
योगेश पांडे, प्रतिनिधी, नागपूर
देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री झाले याचं आश्चर्य सगळ्या महाराष्ट्राला वाटलं होतं मात्र आता देवेंद्र फडणवीस यांनीच हे सगळं कसं घडलं? त्याचं कारण सांगितलं आहे. नागपूरमध्ये देवेंद्र फडणवीस यांचा सत्कार झाला. त्यावेळी त्यांनी सविस्तर उतर दिलं.
एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करा हा प्रस्ताव मीच घेऊन गेलो होतो. जो आमच्या वरिष्ठांनी मान्य केला. मी सत्तेच्या बाहेर राहायचं हेच ठरलं होतं. मात्र नंतर मला जे. पी. नड्डा यांनी फोन केला. तसंच मला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही मला फोन केला. त्यानंतर माझ्या वरिष्ठांच्या निर्णयाचं पालन करत मी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. मला त्याचा कुठेही कमीपणा वाटलेला नाही. माझं संपूर्ण सहकार्य एकनाथ शिंदे यांना असणार आहे
महाविकास आघाडी सरकारने महाराष्ट्राच्या विकासाच्या गतीला आडकाठी लावून रोड ब्लॉक्स तयार केले. विकासाचे सगळे प्रकल्प थांबवले. शेतकरी हिताचे निर्णय थांबवले गेले. मी वारंवार उल्लेख केला होता की विदर्भ आणि मराठवाडा या दोन मागास भागांवर प्रचंड अन्याय ठाकरे सरकारने केला. मला माझं मुख्यमंत्रीपद गेल्याचं दुःख कधीच नव्हतं. मात्र महाराष्ट्राच्या विकासाला जी खिळ बसली त्याची खंत वाटत होती.
या सगळ्या गोष्टी सहन होत नव्हत्या. एक सक्षम विरोधी पक्षनेता म्हणून मी काम केलं हे महाराष्ट्राने पाहिलं. कोरोना काळातही मी एकही दिवस घरी बसलो नाही. लोकांना सुविधा मिळाली पाहिजे यासाठी झटलो. मलाही कोरोना झाला होता त्यावेळी मी सरकारी रूग्णालयातच बरा झाला. सक्षम विरोधी पक्षनेता म्हणून काम करताना मला रोज दिसत होता. शिवसेनेतली अस्वस्थता रोज दिसत होती. शिवसेनेच्या आमदारांसमोर हा प्रश्न पडलाच होता की उद्या लोकांसमोर जाऊ तेव्हा काय सांगायचं?
बाळासाहेबांनी जे हिंदुत्व निर्माण केलं, त्यापासून फारकत घेऊन हे सरकार स्थापन केलं गेलं. शिवसेनेच्या जोरावर इतर पक्ष मजूबत कसे झाले हे शिवसेनेचे आमदार, कार्यकर्ते सगळे पाहात होते. त्यामुळेच शिवसेनेत उठाव झाला, त्या उठावाला आम्ही साथ दिली असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. एकनाथ शिंदे आणि इतर आमदार आमच्यासोबत आले. त्यानंतर आमच्या पक्षाने हा निर्णय केला की एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करायचं. आम्ही सत्तेसाठी हपापले लोक नाही. आम्हाला मिळालेलं जनमत चोरून नेण्यात आलं. त्यामुळे आम्ही शिवसेनेचाच मुख्यमंत्री त्या खुर्चीवर बसला आहे.
आमचे नेते माननीय मोदीजी, अमित शाह, जे.पी. नड्डा यांच्या सगळ्यांच्या संमतीने हा निर्णय घेण्यात आला. एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करा हा प्रस्ताव मीच घेऊन गेलो होतो. जो आमच्या वरिष्ठांनी मान्य केला. मी सत्तेच्या बाहेर राहायचं हेच ठरलं होतं. मात्र नंतर मला जे. पी. नड्डा यांनी फोन केला. तसंच मला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही मला फोन केला. त्यानंतर माझ्या वरिष्ठांच्या निर्णयाचं पालन करत मी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. मला त्याचा कुठेही कमीपणा वाटलेला नाही. माझं संपूर्ण सहकार्य एकनाथ शिंदे यांना असणार आहे असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
महाराष्ट्राच्या विकासाची गाडी पुन्हा रूळावर आणणं हे आमचं लक्ष्य आहे. महाराष्ट्र देशातलं क्रमांक एकचं राज्य केल्याशिवाय आम्ही राहणार नाही असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. मी आज नागपूरमध्ये आहे म्हणून खास करून सांगतो महाराष्ट्रातल्या विदर्भ, मराठवाडा या मागास भागांचा विचार करणारं सरकार आता आलं आहे. कुणावरही अन्याय होणार नाही याची ग्वाही देतो असंही देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं.
आज नागपूरमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा भव्य सत्कार सोहळा पार पडला. एका विशेष रथातून त्यांची मिरवणूक काढण्यात आली. त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी अमृता फडणवीसही होत्या. यावेळी रॅलीमध्ये बोलत असतानाही गनिमी काव्याने सरकार का आणलं? हे स्पष्ट केलं.