'धर्मवीर' सिनेमा ठरला ठाकरे-शिंदेच्या संघर्षाचं कारण?

धर्मवीर सिनेमाच्या स्पेशल स्क्रिनिंगमधून उद्धव ठाकरे का उठून गेले होते? त्यानंतर एकनाथ शिंदे नाराज झाल्याच्या चर्चा का रंगल्या होत्या?
'धर्मवीर' सिनेमा ठरला ठाकरे-शिंदेच्या संघर्षाचं कारण?
'Dharmaveer' movie became the reason for Thackeray-Shinde conflict?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांचे संबंध बिघडायला खरी सुरुवात झाली ती गेल्या महिन्यापासून, असं शिवसेनेतील सूत्रं सांगतात. या तणावाला आनंद दिघे यांच्यावर आलेला 'धर्मवीर-मुक्काम पोस्ट ठाणे' हा चित्रपट कारण ठरला आहे.या चित्रपटात राज ठाकरे आणि नारायण राणे या दोन व्यक्तीरेखा ज्या प्रकारे रेखाटण्यात आल्या आहेत, त्या उद्धव ठाकरेंना पसंत नसल्याचे समोर आलं.

या मुद्द्यावरून उद्धव ठाकरे नाराज झाले आणि त्यानंतर एकनाथ शिंदेंना पक्षाकडून महत्त्वाच्या निर्णयप्रक्रियेत डावलण्यास सुरुवात झाली, अशी जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. तसेच धर्मवीर सिनेमातून एकनाथ शिंदे यांनी स्वतची इमेज बिल्डिंग करण्याचाही पूरेपूर प्रयत्न केला आहे अशीही चर्चा शिवसेनेच्या गोटात आहे

या चित्रपटाच्या शेवटी एक दृश्य आहे. तत्कालीन विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे रुग्णशय्येवर पडलेल्या धर्मवीर आनंद दिघेंना भेटण्यासाठी येतात. धर्मवीर, हिंदुत्वाचे काम अजून बाकी आहे, असे अंथरुणाला खिळून कस चालेल? असा सवाल ते दिघे यांना करतात. त्यावर आनंद दिघे राज ठाकरेंना उद्देशून ‘यापुढे हिंदुत्वाची जबाबदारी तुमच्या खांद्यावर’ असे म्हणतात. राज ठाकरे आणि आनंद दिघे यांच्यावर चित्रीत झालेला हा प्रसंग मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना खुपला होता आणि त्यावरून ते एकनाथ शिंदेवर नाराज होते, असे सांगितले जातं.

Dharmveer Movie Premotion Actor Prasad Oak
Dharmveer Movie Premotion Actor Prasad Oak

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासाठी धर्मवीर चित्रपटाचा खास शो आयोजित करण्यात आला होता. आनंद दिघे हे मिलिंद नार्वेकर यांच्या घरी जातात आणि गणपतीचे दर्शन घेतात, असा एक सीन चित्रपटात दाखवण्यात आला आहे. हा सीन होईपर्यंतच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चित्रपट पाहिला. त्यानतंर ते तडक उठले आणि थिएटरमधून बाहेर पडले. त्यानंतर राज ठाकरे आणि आनंद दिघे यांचा सीन चित्रपटात दिसतो. तो पाहणे टाळण्यासाठीच मुख्यमंत्री बाहेर पडल्याची चर्चा त्यावेळी रंगली होती.

'Dharmaveer' movie became the reason for Thackeray-Shinde conflict?
'धर्मवीर' सिनेमा आनंद दिघेंच्या आडून एकनाथ शिंदेंचं महत्त्व वाढवण्यासाठी आणला गेला का?

अर्थात, आपल्याला दिघे साहेबांचा मृत्यू झाल्याचे पाहवले नसते, म्हणूनच आपण बाहेर पडलो, असे मुख्यमंत्र्यांनी माध्यमांना सांगितले होते.

‘धर्मवीर’ चित्रपटात राज ठाकरे आणि नारायण राणे यांना दाखवण्यात आले आहे. धर्मवीर आनंद दिघेंच्या अखेरच्या काळात हे दोन्ही नेते त्यांच्या संपर्कात होते; मात्र या गोष्टीमुळे उद्धव ठाकरे हे एकनाथ शिंदेंवर नाराज होते. राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकीदरम्यान महत्त्वाच्या निर्णयप्रक्रियेत एकनाथ शिंदेंना सहभागी करून न घेण्यामागेही हेच कारण असल्याची चर्चा आहे. आणि इथूनच त्यांच्यातील संघर्षाला खऱ्या अर्थाने सुरवात झाली अशी चर्चा आता जोरदार रंगू लागली आहे. मागच्या महिन्यात हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला.

धर्मवीर या सिनेमाची सोशल मीडियावर चर्चाही चांगलीच झाली. तसंच सिनेमा हिटही झाला. आता हा सिनेमाच उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात वादाची ठिणगी पडण्यास कारण ठरला अशीही चर्चा होते आहे.

धर्मवीर या सिनेमात आनंद दिघे यांची भूमिका प्रसाद ओकने साकारली आहे. तर क्षितिज दाते या अभिनेत्याने एकनाथ शिंदे यांची भूमिका साकारली आहे. प्रवीण तरडे यांनी हा सिनेमा दिग्दर्शित केला आहे. या सिनेमाच्या प्रमोशनसाठी प्रसाद ओक आणि प्रवीण तरडे यांच्यासह एकनाथ शिंदेही अनेक कार्यक्रमांमध्ये गेले होते. आता हा सिनेमाच ठाकरे-शिंदे वादाचं मूळ ठरला आहे असं बोललं जातं आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in