Eknath Shinde : ''बाळासाहेबांची शिवसेना वाचवण्यासाठी मरण आलं तरीही बेहत्तर!''

एकनाथ शिंदे यांनी दोन ट्विट केली आहेत, त्यातून त्यांनी शिवसैनिकांना आवाहन केलं आहे
Even if we die to save Balasaheb's Shiv Sena We consider it our destiny Eknath Shinde Emotional Tweet
Even if we die to save Balasaheb's Shiv Sena We consider it our destiny Eknath Shinde Emotional Tweet

महाराष्ट्रातला सत्तासंघर्ष टीपेला गेला आहे. एकनाथ शिंदे यांच्या गटात आता शिवसेनेचे ३९ आमदार आणि १२ अपक्ष असे एकूण ५१ आमदार आहेत. आजच उच्च तंत्रशिक्षण मंत्री हे शिंदे गटात सहभागी झाले आहेत. तसंच सोमवारी आणखी एक-दोन आमदार येतील असं दीपक केसरकर यांनी सांगितलं आहे. तसंच ही लढाई आता सुप्रीम कोर्टातही गेली आहे. महाराष्ट्रात शिवसेनेत उभी फूट पडली आहे.

बंडखोर आमदारांविरोधात शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. अशात एकनाथ शिंदे यांचं नवं ट्विट समोर आलं आहे. यामध्ये बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना वाचवण्यासाठी प्राण गेला तरी बेहत्तर असं म्हणत भावनिक आवाहन केलं आहे.

Even if we die to save Balasaheb's Shiv Sena We consider it our destiny Eknath Shinde Emotional Tweet
महाराष्ट्राचे उच्च तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत एकनाथ शिंदे गटात दाखल

काय म्हटलं आहे एकनाथ शिंदे यांनी?

हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाच्या विचारांसाठी आणि बाळासाहेबांची शिवसेना वाचविण्यासाठी आम्हाला मरण जरी आलं तरी बेहत्तर, तसं झाल्यास आम्ही सारे आमचं भाग्य समजू.

काय आहे एकनाथ शिंदे यांचं दुसरं ट्विट ?

मुंबई बाँबस्फोट घडवून निष्पाप मुंबईकरांचा जीव घेणाऱ्या दाऊदशी थेट संबंध असणाऱ्यांना हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना समर्थन कशी करू शकते…? यालाच विरोध म्हणून उचललेलं हे पाऊल; आम्हा सर्वांना मृत्यूच्या दारात घेऊन गेले तरी बेहत्तर

दोन ट्विट करत एकनाथ शिंदे यांनी शिवसैनिकांना आवाहन केलं आहे. संजय राऊत, आदित्य ठाकरे हे सातत्याने भाषणं करत आहेत. तसंच सभा घेत आहेत, पदाधिकाऱ्यांना भेटत आहेत. शिवसेना आणखी फुटू नये यासाठी काळजी घेत आहेत. अशात आता हे दोन ट्विट एकनाथ शिंदे यांनी केले आहेत.

संजय राऊत यांनी केलं वादग्रस्त वक्तव्य

दहिसर येथील शिवसेनेच्या मेळाव्यात मार्गदर्शन करताना संजय राऊत म्हणजे होते की, ''40 आमदारांचे मृतदेह थेट गुवाहाटीमधून येतील. त्यांना थेट शवागृहात पोस्टमोर्टमसाठी पाठवू. गुवाहाटीमध्ये एक मंदिर आहे. या मंदिरात रेड्याचा बळी दिला जातो. आम्ही 40 रेडे पाठवले आहेत.'' राऊत यांनी केलेल्या याच वादग्रस्त वक्तव्यावर एकनाथ शिंदे यांनी ट्विट केलं आहे.

Even if we die to save Balasaheb's Shiv Sena We consider it our destiny Eknath Shinde Emotional Tweet
एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस यांचा 'रात्रीस राजकीय खेळ'?; पहाटे २ ते ४ दरम्यान गुजरातला काय घडलं?

एकनाथ शिंदे यांनी पुकारलेलं बंड हे शिवसेनेतलं आत्तापर्यंतचं सर्वात मोठं बंड आहे. त्यांच्या साथीला ३९ आमदार आहेत. शिवसेनेतल्या आमदारांनी त्यांची नाराजीच व्यक्त केली आहे. शिवसेनेत उभी फूट पडल्याने शिवसेनेत अस्वस्थता निर्माण झाली आहे. हे सगळे आमदार गुवाहाटीतल्या रॅडिसन ब्लू हॉटेलमध्ये थांबले आहेत. बंड केल्यानंतरचा सहावा दिवस संपताना शिवसैनिक हे आक्रमक झालेले दिसून आले आहेत. त्यानंतर प्राण गेला तरीही बेहत्तर ते भाग्य समजू हे ट्विट एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. त्याची चर्चाही खूप होते आहे तसंच हे दोन्ही ट्विट व्हायरलही होत आहेत.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in