Eknath Shinde : शिवसेनेचे बंडखोर आमदार सुरतहून विमानाने गुवाहाटीत
Eknath Shinde: Shiv Sena rebel MLA flew from Surat to Guwahati

Eknath Shinde : शिवसेनेचे बंडखोर आमदार सुरतहून विमानाने गुवाहाटीत

सुरतमध्ये हे बंडखोर आमदार होते, त्यांना आता विमानाने आसाममध्ये नेलं जाणार

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या नेतृत्वाविरोधातच दंड थोपटले आहेत. एकनाथ शिंदे यांच्यासहीत ३३ आमदार सुरतमध्ये आहेत. या सगळ्या आमदारांना स्पाईस जेटच्या विमानाने आसामच्या गुवाहाटीमध्ये नेलं जातं आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात एकनाथ शिंदे यांच्या बंडाने भूकंप घडवला. एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबतचे आमदार हे नॉट रिचेबल होते. त्यानंतर हे सगळे सुरतला असल्याचं समोर आलं. आता या सगळ्यांना गुवाहाटीला नेण्यात येतं आहे.

ठाकरे सरकारविरुद्ध अविश्वास ठराव

शिवसेनेविरोधात बंड केलेल्या एकनाथ शिंदे यांनी आपल्याला 35 आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा केला आहे. मात्र, शिवसेनेतून बाहेर पडण्याबरोबरच आमदारकीही शाबूत ठेवायची असेल, तर शिंदे यांना सेनेचे ३७ आमदार फोडावे लागणार आहे म्हणजे त्यांना पक्षांतर बंदी कायद्यापासून संरक्षण मिळेल.

३७ आमदार घेऊन एकनाथ शिंदे नवीन पक्ष स्थापन करू शकतात. नवीन पक्षाच्या माध्यमातून भाजपला पाठिंबा दिला जाऊ शकतो. या माध्यमातून भाजप बहुमताच्या आकड्यापर्यंत जाऊ शकतो. तर दुसरीकडे शिवसेनेला भगदाड पडल्यानं महाविकास आघाडीचे सरकार अल्पमतात येऊन कोसळू शकतं.

शिवसेनेचे आमदार पक्षासोबत नसल्याचा अंदाज आल्यानंतर भाजप सरकारविरोधात अविश्वास ठराव आणेल. बहुमत सिद्ध करण्यावेळी सेनेनं व्हीप जारी केला तरी आमदार नाकारू शकतात आणि सरकार विरुद्ध मतदान करू शकतात. त्यामुळे त्यांची आमदारकी जाईल आणि बहुमताचा आकडा कमी होऊ होईल.

एकनाथ शिंदे यांना अपेक्षित असलेले म्हणजे 37 आमदार फोडण्यात अपयश आलं तर ते आणि पाठिंबा असलेले आमदार राजीनामा देऊन पुन्हा निवडणुकीला सामोरं जातील तर किती आमदार राजीनामा देतात त्यानुसार बहुमताचा आकडा कमी होईल. तितका आकडा आघाडीकडे असेल तर हे सरकार तरून जाईल.

37 आमदार फोडण्यात एकनाथ शिंदे यांना यश आलं तर ते नवीन पक्ष न काढता भाजपात सामील होऊ शकतात. त्यांना मुख्यमंत्री पदाची अपेक्षा असल्यानं भाजपकडून मुख्यमंत्री केलं जाईल का? याबाबत काहीही ठाम नसलं तरी ते नव्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री होऊ शकतात.

शिवसेनेतील 37 आमदार फोडण्यात शिंदे यांना अपयश आलं तर त्यांची बंडखोरीची खेळी अडचणीची ठरू शकते. शिंदे त्यांच्याकडे 35 आमदारांचा दावा करत असले तरी त्यातील जास्तीत जास्त आमदार पुन्हा परतले तर उद्धव ठाकरे यांचे सरकारवरील संकट टळेल.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in