरील व्हॅट कमी करण्याचं आवाहनं केल्यानंतर राज्यात शाब्दिक द्वंद सुरू झालं आहे. उद्धव ठाकरेंनी आकडेवारी सागत केंद्रावर निशाणा साधला. ठाकरेंनी मोदी सरकारला सुनावल्यानंतर आता फडणवीसांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर पलटवार केला आहे.

देशातील वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यंमंत्र्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीत पंतप्रधान मोदी यांनी वाढत्या पेट्रोल-डिझेलच्या मुद्द्यावरून महाराष्ट्र, पश्चिम बंगालसह काही राज्यांना इंधनावरील कर कमी करण्याचं आवाहन केलं. या बैठकीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पेट्रोल-डिझेलच्या महागाईला राज्य जबाबदार नसल्याचं सांगत केंद्रावर निशाणा साधला.

मोदींनी महाराष्ट्राच्या नफेखोरीची ‘पोलखोल’ करताच तुमचे अरण्यरुदन सुरू; फडणवीस भडकले
PM Modi: 'पेट्रोल-डिझेलवरील VAT कमी कराच', PM मोदींनी महाराष्ट्रासह 'या' राज्यांना सुनावलं!

उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान मोदींना प्रत्युत्तर दिल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर पलटवार केला आहे. "दोषारोप आणि जबाबदारी झटकणे! यापेक्षा दुसरे काही करणार तरी आहात का? मुद्दा पेट्रोल-डिझेलचे दर कमी करण्याचा आणि तुम्ही जीएसटीचा विषय घेऊन बसलात," असं फडणवीस म्हणाले.

"पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राच्या नफेखोरीची ‘पोलखोल’ करताच तुमचे अरण्यरुदन सुरू... जीएसटीचा निधी राज्याला नियमित मिळतच असतो, जुनीही थकबाकी मिळाली आणि उरलेली देण्याची मुदत जुलै 2022. मग जीएसटीची थकबाकी मिळाल्यानंतर पेट्रोल-डिझेलवर आकारलेला अतिरिक्त कर ग्राहकांना परत करणार का?," असा सवाल फडणवीस यांनी ठाकरेंना केला आहे.

मोदींनी महाराष्ट्राच्या नफेखोरीची ‘पोलखोल’ करताच तुमचे अरण्यरुदन सुरू; फडणवीस भडकले
पेट्रोल-डिझेल महागाईला राज्य जबाबदार नाहीये; उद्धव ठाकरेंचं पंतप्रधान मोदींना प्रत्युत्तर

"शेजारच्या दीव-दमणमध्ये 103 रुपयांत पेट्रोल मिळते, तर महाराष्ट्रात 120 रुपयांना का? याचे उत्तर मिळालेच पाहिजे आणि दुसरे म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाचा आदर करीत महाराष्ट्रातील जनतेला, मराठी माणसाला तत्काळ दिलासा द्या," असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.

राजकीय वाद का सुरू झाला?

पंतप्रधान मोदींनी आज कोरोना संदर्भात मुख्यमंत्र्यांची बैठक घेतली. याच बैठकीत मोदींनी पेट्रोल-डिझेल डिझेलवरील कर काही राज्यांनी कमी केल्याचा मुद्दा उपस्थित केला. यावेळी त्यांनी व्हॅट कमी करण्याचं आवाहन केलं.

मोदींच्या या संबोधनानंतर मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया समोर आली. केंद्राकडून महाराष्ट्राला सापत्न वागणूक दिली जात असल्याचा आणि थकीत जीएसटीचा मुद्दा उपस्थित करत उद्धव ठाकरेंनी मोदींवरच निशाणा साधला होता. राज्य सरकारने कोरोना काळात केलेली कामं आणि त्यासाठी झालेला खर्च. पेट्रोल-डिझेल कर कपातीला उत्तर दिलं. त्यानंतर फडणवीसांची ही प्रतिक्रिया आली आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in