'देवेंद्र फडणवीस रात्री वेशांतर करायचे अन्...', सरकार स्थापनेवर अमृता फडणवीसांचा गौप्यस्फोट

मुलाखतीत एकनाथ शिंदे सरकार कसं स्थापन झालं देवेंद्र फडणवीस हे कसे वेश बदलून जात होते हे अमृता फडणवीस यांनी सांगितलं
amruta fadnavis
amruta fadnavis

नागपूर: महाराष्ट्रात मागच्या १५ दिवस राजकीय नाट्य पाहायला मिळाले. शिवसेनेचे बंडखोर नेते आणि सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्यासोबत शिवसेनेच्या ४० आमदारांना घेऊन भाजपसोबत सरकार स्थापन केले आहे. याबाबत देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी एक महत्त्वाची माहिती दिली आहे.

आपल्या भाषणात एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) हे सरकार कसे स्थापन झाले याची संपूर्ण कथाच सांगितली. मी आणि देवेंद्र फडणवीस रात्री भेटायचो असेही शिंदेंनी भर सभागृहात सांगितले. त्यानंतर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनी मोठी गौप्यस्फोट केला आहे.

''देवेंद्रजी मुख्यमंत्री बनणार नाहीत हे...''

एबीपी माझा या वृत्तवाहिनीशी बोलताना अमृता फडणवीस म्हणाल्या '' देवेंद्र फडणवीस कोणत्याही पदावर असो ते फक्त सेवा करतात, त्यामुळे त्यांनी सेवा करत राहो यामध्ये त्यांचेही समाधान आहे. महाराष्ट्रमधील परिस्थीती खराब होत होती त्यामुळे राज्यात असे होईल याची अपेक्षा होती. देवेंद्रजी मुख्यमंत्री बनणार नाहीत हे मला अगोदर माहित होते, त्याचबरोबर ते कोणतंही पद स्वीकारणार नाहीत हे देखील मला माहित होते. कारण एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस दोघेही सेवक आहेत त्यामुळे ते चांगलं काम करतील याची अपेक्षा आहे'' असे अमृता फडणवीस म्हणाल्या आहेत.

देंवेंद्र फडणवीस वेशांतर करायचे अन्...

पुढे बोलताना त्यांनी मोठा गोप्यस्फोट केला आहे. त्या म्हणाल्या हे सर्व घडत असताना देवेंद्र फडणवीस हुडी घालून, मोठे चष्मे लावून बाहेर पडायचे त्यामुळे ते मलाही ओळायला येत नव्हते. मी विचारले तर मला म्हणायचे काही नाही. थोडक्यात काय तर देवेंद्र फडणवीस हे एकनाथ शिंदेना वेशांतर करुन भेटत होते असा गोप्यस्फोट स्वत: अमृता फडणवीस यांनी केला आहे.

amruta fadnavis
एकनाथ शिंदेंच्या नाटकाने राणे, भुजबळांच्या नाटकावर पडदा पडला; सामानातून मुख्यमंत्र्यांवर टिका

सामानातून 'नाईट किंग' असा उल्लेख

देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांचा ' नाईट किंग' म्हणून उल्लेख सामनाच्या केला आहे. कारण मुख्यमंत्री शिंदेंनी विधानसभेत आपण देवेंद्र फडणवीसांना कसे भेटत होतो याचा किस्सा भर सभागृहात सांगितला होता. आगामी निवडणुकीत दोनशे जागा निवडून आणण्याचा दावा शिंदेंनी केला आहे. याच सर्व अनुषंगाने सामानातून टिका करण्यात आली आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in