Eknath Shinde :भुसे, राठोड गुवाहटीला पोहोचताच 37चा आकडा पूर्ण अन् लगेच उपाध्यक्षांना 'ते' पत्र रवाना

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी काल १२ बंडखोर आमदारांचे सदस्यत्व रद्द करण्याची मागणी उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्याकडे केली, एकनाथ शिंदे आता काय करणार?
Eknath Shinde :भुसे, राठोड गुवाहटीला पोहोचताच 37चा आकडा पूर्ण अन् लगेच उपाध्यक्षांना 'ते' पत्र रवाना
Eknath Shinde and Narhari Zirval Mumbai Tak

मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी काल १२ बंडखोर आमदारांचे सदस्यत्व रद्द करण्याची मागणी उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्याकडे केली. त्यानंतर एकनाथ शिंदेंनी लगेट ट्विटरवरुन उत्तर दिले. महत्त्वाचे म्हणजे शिवसेनेचे दोन मंत्री काल दुपारपर्यंत महाराष्ट्रात होते, त्यानंतर रात्री ते गुवाहटीला पोहोचले. कृषीमंत्री दादा भुसे आणि माजी वनमंत्री संजय राठोड हे काल रात्री गुवाहटीला पोहोचताच त्यानंतर एकवाथ शिंदेंच्या गटाने पुन्हा एकदा लेटर बॉम्ब टाकला आणि ठाकरेंना बुचकाळ्यात टाकले. (Eknath Shinde Letter To Deputy Speaker)

Eknath Shinde and Narhari Zirval
एकनाथ शिंदेंविरोधात उद्धव ठाकरे मैदानात, १२ आमदारांचं सदस्यत्व रद्द करण्याची मागणी

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाची काल रात्री एक बैठक पार पडली आणि सदर बैठकीत पक्षाच्या गटनेतेपदी एकनाथ शिंदे यांची तर मुख्य प्रतोदपदी भरत गोगावले यांची निवड करण्यात आली. या पत्रावर 'शिवसेने'च्या 37 आमदारांची स्वाक्षरी असून या पत्राची प्रत विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ (Narhari Zirwal) आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पाठवण्यात आली आहे. त्यामुळे ठाकरेंनी कायदेशीर लढाई लढण्याचे ठरवले असताना शिंदे गटाकडून प्रत्युत्तर देण्या आले आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in