१८५७ च्या लढ्यातही देवेंद्र फडणवीस यांचं मोठं योगदान होतं, आदित्य ठाकरेंचा टोला

जाणून घ्या काय म्हणाले आहेत आदित्य ठाकरे?
१८५७ च्या लढ्यातही देवेंद्र फडणवीस यांचं मोठं योगदान होतं, आदित्य ठाकरेंचा टोला

बाबरी मशिदीचा ढाचा पाडला जात होता तेव्हा मी तिथे होतो असं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. १ मे रोजी झालेल्या सभेत त्यांनी हे वक्तव्य केलं आहे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या टीकेला उत्तर दिलं आहे. याबाबत आज पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना विचारलं असता त्यांनी खास टोला लगावत देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे.

काय म्हणाले आहेत आदित्य ठाकरे?

१८५७ च्या उठावातही त्यांचं (देवेंद्र फडणवीस) यांचं खूप मोठं योगदान आहेच स्वतःच. असो.. पण या गोष्टीत जाण्यापेक्षा आणि वादात जाण्यापेक्षा राम मंदिर होतं आहे हे चांगलं आहे. कोर्टाने निकाल दिला. शिवसेनेने संघर्ष केला. चांगलं काम होतं आहे. आता मंदिर होतं आहे चांगली गोष्ट आहे. सगळ्या राजकीय पक्षांनी आता बेरोजगारीचा जो प्रश्न आहे त्यावर बोललं पाहिजे. चर्चा केली पाहिजे. आम्ही विकासाची काम करत आहोत असंही ते म्हणाले. तसंच देवेंद्र फडणवीस यांचं भाषण पाहिलं नाही त्यामुळे त्यावर सविस्तर बोलता येणार नाही असंही आदित्य ठाकरेंनी म्हटलं आहे.

१८५७ च्या लढ्यातही देवेंद्र फडणवीस यांचं मोठं योगदान होतं, आदित्य ठाकरेंचा टोला
बाबरी कुणी पाडली? फडणवीस म्हणाले मी होतो, संजय राऊत यांनी थेट दाखवला 'सामना'

महाविकास आघाडी सरकार प्रत्येक घरामध्ये चूल कशी पेटेल यासाठी काम करत आहे. विरोधी पक्ष घरं पेटवण्याची कामं करत आहेत. लोकं हुशार आहेत त्यांनी या लोकांना ओळखलं आहे तुम्हीही ओळखा असंही आदित्य ठाकरेंनी माध्यमांशी बोलताना सांगितलं.

शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. दोन ट्विट करत आणि लालकृष्ण आडवाणींचा व्हीडिओ ट्विट करत त्यांनी देवेंद्र फडणवीसांना उत्तर दिलं आहे.

काय आहे संजय राऊत यांचं ट्विट?

लालकृष्ण आडवाणी यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत काय सांगितलं तो व्हीडिओ पोस्ट केला आहे. त्यात लालकृष्ण आडवाणी मराठी माणूस तिथे आहेत असं सांगताना दिसत आहेत. तसंच बाबरी कुणी पाडली? ऐका असं म्हणत हा व्हीडिओ संजय राऊत यांनी ट्विट केला आहे.

त्यानंतर सामनाच्या पेपरचे जुने पेजही ट्विटरवर शेअर केले आहेत. बमों से लैस शिवसेना कार्यकर्ता अयोध्या जायेंगे, शिवसेना के प्रदेश प्रमुख के घर पर छापा या आशयाच्या या बातम्या आहेत. ज्यातून शिवसेनेचा बाबरी पाडण्यात सहभाग होता असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. तसंच आता बोला असं कॅप्शनही दिलं आहे.

काय म्हणाले होते फडणवीस?

"यांना वाटतं हेच महाराष्ट्र आहेत, यांना वाटतं हेच मराठी आहेत. यांना वाटतं यांचंच हिंदुत्व आहे. काय म्हणाले परवा? बाबरी मशिद पडली तेव्हा कुठल्या बिळात होते? कुणीतरी फार चांगला प्रश्न या ठिकाणी विचारला मशिदीवरचे भोंगे काढायला सांगितले तर हातभर फाटली आहे, हे सांगतात आम्ही बाबरी पाडली. बाबरी ढाचा होता, पारतंत्र्यांचा ढाचा होता. तो ढाचा पाडण्याचं काम करणारे कारसेवक होते. आम्हाला याचा अभिमान आहे. ढाचा पाडला तेव्हा तुम्ही कुठे होतात? विचारताय ना मी अभिमानाने सांगतो होय मी ढाचा पाडण्यासाठी त्याच ठिकाणी होतो. देवेंद्र फडणवीस ढाचा पाडण्यासाठी होता. कारसेवेवेमध्ये राम मंदिरासाठी बदायूच्या जेलमध्ये मी घालवले आहेत. लाठी-गोळी खाण्याचं काम आम्ही केलं आणि तुम्ही विचारता आम्ही कुठे? बाबरी पडली तेव्हा महाराष्ट्रातला कुठला नेता गेला होता? शिवसेनेचा एकही नेता हजर नव्हता.

Related Stories

No stories found.