‘रोखठोक’मधील टीका एकनाथ शिंदेंच्या जिव्हारी?; उद्धव ठाकरेंना दिली दोन आव्हानं

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

राज्यात झालेल्या सत्तातरांपासून सामना अग्रलेखाबरोबरच रोखठोक सदरातूनही एकनाथ शिंदे आणि शिंदे गटाला लक्ष्य केलं जातंय. रोखठोकमधून एकनाथ शिंदेंना साबणाचा बुडबुडा म्हटलं गेलं. या टीकेवरून एकनाथ शिंदेंनी पलटवार केला आणि सामनाचे संपादक उद्धव ठाकरेंना दोन आव्हान दिली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची पैठणमध्ये सभा झाली. या सभेत एकनाथ शिंदेंनी रोखठोकमधून होणाऱ्या टीकेचा उल्लेख केला. रोखठोकमधील काही वाक्ये वाचून दाखवत शिंदेंनी ठाकरेंना थेट आव्हानच दिलं.

एकनाथ शिंदे रोखठोकमधील टीकेवर काय म्हणाले?

“कुणीतरी रोखठोकमध्ये लिहिलं, लाचार शिंदे गट. शिंदे गट म्हणजे साबणाचे बुडबुडे. शिंदे गटाने सुंता करून घेतलीये. टीका करण्या पलिकडे त्यांच्याकडे काही उरलं नाहीये. सकाळ, दुपार, रात्री असे टीकेचे तीन डोस घेतल्याशिवाय त्यांची मळमळ थांबत नाही”, असं उत्तर शिंदे यांनी दिलं.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

Eknath Shinde:”कसं काय पाटील बरं आहे का? दिल्लीत काय घडलं ते खरं आहे का?”

पुढे बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, “मुंबई आपली आहे. मुंबई मराठी माणसाची आहे. मुंबई गिळायला शिंदे गटाच्या खांद्यावर बंदूक ठेवून भाजप काम करत आहे, असा बिनबुडाचा आरोप करताहेत. मी एकच सांगेन की, त्यांना मुंबईचा इतका पुळका येतोय, तर पुढच्या रोखठोकमध्ये मुंबईत मराठी माणूस किती उरला याची आकडेवारी जाहीर करावी”, असं आव्हान शिंदेंनी ठाकरेंना दिलं.

ADVERTISEMENT

“हिंमत असेल, तर… गेली अनेक वर्ष मराठी माणसाच्या नावाने मतं मागितली आणि मग तोच मराठी माणूस मुंबई बाहेर का फेकला गेला. का तो विरार, बदलापूर, वांगणी इकडे गेला? याचं विश्लेषण रोखठोकमधून केलं पाहिजे. असं धाडस करणार नाहीत, पण त्यांनी करावं. फक्त निवडणूक आली की, मराठीचा मुद्दा पुढे करायचा. निवडणूक संपली की मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करताहेत, अमकं तमकं म्हणायचं. मराठी माणसाला शिवसेनेला संपवताहेत म्हणायचं. निवडणूक संपली की मराठी माणसाकडे दुर्लक्ष करायचं”, अशा शब्दात एकनात शिंदेंनी ठाकरेंना प्रत्युत्तर दिलं.

ADVERTISEMENT

‘हा एकनाथ शिंदे सकाळी ६ पर्यंत लोकांची कामं करतो’; सुप्रिया सुळेंच्या विधानावरून शिंदेंचा घणाघात

“आज लालबाग, दादर, परळ, भांडुप, मुलुंडमध्ये घराघरांत जाताहेत. असंच जर पूर्वी गेला असता. मराठी माणसाची दुःखं समजून घेतली असती तर मराठी टक्का कमी झाला नसता. हे दुर्दैवाने मी सांगू इच्छितो. आधी मतांसाठी वापर करायचा आणि नंतर दुसऱ्यावर खापर फोडायचं, ही त्यांची जुनी पद्धत आपल्याला माहिती पडलीये”, असंही शिंदे या सभेत म्हणाले.

“एकनाथ शिंदे म्हणजे साबणाचे बुडबुडे…”

रोखठोकमध्ये म्हटलंय की एकनाथ शिंदे म्हणजे साबणाचे बुडबुडे, पण याच साबणाने तुमची मस्त धुलाई केलीये. हे विसरू नका. आधी बाळासाहेबांचे विचार बुडवले, मग हिंदुत्व बुडवलं. बाळासाहेबांच्या विरोधकांशी हातमिळवणी केली. बाळासाहेबांना धोका कुणी दिला? त्यांचे विचार पायदळी कुणी तुडवले, हे तुम्ही आधी महाराष्ट्राला सांगा. हे माझं खुलं आव्हान आहे”, असं म्हणत एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना दुसरं आव्हान दिलं.

पैठणच्या सभेत पैसे देऊन गर्दी केली?; एकनाथ शिंदेंचा नाथांच्या नगरीतून उद्धव ठाकरेंवर पलट’वार’

“आम्ही शिंदे गट मोदी-शाहांचे हस्तक असल्याचंही म्हटलंय. याकूब मेमनच्या कब्रस्तानाचं उदात्तीकरण कुणाच्या काळात केलं. मग याकूब मेमन आणि दाऊदचं हस्तक होण्यापेक्षा ज्यांनी बाळासाहेबांचे विचार पुढे नेले, त्या मोदी शाहांचे हस्तक होणं केव्हाही चांगलं”, असं उत्तर रोखठोकमधील टीकेला शिंदेंनी दिलं.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT