'अरे कोणाच्या बापाची औकाद आहे मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याची?', फडणवीसांचा शिवसेनेवर हल्ला
devendra fadnavis criticized to shivsena and cm uddhav thackeray over mumbai issue (फोटौ सौजन्य: Video Grab)

'अरे कोणाच्या बापाची औकाद आहे मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याची?', फडणवीसांचा शिवसेनेवर हल्ला

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याची कोणाच्या बापाची औकाद नाही असं म्हणत शिवसेनेच्या टीकेला उत्तर दिलं आहे. पाहा नेमंक काय म्हणाले फडणवीस.

मुंबई: मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा भाजपचा डाव आहे असा आरोप मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बीकेसीमधील सभेत केला होता. त्यांच्या याच आरोपाला भाजप नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मुंबईतील हिंदी भाषी संमेलनात जोरदार उत्तर दिलं आहे.

'यांच्याजवळ मुद्दा नसला की, लगेच.. 'मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचं षडयंत्र', पाठच केलंय. अरे कोणाच्या बापाची औकाद आहे मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याची? कोण तोडू शकतं?' असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईच्या मुद्द्यावरुन शिवसेनेवर तुफान टीका केली आहे.

पाहा मुंबईवरुन देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी शिवसेनेवर नेमकी काय टीका केली?

'उद्धवजींच भाषण हे सोनियाजींना समर्पित होतं. तुम्ही लक्षात घ्या. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबाबत जी भाषा काँग्रेस बोलते तीच भाषा उद्धव ठाकरे बोलले आहेत. हे सोनियाजींना सांगण्याकरता होतं. मी हिंदुत्व-हिंदुत्व करतोय, मतं-बितं पाहिजेत. पण बघा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला शिव्या दिल्या. मी तुमचाच आहे. माझा सवाल आहे या ठिकाणी खरं म्हणजे उद्धवजींना हे माहिती तरी आहे का, की, प. पूज्यनीय हेडगेवार यांचं नाव स्वातंत्र्यसंग्राम सेनानींच्या यादीमध्ये आहे. ते जेलमध्ये अनेक कार्यकर्ते त्यांच्यासोबत जेलमध्ये होते. याची माहिती तरी तुम्हाला आहे का?'

'दुसरीकडे जेव्हा आणीबाणी लागली आणि सगळ्यांना जेव्हा जेलमध्ये टाकलं तेव्हा तुम्ही कोणाच्या बाजूने होतात त्यावेळी तुम्ही आणीबाणी, इंदिरा गांधी यांच्या बाजूने होता.'

'मला मात्र एक मस्त वाटतं यांच्याजवळ मुद्दा नसला की, लगेच.. 'मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचं षडयंत्र', पाठच केलंय. अरे कोणाच्या बापाची औकाद आहे मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याची? कोण तोडू शकतं?'

'पण मी त्यांना पुन्हा इतिहासाकडे नेतो. काल जनसंघाबद्दल बोलले. अरे तुमचंच गॅझेटिअर बघा. महाराष्ट्र शासनाने छापलेल्या गॅझेटिअरमध्ये स्पष्टपणे लिहलेलं आहे की, संयुक्त महाराष्ट्र समितीत जे घटक होते त्या घटकातील एक घटक हा जनसंघ होता. एवढंच नाही तर तुमचा पक्ष पैदाही झाला नव्हता त्यावेळेला या ठिकाणी संयुक्त महाराष्ट्र समिती आणि जनसंघाच्या तिकिटावर दोन उमेदवार निवडून आले होते. त्यामुळे काही मनात येईल ते बोलून टाकायचं. इतिहास पाहायचा नाही, वाचायचा नाही.'

'जेव्हा बोलायला काही नसेल तेव्हा मुंबई वेगळी करणार. अरे मुंबई वेगळी करायचीय आम्हाला महाराष्ट्रातून नाही तर तुमच्या भ्रष्टाचारापासून वेगळी करायची आहे. तुमच्या दुराचारापासून वेगळी करायची आहे. याच महाराष्ट्रात महाराष्ट्राला भूषण वाटेल अशी मुंबई तयार करायची आहे.'

'मी त्यांना पुन्हा एकदा सांगू इच्छितो, हे तुमचं चाललं आहे की, मुंबईच्या संदर्भात मुंबई तोडण्याची भाषा वैगरे.. तुम्हाला पुन्हा आठवण करुन देतो लक्षात ठेवा तुम्ही म्हणजे मुंबई नाही, तुम्ही म्हणजे मराठी नाही, तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही. तुम्ही म्हणजे हिंदुत्व नाही.'

devendra fadnavis criticized to shivsena and cm uddhav thackeray over mumbai issue
'बाबरी पाडली तेव्हा माझं वजन 128 किलो', फडणवीस प्रचंड चिडले, मुख्यमंत्र्यांना म्हणाले...

'काय म्हणाले.. आम्ही मुंबईचे बाप.. अरे अनौरस कुत्रा ऐकलं होतं, अनौरस बाप कुठनं पैदा झालं माहित नाही. अरे मुंबई, महाराष्ट्राचा एकच बाप आहे आणि त्या बापाचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज. दुसरा बाप नाहीए.' असं म्हणत देवेंद्र फडणवीसांनी शिवसेनेवर अक्षरश: टीकेची झोड उठवली.

दरम्यान, आता देवेंद्र फडणवीस यांच्या या घणाघाती टिकेनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेना नेमकी काय उत्तर देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in