Amravati : ठाकरेंचा उमेदवार काँग्रेसने रात्रीत पळवला अन् उमेदवारीही दिली!

Congress : महाविकास आघाडीकडून अमरावती पदवीधर मतदारसंघाचा उमेदवार जाहीर
maharashtra mlc election for five seats : Uddhav Thackeray, Sharad Pawar And balasaheb Thorat
maharashtra mlc election for five seats : Uddhav Thackeray, Sharad Pawar And balasaheb ThoratMumbai Tak

अमरावती : महाविकास आघाडीकडून अमरावती पदवीधर मतदारसंघाची निवडणूक काँग्रेस लढविणार असून धीरज लिंगाडे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे आता भाजपचे रणजीत पाटील विरुद्ध महाविकास आघाडीचे धीरज लिंगाडे यांच्यात लढत होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. उद्या (१२ जानेवारी) काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत धीरज लिंगाळे उमेदवारी अर्ज भरणार आहेत.

यापूर्वी काँग्रेसमध्ये अमरावती पदवीधर मतदारसंघासाठी सुनील देशमुख, मिलिंद चिमोटे, डॉ. सुधीर ढोणे यांच्याही नावाची चर्चा होती. मात्र ऐनवेळी ही सर्व नावं मागे पडली आणि लिंगाडेंचं नाव पुढे आलं. धीरज लिंगाडे यांनी मंगळवारी (१० जानेवारी) रात्री शिवसेना (UBT) पक्षातून काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्यानंतर आज दुपारी काँग्रेसने त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा केली. विशेष म्हणजे शिवसेना (UBT) नेही या उमेदवारी मान्यता दिली असल्याची माहिती आहे.

कोण आहेत धीरज लिंगाडे?

धीरज लिंगाडे हे बुलडाण्याचे माजी शिवसेना जिल्हाप्रमुख आहेत. बुलढाण्याचे खासदार प्रताप जाधव यांचे ते कट्टर समर्थक समजले जात होते. मात्र शिवसेनेतील फुटीनंतरही लिंगाडे यांनी ठाकरेंसोबतचं राहणं पसंत केलं. लिंगाडे यांचे वडील रामभाऊ लिंगाडे हेही राजकारणात होते. ते शरद पवार यांचे कट्टकर समर्थक होते.

रामभाऊ लिंगाडे कोणत्याही सभागृहाचे सदस्य नसतांना शरद पवार यांनी त्यांना गृहराज्यमंत्री केलं होतं. पुढे शरद पवारांनी त्यांना विधानपरिषदेवर निवडून आणलं होतं. 1999 मध्ये शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केल्यावर रामभाऊ लिंगाडे यांनीही राष्ट्रवादीत प्रवेश केला. रामभाऊ लिंगाडे यांच्या निधनानंतर धीरज यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर ते पक्षाचे जिल्हाप्रमुख झाले.

शिवसेना (UBT) दीड वर्षांपूर्वीच सुरु केली होती तयारी :

दरम्यान, अमरावती पदवीधरसाठी शिवसेना (UBT) पक्षाने दीड वर्षांपूर्वीच तयारी सुरु केली होती. यासंदर्भात पक्षाचे खासदार अनिल देसाई यांनी अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यातील आमदार, खासदार आणि जिल्हाप्रमुखांना पक्षाच्या निवडणूक लढविण्याच्या निर्णयाचं पत्र पाठविलं होतं.

यात निवडणुकीची पूर्वतयारी, पदवीधर मतदार नोंदणी, बैठका अशी सर्व जबाबदारी धीरज लिंगाडे यांच्याकडे दिल्याचं सांगितलं होतं. त्यामुळे धीरज लिंगाडे हेच शिवसेनेचे पदवीधर मतदारसंघातील उमेदवार असणार हे स्पष्ट झालं होतं. मात्र आता धीरज लिंगाडे हे काँग्रेसचे उमेदवार असणार आहेत.

Related Stories

No stories found.
logo
Mumbai Tak
www.mumbaitak.in