'मातोश्री'वर कधी जाणार आहात?; काय म्हणाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) सध्या गोव्यात असून, गोव्यात असलेल्या आमदारांना घेऊन ते मुंबईत येणार आहेत...
'मातोश्री'वर कधी जाणार आहात?; काय म्हणाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे?

महाराष्ट्राच्या राजकारणाला गुरूवारी नवी कलाटणी मिळाली. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. शिवसेनेविरोधात बंड केल्यानं शिवसेना पक्षप्रमुख आणि शिंदे यांच्यात दुरावा आला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री झालेले एकनाथ शिंदे मातोश्रीवर जाणार का आणि कधी जाणार याची सगळ्यांनाच उत्सुकता आहे. हाच प्रश्न शिंदे यांना विचारण्यात आला. त्यावर त्यांनी अडखळतच उत्तर दिलं.

एकनाथ शिंदे यांनी गोव्यात पोहोचल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. विश्वासदर्शक ठरावाबद्दल शिंदे म्हणाले, "बहुमत चाचणी ही औपचारिकता राहिली आहे. भाजपचे आमदार आणि आम्ही असा १७५चा आकडा होतो. या ५० आमदार सत्तेपासून दूर झाले, ही ऐतिहासिक घटना आहे. कारण लोक सत्तेकडे जात असतात."

"आमदारांनी घडवलेल्या एकजुटीतून हा विजय झाला आहे. हा बाळासाहेबांच्या हिंदुत्वाच्या विचारांचा, आनंद दिघेंच्या शिकवणीचा विजय आहे. महाराष्ट्रात एक इतिहास आमच्या आमदारांनी घडवलाय. ५० आमदारांचं अभिनंदन करतो आणि भाजपला धन्यवाद देतो," असं ते म्हणाले.

'मातोश्री'वर कधी जाणार आहात?; काय म्हणाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे?
देवेंद्र फडणवीस-धनंजय मुंडे यांची मध्यरात्री १२ वाजता भेट; दोघांमध्ये अर्धा तास झाली चर्चा
"त्यांच्याकडे (भाजप) जवळपास ११५ ते १२० बहुमत असताना माझ्यासारख्या बाळासाहेबांच्या सैनिकाला पाठिंबा दिला. मोठं मन दाखवलं, मुख्यमंत्री पदासाठी समर्थन दिलं म्हणून मोदी, शाह, नड्डा यांचे अभिनंदन करतो. देवेंद्र फडणवीसांना मनापासून धन्यवाद देतो. त्यांनी मनाचा मोठेपणा दाखवून शिवसैनिकाला या पदावर विराजमान होण्यासाठी समर्थन दिलं."

"50 आमदारांच्या विधानसभा मतदारसंघातील प्रश्न, अडीच वर्षात आलेल्या अनुभवांची नोंद माझ्याकडे आहे. त्यांच्या मतदारसंघात विकास निधी कमी पडणार नाही, याची जबाबदारी माझी आहे. मतदारांना अपेक्षित काम करवून देण्याची जबाबदारी माझी आहे. त्यांना गेल्या अडीच वर्षांत आलेला अनुभवाची पुनरावृत्ती होणार नाही, याची काळजी मी घेईन. त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही," असं त्यांनी सांगितलं.

'मातोश्री'वर कधी जाणार आहात?; काय म्हणाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे?
शिंदे गटाला पुन्हा दिलासा! शिवसेनेनं सर्वोच्च न्यायालयात का घेतली होती तातडीने धाव?
"बाळासाहेबांचं हिंदुत्व घेऊन आम्ही पुढे निघालो आहोत. धर्मवीर दिघेंनी आम्हाला शिकवण दिली आहे. जिथे अन्याय होतो, अन्याविरुद्ध लढण्याचं काम, अन्यायाला वाचा फोडण्याचं काम करण्याची शिकवण बाळासाहेबांनी दिली. शिवसेना म्हणून आम्ही विधिमंडळात काम करणार आहोत. राज्याच्या विकासासाठी, प्रकल्प निर्धारित वेळेत पूर्ण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत."

मुलाखतीच्या अखेरीस एकनाथ शिंदे यांना मातोश्रीवर कधी जाणार असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना शिंदे थोडं अडखळले आणि म्हणाले, "याबाबतीत जेव्हा वेळ येईल तेव्हा आपल्याला कळेल," असं त्यांनी सांगितलं.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in