मुंबई महापालिका,बेस्ट कर्मचारी, शिक्षकांसह आरोग्य सेविकांसाठी शिंदे सरकारचा मोठा निर्णय

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबई महापालिकेच्या निवडणुका लवकरच जाहीर होणार आहेत. या निवडणुकांची तारीख ठरायची आहे. मात्र या दृष्टीने शिंदे-फडणवीस सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. मुंबई महापालिकेचे कर्मचारी, महापालिकेचे शिक्षक, बेस्टचे कर्मचारी, आरोग्य सेविका या सगळ्यांच्याबाबतीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

काय आहे हा मोठा निर्णय?

मुंबई महापालिकेचे कर्मचारी, महापालिकेचे शिक्षक बेस्टचे कर्मचारी यांना २२हजार ५०० रूपये तर आरोग्य सेविकांना एक पगार दिवाळी बोनस म्हणून दिला जाईल, असा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केला. मुंबई महापालिकेतील चतुर्थ श्रेणी कर्मचारी तसेच अनुदानित शाळांतील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या बोनस बाबत मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे बैठक झाली. या बैठकीत ते बोलत होते.

या निर्णयामुळे किती कर्मचाऱ्यांना फायदा?

या निर्णयामुळे मुंबई महापालिकेचे ९३ हजार आणि बेस्टचे २९ हजार कर्मचाऱ्यांसह, शिक्षक, आरोग्य सेविका यांना दिवाळी बोनस मिळणार आहे. ‘कोव्हिडच्या बिकट परिस्थितीत मुंबई महापालिकेचे कर्मचाऱ्यांनी चांगले काम केले आहे. विकासकामांवर खर्च केलाच पाहिजे पण चांगले काम करणाऱ्यांना प्रोत्साहन दिले पाहिजे’ असे सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या सर्व कर्मचाऱ्यांना ‘ आनंदात दिवाळी साजरी करा. पण सगळ्यांनी मुंबईकरांसाठी मनापासून काम करा,’ असे आवाहन केले.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

बैठकीस खासदार राहुल शेवाळे, मुंबई महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक डॉ. आय. एस. चहल, अतिरिक्त आयुक्त अश्र्विनी भिडे, माजी आमदार किरण पावसकर, महापालिकेतील विविध कर्मचारी संघटनांचे पदाधिकारी आदी तसेच संदिप देशपांडे, शशांक राव, संतोष धुरी, उत्तम गाडे, अशोक जाधव यांच्यासह पालिकेच्या विविध विभागांचे अधिकारी आदी उपस्थित होते.

कोव्हिडच्या परिस्थितीत केलेल्या कामाचं कौतुक

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, कोव्हिडच्या बिकट परिस्थितीत महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी चांगले काम केले आहे. मुंबईतील कोव्हिडची परिस्थिती नियंत्रणात राखण्यात डॉक्टर्स, सर्व कर्मचारी यांचा मोलाचा वाटा आहे. विकास कामांवर खर्च झालाच पाहिजे. पण चांगले काम करणाऱ्यांना प्रोत्साहन ही मिळाले पाहिजे. विकास काम आणि आपल्या कर्मचाऱ्यांच्या कल्याण योजना यांचा समतोल राखावा लागेल. कर्मचारी आणि नागरिक आपलेच आहेत.’

ADVERTISEMENT

दिवाळी बोनसची घोषणा करतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, आनंदात दिवाळी साजरी करा. मुंबई महापालिकेशी निगडीत विकास कामांतील तसेच कर्मचाऱ्यांच्या अडीअडचणी या प्राधान्याने सोडवल्या जातील. सगळ्यांनी आता मुंबईकरांसाठी मनापासून काम केले पाहिजे. रस्ते आणि पायाभूत सुविधांची कामे नागरिकांच्या मनासारखी दर्जेदार, गुणवत्तापूर्ण व्हावीत यासाठी अभियंत्यांपासून ते सर्वांनीच दक्षता घ्यावी,’असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

ADVERTISEMENT

श्रमसाफल्य आणि आश्रय योजनेवरही चर्चा

बैठकीत चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांसाठीची ‘श्रमसाफल्य’ आणि ‘आश्रय’ या योजनेतील घरे उपलब्ध करून देण्याबाबतही चर्चा झाली. विविध विकास यंत्रणांना सोबत घेऊन अशी घरे मोठ्या संख्येने उपलब्ध व्हावीत यासाठी स्वतंत्र समन्वय बैठक घेण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.

दिवाळी बोनसची मागणी आणि त्यातील वाढीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महापालिकेच्या सर्वपक्षीय अशा कर्मचारी संघटनाना विश्वासात घेऊन बैठक घेतली. त्याबद्दल आणि बोनससाठी विविध घटकांचा सहानुभूतीने विचार केल्याबद्दल उपस्थित संघटना पदाधिकारी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT