अजित पवारांना शिंदेंकडून 'सरकारी विमान', नागपुरात पडद्यामागे काय घडलं?

Ajit Pawar : विरोधी पक्षनेते अजित पवार यांना मुंबईला येण्यासाठी सरकारने शासकीय विमान उपलब्ध करून दिल्यानं वेगवेगळे राजकीय कयास लावले जात आहे...
eknath shinde allows ajit pawar to travel in government airplane
eknath shinde allows ajit pawar to travel in government airplane

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना न्यायालयाने जामीन दिला. त्यानंतर देशमुख वर्षभरानंतर तुरूंगातून बाहेर येणार आहेत. देशमुखांची राष्ट्रवादीचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार आणि दिलीप वळसे पाटील हे मुंबईत येऊन भेट घेणार आहेत. मात्र, या भेटीच्या पार्श्वभूमीवर सगळ्यांच्या भुवया उंचावल्या गेल्या त्या सरकारी विमानामुळे. अजित पवारांना नागपूरहून मुंबईला येण्यासाठी शासकीय विमान उपलब्ध करून दिल्यानं शिंदे सरकारने घातलेल्या या हवाई पायघड्यांची जोरात चर्चा सुरू झालीये.

अधिवेशनाच्या पहिल्या दिवसांपासून शिंदे-फडणवीस सरकारविरुद्ध विरोधी पक्षनेते फारसे आक्रमक भूमिका घेत नाहीत, अशी चर्चा अजित पवारांबद्दल सुरू आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतील नेते नाराज असल्याची कुजबूजही समोर आली. त्यामुळे अजित पवार गेल्या आठवडाभरापासून चर्चेत आहे. आता अजित पवार चर्चेत आलेत, ते सरकारने उपलब्ध करून दिलेल्या शासकीय विमानामुळे.

अजित पवार अनिल देशमुख यांच्या भेटीसाठी बुधवारी (28 डिसेंबर) मुंबईला येणार आहेत. मुंबईला येण्यासाठी सरकारने अजित पवारांना शासकीय विमान उपलब्ध करून दिलं. त्यामुळे सभागृहात आणि वरवर शिंदे-फडणवीस सरकारविरुद्ध महाविकास आघाडी असा राजकीय संघर्ष दिसत असला तरी आतून मात्र सारं काही आलंबेल असल्याची चर्चा सुरू झालीये. आता यावर विरोधी पक्षनेते अजित पवारांनीच खुलासा केलाय.

eknath shinde allows ajit pawar to travel in government airplane
फडणवीस ते गोगावले : अजित पवारांनी एक तास वाभाडे काढले; सभागृह फक्त ऐकत राहिलं!

विरोधी पक्षनेत्यांना हवाई पायघड्या! एकनाथ शिंदे-अजित पवारांमध्ये काय झाली चर्चा?

या विषयावर विरोधी पक्षनेते अजित पवारांनी भूमिका स्पष्ट केली. "अनिल देशमुखांना कोर्टानं जामीन दिलाय, पण त्यांना मुंबईबाहेर जाता येणार नाही. त्यामुळे राष्ट्रवादीच्या वतीने जयंत पाटील यांनी मुंबईत येण्याची विनंती केली. माझाही मुंबईला जाण्याचा प्रयत्न आहे. काल (27 डिसेंबर) मला शिंदेंनी विचारलं की, उद्या (28 डिसेंबर) कामकाज समितीची बैठक घेतोय. मी त्यांना म्हणालो की, उद्या ऐवजी परवा (29 डिसेंबर) घेतली तर बरं होईल. त्यांनी कारण विचारलं. मी त्यांना कारण सांगितलं," असं अजित पवार म्हणाले.

"त्यांनी (एकनाथ शिंदें) सांगितलं की 10 वाजता कामकाज सल्लागार समितीची बैठक लावतो. तुम्हाला मी शासनाचं विमान उपलब्ध करून देतो. तुम्ही त्यातून जा आणि तुमचं जे काही काम असेल, ते करून परत या. त्यामुळे मी माझा कार्यक्रम बदलला. मी आणि दिलीप वळसे पाटील दुपारी एक वाजता जाणार आहोत. शासनाचं विमान कुणी वापरावं, हा निर्णय शासनाच्या प्रमुखांचा असतो. त्यांनी (एकनाथ शिंदे) सांगितल्यामुळे मी विरोधी पक्षनेता आहे. मला कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जा आहे," अशी माहिती अजित पवारांनी माध्यमांशी बोलताना दिली.
eknath shinde allows ajit pawar to travel in government airplane
Anil Deshmukh तुरुंगातून बाहेर येणार पण अधिवेशनाला मुकणार! न्यायालयाने टाकली मोठी अट

"आम्ही पण सरकारमध्ये असताना कधी काही प्रसंग आले, तर अशा पद्धतीने एकमेकांना सहकार्य करायचो. त्यामुळे कदाचित 1 वाजता शासनाने उपलब्ध करून दिलेल्या विमानातून मुंबईला जाण्याची शक्यता आहे आणि त्याच विमानाने परत येण्याचं माझं नियोजन आहे," असं अजित पवार नागपूर येथे बोलताना म्हणाले.

Related Stories

No stories found.
logo
Mumbai Tak
www.mumbaitak.in