'मला कारणे सांगत बसू नका, तातडीने मार्ग काढा', बैठकीतच संतापले मुख्यमंत्री ठाकरे

औरंगाबादचा पाणी प्रश्न हा प्रचंड तापलेला असल्याने आता यामध्ये स्वत: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लक्ष घातलं असून यासंबंधीच्या बैठकीत त्यांनी अधिकाऱ्यांना बरंच झापलं आहे.
'मला कारणे सांगत बसू नका, तातडीने मार्ग काढा', बैठकीतच संतापले मुख्यमंत्री ठाकरे
dont give me reasons find a way out immediately cm uddhav thackeray got angry during the meeting(फोटो सौजन्य: CMO Maharashtra)

मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची 8 जून रोजी औरंगाबादमध्ये जाहीर सभा होणार आहे. याच सभेच्या आधी औरंगाबादमधील पाणी प्रश्नाबाबत मुख्यमंत्र्यांनी येथील अधिकाऱ्यांची बैठक घेतली. ज्यावेळी मुख्यमंत्री संतापलेले दिसून आले. 'मला कारणे सांगत बसू नका, तातडीने मार्ग काढा. कोणत्याही परिस्थितीत औरंगाबाद शहरातील नागरिकांना व्यवस्थित पाणीपुरवठा झाला पाहिजे.' असं स्पष्ट शब्दात मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना सुनावलं.

औरंगाबाद शहरात पाण्याचा प्रश्न हा दिवसेंदिवस तीव्र होत चालला आहे. अशावेळी मुख्यमंत्र्यांनी स्वत: आता या प्रकरणात लक्ष घातलं असून अधिकाऱ्यांना फैलावर घेतलं आहे. दुसरीकडे विरोधक याच प्रश्नावरुन महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेवर प्रचंड टीका करत आहेत.

औरंगाबादच्या पाणी प्रश्नावरुन मुख्यमंत्री प्रचंड संतापले!

'मला कारणे सांगत बसू नका, तातडीने मार्ग काढा. कोणत्याही परिस्थितीत औरंगाबाद शहरातील नागरिकांना व्यवस्थित पाणीपुरवठा झाला पाहिजे. नवीन योजना पूर्ण होईस्तोवर कालावधी लागणार आहे. त्यामुळे सध्याच्या पाणी वितरणात किती आणि कसे पाणी वाढवून मिळेल याकडे विभागीय आयुक्तांनी स्वतः लक्ष घालून नागरिकांना योग्य रीतीने पाणी मिळेल हे पहावे.' असे स्पष्ट आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत.

'औरंगाबाद शहर पाणी पुरवठ्याच्या 1680 कोटी रुपयांची ही योजना गतीने पूर्ण व्हावी म्हणून या योजनेचा कालबध्द रीतीने आढावा मुख्यमंत्री संकल्प कक्षातून घ्यावा. या योजनेला वेगाने पूर्ण करण्यासाठी राज्य शासन काहीही कमी पडू देणार नाही, यातील उणिवा प्राधान्याने दूर करून शहरातील नागरिकांना व्यवस्थित पिण्याचे पाणी मिळेल.' असं आश्वासनही यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलं आहे.

dont give me reasons find a way out immediately cm uddhav thackeray got angry during the meeting
खड्ड्यात गेली आमदारकी ! पाणी प्रश्नावर आक्रमक झालेल्या राजू पाटील यांची उद्विग्न प्रतिक्रीया

'या नव्या पाणीपुरवठा योजनेचे कंत्राटदार संथ गतीने काम करीत असल्याच्या तक्रारी आहेत ही अतिशय गंभीर बाब असून त्यांनी कामाच्या बाबतीत हलगर्जीपणा दाखविल्यास विविध कायद्यांतर्गत त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल.' असा स्पष्ट इशाराच मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिला आहे.

आता स्वत: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या प्रकरणात लक्ष घातल्याने औरंगाबादकरांची पाणी टंचाई संपणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in