'मैं तो बाबरी गिरा रहा था.. तुझको मिर्ची लगी तो..', फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर तुफान टीका

'अरे मैं तो अयोध्या जा रहा था.. मैं तो बाबरी गिरा रहा था.. मैं तो मंदिर बना रहा था.. तुझको मिर्ची लगी तो मैं क्या करु?' अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर केली आहे.
devendra fadnavis has criticized cm uddhav thackeray from babri masjid
devendra fadnavis has criticized cm uddhav thackeray from babri masjid(फोटौ सौजन्य: Video Grab)

मुंबई: 'अरे मैं तो अयोध्या जा रहा था.. मैं तो बाबरी गिरा रहा था.. मैं तो मंदिर बना रहा था.. तुझको मिर्ची लगी तो मैं क्या करु?' अशा शब्दात भाजपचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना प्रत्युत्तर दिलं. ते आज (15 मे) मुंबईत हिंदी भाषी सभेला संबोधित करत होते.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल (14 मे) बीकेसी मैदानावरील शिवसेनेच्या सभेतून देवेंद्र फडणवीसांवर हल्ला चढवला होता. याच टीकेला आज देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

पाहा देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले:

'तुझको मिर्ची लगी तो मैं क्या करु?'

'मी जेव्हा म्हणालो की, राम जन्मभूमीच्या आंदोलनात अयोध्यात तुमचा एकही नेता नव्हता तर किती मिरची लागली. अरे मैं तो अयोध्या जा रहा था.. मैं तो बाबरी गिरा रहा था.. मैं तो मंदिर बना रहा था.. तुझको मिर्ची लगी तो मैं क्या करु?'

'अरे हा... मी गेलो होतो बाबरी पाडण्याकरता याचा मला अभिमान आहे. अरे उद्धवजी 1992 साली फेब्रुवारीत मी नगरसेवक झालो. जुलैमध्ये मी वकिल झालो आणि डिसेंबर नगरसेवक अॅडव्होकेट देवेंद्र फडणवीस बाबरी पाडायला गेला होता.'

'सहलीला चला.. सहलीला चला.. सहलीला चला.. नाय.. अरे, लाठी-गोली खाएँगे मंदिर वही बनायेंगे.. हे बोलत आम्ही गेलो होतो. तुम्ही गेले होते सहलीला. आम्ही नव्हतो गेलो सहलीला. अरे तेव्हा तर सोडाच.'

'तेव्हा मी बदायूच्या जेलमध्ये देखील गेलो होतो'

'त्याच्या एक वर्ष आधी म्हणजे जेव्हा पहिली कार सेवा झाली आणि आमच्या कोठारी बंधूंना त्या ठिकाणी मारलं तरीही भगवा झेंडा त्या बाबरी ढाच्याच्यावर आमच्या कोठारी बंधूंनी लावला. त्याही कार सेवेला हा देवेंद्र फडणवीस गेला होता. नुसता गेलाच नव्हता तर अनेक दिवस बदायूच्या जेलमध्ये देखील होता.'

'आजही त्या बदायूचा तुरुंग लक्षात आहे जिथे आम्ही वाट पाहायचो की, चला आम्ही तर पोहचलोय. कोणी तरी शिवसैनिक इथे पोहचेल. कोणी नाही आलं. आम्ही वाट पाहत राहिलो. पण कोणीच आलं नाही. एवढंच नाही त्याच्याआधी 19 व्या वर्षी काश्मीरमध्ये हिंदूवर अत्याचार चालू झाला तर विद्यार्थी परिषदेसोबत त्या काश्मीरमध्ये देखील जाऊन दहशतवाद्यांचा मुकाबला करण्याकरिता गेलेला हा देवेंद्र फडणवीस आहे.'

'आम्ही सोन्याचा चमचा तोंडात घेऊन पैदा झालेलो नाही.'

'आम्ही फाइव्ह स्टारचं राजकारण केलं नाही. जमिनीवरचं राजकारण केलं. जेव्हा कधी जायचो तेव्हा-तेव्हा झोपलो प्लॅटफॉर्म आणि फूटपाथवर झोपलो. त्यामुळे आम्ही संघर्ष केलेले आहोत. त्यामुळे इथवर पोहचलो. सोन्याचा चमचा तोंडात घेऊन पैदा झालेलो नाही.'

'जेव्हा अयोध्येत बाबरी पडत होती तेव्हा आम्ही म्हणत होतो लाठी-गोली खाएँगे मंदिर वही बनाएँगे. तेव्हा सांगा शेपटा कोणी टाकल्या होत्या आणि कुठे टाकल्या होत्या. आम्हाला एकदा सांगा उद्धवजी.'

devendra fadnavis has criticized cm uddhav thackeray from babri masjid
Kirit Somaiya: 'जो बायकोचा नाही होऊ शकला तो महाराष्ट्राचा काय होणार?', सोमय्यांची बोचरी टीका

'कार सेवकांची मस्करी करणाऱ्यांना मी सांगू इच्छितो की, जेव्हा-जेव्हा या देशाला आवश्यकता असेल तेव्हा-तेव्हा आम्ही कारसेवक बनून जाऊ आणि या देशाच्या धर्म, संस्कृती आणि सुरक्षेला त्याची रक्षा करण्यासाठी आम्ही जाऊ.' असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर तुफान टीका केली.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in