Devendra Fadnavis: 'पराभवाने बावचळलेत, पिसाटलेत, चेहरे पडले आहेत'; फडणवीसांचा रोख कोणाकडे?

काल झालेल्या राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला धक्का देत भाजपचे तीन उमेदवार निवडूण आले .
Devendra Fadnavis: 'पराभवाने बावचळलेत, पिसाटलेत, चेहरे पडले आहेत'; फडणवीसांचा रोख कोणाकडे?
Devendra FadnavisMumbai Tak

मुंबई: काल झालेल्या राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला धक्का देत भाजपचे तीन उमेदवार निवडूण आले . त्यानंतर आज भाजपच्यावतीने विजयी खासदारांचा सत्कार सभारंभ ठेवण्यात आला होता. यासाठी केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव, केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया त्याचबरोबर महाराष्ट्रातील भाजपचे सर्वच नेते उपस्थीत होते. या कार्यक्रमादरम्यान बोलताना फडणवीसांनी विरोधकांवर तोफ डागली.

देवेंद्र फडणवीस म्हणाले की पराभव झाल्यामुळे बावचळलेत, पिसाटलेट काहीची तोंडं पडली आहेत. मुख्यमंत्र्यांनी अंर्तमुख होऊन विचार करण्याची गरज आहे. महाराष्ट्राचा विकास थांबला आहे. विधान परिषदेही अशाच प्रकारे विजय मिळवू. यावेळी त्यांनी लढाई अजून संपलेली नाही म्हणत कार्यकर्त्यांना असाच उत्साह ठेवण्यास सांगितले आहे.

''शिवसेना अपक्ष आमदारांचे काहीच करु शकत नाही''

देवेंद्र फडणवीस बोलताना म्हणाले की अपक्ष आमदारांना ते काहीच करु शकत नाहीत कारण त्यांना सरकार टिकवायचं आहे. जर ते अपक्ष आमदारांना काही बोलले तर ते सरकारमधून बाहेर पडतीलच परंतु आमच्यावर प्रेम करणारे लोकही सरकारमधून बाहेर पडतील. कालचा विजय फडणवीसांनी भाजपचे पिंपरी-चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप, आमदार मुक्ता टिळक यांना समर्पित केला आहे. जिंकलेल्यांनी उन्माद करायचा नसतो, आनंद साजरा करायचा असतो असेही फडणवीस म्हणाले.

देवेंद्र फडणवीस विजयानंतर म्हणाले...

'आमच्या सगळ्यांकरिता हा अतिशय आनंदाचा क्षण आहे की भाजपचे तीनही उमेदवार याठिकाणी निवडून आलेले आहेत. सगळ्यात पहिल्यांदा तर हा जो विजय आहे हा विजय मी आमचे लढवय्ये आमदार लक्ष्मण जगताप यांना समर्पित करतो आणि त्याचप्रमाणे आमच्या दुसऱ्या लढवय्या आमदार मुक्ता टिळक यांना समर्पित करतो.'

'लक्ष्मणभाऊ अॅम्ब्युलन्समध्ये बसून एवढ्या लांब प्रवास करुन इकडे आले. मी काल त्यांना फोन करुन त्यांच्या बंधूंना सांगितलं की, आम्हाला लक्ष्मणभाऊ जास्त महत्त्वाचे आहेत सीट आली काय किंवा गेली काय भविष्यात परत जिंकू. पण लक्ष्मण भाऊचा जीव महत्त्वाचा आहे. पण लक्ष्मण भाऊंनी सांगितलं की, काय वाट्टेल ते झालं तरी माझ्या पक्षाकरता मी येणार आहे. त्यामुळे मी त्यांचे खरोखर मनापासून आभार मानतो.' असं म्हणत देवेंद्र फडणवीसांनी आपल्या आमदारांचे आभार मानले.

Devendra Fadnavis
छत्रपती संभाजे राजेंची संत तुकारामांचा अभंग ट्विट करत सेनेवर टीका?, त्याचा अर्थ काय?

'आजचा विजय सर्वार्थाने महत्त्वाचा विजय आहे. महाराष्ट्राच्या जनतेने भाजपला बहुमत दिलं होतं. पण ते बहुमत आमच्या पाठीत खंजीर खुपसून काढून घेण्यात आलं आणि अशाप्रकारचं सरकार हे किती अंतर्विरोधाने भरलं जातं हे आपल्याला आजच्या विजयानंतर पाहायला मिळालेलं आहे.' अशी टीकाच देवेंद्र फडणवीसांनी शिवसेना आणि महाविकास आघाडीवर केली.

'सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे की, आमचे जे तिसरे उमेदवार निवडून आले आहेत त्यांनी शिवसेनेच्या प्रथम उमेदवारापेक्षा म्हणजे संजय राऊतांपेक्षाही जास्त मतं घेतलेली आहेत. आमचे धनंजय महाडिक 41.56 मतं मिळाली जी शिवसेनेचे अधिकृत उमेदवार संजय राऊत यांच्यापेक्षा जास्त आहे.' अशी खोचक टीका देवेंद्र फडणवीसांनी राऊतांवर केली.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in