''अपमान करायचा होता म्हणून उपमुख्यमंत्री पद दिलं?; फडणवीसांना शंकरराव चव्हाण केलं''

महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री म्हणून काल एकनाथ शिंदे यांनी शपथ घेतली तर उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली.
Devendra Fadnavis was made Shankarrao Chavan says prakash Ambedkar
Devendra Fadnavis was made Shankarrao Chavan says prakash AmbedkarMumbai Tak

पुणे: महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री म्हणून काल एकनाथ शिंदे यांनी शपथ घेतली तर उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली. राज्यातील लोकांबरोबरच राजकीय मंडळींनाही हा धक्का होता. देवेंद्र फडणवीस यांचा दिल्लीतील लोकांनी गेम केला अशी चर्चा कालपासून राज्यामध्ये आहे. आज सकाळी भाजपच्या जल्लोषाला देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), प्रविण दरेकर, आशिष शेलार असे महत्त्वाचे नेते उपस्थीत होते. यासंपूर्ण प्रकरणावर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.

देवेंद्र फडणवीस यांचा केंद्रातील नेतृत्वाने शंकरराव चव्हाण केला. दिल्लीहून फडणवीस यांना आदेश आले म्हणून ते उपमुख्यमंत्री झाले असं ट्विट मी केलं आहे. फडणवीसांचा अपमान करायचा होता म्हणून उपमुख्यमंत्री पद दिलं आहे का? हे केंद्रात विचारायला हवं. सरकार वर नियंत्रण ठेवायचे होते तर चंद्रकांत पाटील पण होते ना? असे म्हणत प्रकाश आंबेडकरांनी टोला लगावला आहे.

पुढे आंबेडकर म्हणाले की 11 जुलै रोजी पीटिशन शिवसेनेकडे गेलं तर आपली नामुष्की होऊ नये म्हणून फडणवीस यांनी शिंदेंना मुख्यमंत्री पद दिलं असावं. राज्यपालांनी फ्लोअर टेस्ट करण्याच्या सूचना दिल्या आहेत, सभागृहात कामकाज करुन अध्यक्ष निवडण्याच्या अधिकार दिला नाही. हे सरकार व्हीपचं असेल. कुठल्या ही पक्षात व्हीपची नेमणूक पक्षाच्या अध्यक्ष करत असतो आणि सेनेची वर्किंग कमिटी याच मार्गावर असल्याचे प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) म्हणाले.

शिवसेना पक्ष हा उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचाच आहे हे मान्य करावा लागेल. वेगळा गट जो झाला आहे ते ही आज शिवसेना आमची आहे असं म्हणत आहेत. प्रकाश आंबेडकरांचा स्वत:चा कायद्याचा अभ्यास आहे, त्यामुळे त्यांनी पुढील प्रकिया सांगितली आहे. याच मुद्द्यावर ते म्हणाले ११ जुलै रोजी विश्वास धारक ठराव होईल असं वाटतं. गटनेत्याला असला कुठलाही अधिकार नसतो. राज्यपालांना ज्या वेळी वाटतं की या सरकारकडे बहुमत नाही तेव्हा ते विरोधी पक्षाला विचारू शकतात त्यामुळे हे चुकीचे वाटत नाही असे आंबेडकर यावेळी म्हणाले.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in