"मर्सिडिझ बेबींना कारसेवकांचा संघर्ष कसा कळणार?" फडणवीसांचं आदित्य ठाकरेंना उत्तर

जाणून घ्या आणखी काय म्हणाले आहेत देवेंद्र फडणवीस?
"मर्सिडिझ बेबींना कारसेवकांचा संघर्ष कसा कळणार?" फडणवीसांचं आदित्य ठाकरेंना उत्तर

योगेश पांडे, प्रतिनिधी, नागपूर

देवेंद्र फडणवीस यांनी १ मे रोजी झालेल्या सभेत एक वक्तव्य केलं होतं त्यामध्ये ते म्हणाले होते की बाबरी ढाचा पाडला तेव्हा मी तिथे हजर होतो. याबाबत आदित्य ठाकरेंना विचारलं असता देवेंद्र फडणवीस तर १८५७ च्या उठावातही असतील असं म्हणत आदित्य ठाकरेंनी त्यांची खिल्ली उडवली होती. आता आज देवेंद्र फडणवीस यांनी या खिल्लीवरून आदित्य ठाकरेंना मर्सिडिझ बेबी म्हणत त्यांना प्रत्युत्तर दिलं आहे.

"मर्सिडिझ बेबींना कारसेवकांचा संघर्ष कसा कळणार?" फडणवीसांचं आदित्य ठाकरेंना उत्तर
१८५७ च्या लढ्यातही देवेंद्र फडणवीस यांचं मोठं योगदान होतं, आदित्य ठाकरेंचा टोला

काय म्हणाले आहेत फडणवीस?

"सोन्याचा चमचा जन्माला आलेल्या ज्या मर्सिडिझ बेबी आहेत त्यांना संघर्ष करावाही लागला नाही आणि त्यांनी संघर्ष पाहिलेलाही नाही. त्यामुळे कारसेवकांच्या संघर्षांची थट्टा ते निश्चितपणे उडवू शकतात. पण आमच्यासारखे हजारो नाही लाखो कारसेवक बाबरी ढाचा पाडला तेव्हा तिथे होते. आम्हाला त्याचा अभिमान आहे. त्यावेळी मी स्वतः तिथे होतो त्यावेळी मी नगरसेवक होतो. मला असं वाटतं की ते १८५७ चं जे ते म्हणाले त्याबद्दल सांगेन. मी हिंदू आहे त्यामुळे माझा मागचा जन्मावरही विश्वास आहे पुनर्जन्मावरही विश्वास आहे. त्यामुळे मागच्या जन्मात मी असेन तर तात्या टोपे आणि झाशीच्या राणीसोबत मी लढत असेन, आणि तुम्ही असाल तर तुम्ही इंग्रजांशी युती केली असेल कारण आता तुम्ही युती अशा लोकांशी केली आहे जे १८५७ ला स्वातंत्र्ययुद्ध मानत नाहीत. ते या उठावाला शिपायचं बंड म्हणतात. त्यामुळे ठीक आहे तुम्ही असं म्हणणं" असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी आदित्य ठाकरेंना प्रत्युत्तर दिलं आहे.

"मर्सिडिझ बेबींना कारसेवकांचा संघर्ष कसा कळणार?" फडणवीसांचं आदित्य ठाकरेंना उत्तर
History : आजच्याच दिवशी सुरू झाला होता १८५७ चा उठाव, मंगल पांडे यांनी चालवली होती पहिली गोळी

काय आहे प्रकरण?

बाबरी मशिदीचा ढाचा पाडला जात होता तेव्हा मी तिथे होतो असं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. १ मे रोजी झालेल्या सभेत त्यांनी हे वक्तव्य केलं आहे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या टीकेला उत्तर दिलं. त्यानंतर आदित्य ठाकरे यांनी त्यांना टोला लगावला.

काय म्हणाले होते आदित्य ठाकरे?

१८५७ च्या उठावातही त्यांचं (देवेंद्र फडणवीस) यांचं खूप मोठं योगदान आहेच स्वतःच. असो.. पण या गोष्टीत जाण्यापेक्षा आणि वादात जाण्यापेक्षा राम मंदिर होतं आहे हे चांगलं आहे. कोर्टाने निकाल दिला. शिवसेनेने संघर्ष केला. चांगलं काम होतं आहे. आता मंदिर होतं आहे चांगली गोष्ट आहे. सगळ्या राजकीय पक्षांनी आता बेरोजगारीचा जो प्रश्न आहे त्यावर बोललं पाहिजे. चर्चा केली पाहिजे. आम्ही विकासाची कामं करत आहोत असंही ते म्हणाले होते.

Related Stories

No stories found.
logo
Mumbai Tak
www.mumbaitak.in