Eknath Shinde: "तुम्ही आम्हाला घाबरवू शकत नाही, धमक्यांना भीक घालत नाही"

एकनाथ शिंदे आमदारांचा नंबर गेम खेळत असताना दुसऱ्या बाजूने उद्धव ठाकरे मैदानात उतरले आहेत.
Eknath Shinde: "तुम्ही आम्हाला घाबरवू शकत नाही, धमक्यांना भीक घालत नाही"
Uddhav Thackeray | Eknath Shinde Mumbai Tak

मुंबई: एकनाथ शिंदे आमदारांचा नंबर गेम खेळत असताना दुसऱ्या बाजूने उद्धव ठाकरे मैदानात उतरले आहेत. कालच्या भाषणात उद्धव ठाकरेंनी भावनिक साद घातल्यानंतर आज ठाकरे अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. १२ आमदारांचं सदस्यत्व रद्द करण्याची मागणी आता उद्धव ठाकरेंनी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्याकडे केली आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी बंडखोर आमदारांच्या विरोधात कारवाईची मागणी केली आहे. उपाध्यक्षांना चिठ्ठी लिहून त्यांनी ही मागणी केली आहे. उद्धव ठाकरेंनी १२ आमदारांवरती कारवाईची मागणी केल्यानंतर एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) ट्विट करत प्रत्युत्तर दिले आहे.

Uddhav Thackeray | Eknath Shinde
एकनाथ शिंदेंविरोधात उद्धव ठाकरे मैदानात, १२ आमदारांचं सदस्यत्व रद्द करण्याची मागणी

एकनाथ शिंदे ट्विटमध्ये काय म्हणाले ?

कोणाला घाबरवण्याचा प्रयत्न करताय? तुमची बनवाबनवी आणि कायदा आम्हालाही कळतो!. घटनेच्या 10 व्या परिशिष्टाप्रमाणे (शेड्युल) व्हीप हा विधानसभा कामकाजासाठी लागतो, बैठकीसाठी नाही. यासंदर्भात सुप्रीम कोर्टाचे असंख्य निकाल आहेत.

12 आमदारांविरोधात कारवाईसाठी अर्ज करून तुम्ही आम्हाला अजिबात घाबरवू शकत नाही. कारण आम्हीच वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची खरी शिवसेना व शिवसैनिक आहोत.

कायदाही जाणतो, त्यामुळे असल्या धमक्यांना भीक घालत नाही. तुम्ही संख्या नसताना अवैध गट तयार केला म्हणून तुमच्यावरच कारवाईची आमची मागणी आहे.

असे ट्विट एकनाथ शिंदे यांनी केले आहे. एकनाथ शिंदेंच्या या ट्विटनंतर आता उद्धव ठाकरे काय निर्णय घेतात हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in