Adani: गौतम अदाणींकडून काँग्रेस नेत्यांचं प्रचंड कौतुक, नेमकं काय म्हणाले?

Gautam Adani on Congress: राहुल गांधी हे अदाणी समूहावर वारंवार टीका करतात. मात्र, असं असलं तरीही गौतम अदाणी हे मात्र आपल्या व्यावसायिक यशाचं श्रेय हे आवर्जून काँग्रेसच्या काही नेत्यांना देतात.
गौतम अदाणींकडून काँग्रेसचं कौतुक
गौतम अदाणींकडून काँग्रेसचं कौतुकIndia Today

राज चेंगप्पा, ग्रुप एडिटोरिअल डायरेक्टर (पब्लिशिंग), इंडिया टुडे ग्रुप

Gautam Adani credit his professional success to Congress: नवी दिल्ली: देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपती गौतम अदाणी (Gautam Adani) यांनी इंडिया टुडेला (India Today) एक एक्स्क्लुझिव्ह मुलाखत दिली. (Exclusive Interview) याच मुलाखतीत अदाणींनी काँग्रेसच्या (Congress) नेत्यांचं आणि त्यांच्या धोरणांचं बरंच कौतुक केलं आहे. गौतम अदाणी यांच्या या वक्तव्यामुळे अनेकांच्या भुवया देखील उंचवल्या आहे. अदाणी यांचा कल हा भाजपकडे (BJP) असल्याचं अनेकदा बोललं जातं. मात्र, तरीही ते आपल्या उद्योजक होण्याला आणि त्यांच्या व्यवसायाची झालेली वाढ याचं श्रेय काँग्रेसच्या काही नेत्यांना आवर्जून देतात. ज्याबाबत त्यांनी खुलेपणाने भाष्य केलं आहे. पाहा गौतम अदाणी नेमकं काय म्हणाले. (exclusive interview gautam adani praises congress leaders see what he actually said)

एकीकडे काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) हे अदाणी समूहावर वारंवार टीका करताना आपल्याला पाहायला मिळालं आहे. मोदी सरकार (Modi Govt) हे अदाणी-अंबानी यांचं सरकार आहे अशी टीका राहुल गांधींनी बऱ्याचदा केली आहे. मात्र, असं असलं तरीही गौतम अदाणी मात्र, इंडिया टुडेला (India Today) दिलेल्या एक्स्क्लुझिव्ह मुलाखतीत काँग्रेसच्या द्रष्ट्या नेत्यांबाबत भरभरुन बोलले आहेत.

गौतम अदाणींकडून काँग्रेसचं कौतुक
Exclusive: गौतम अदाणी असे बनले देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती, वाचा संपूर्ण मुलाखत

पाहा गौतम अदाणींनी आपल्या उद्योजक होण्याचं श्रेय राजीव गांधी आणि काँग्रेसच्या नेत्यांना कसं दिलंय. जाणून घ्या मुलाखतीत गौतम अदाणी नेमकं काय म्हणाले.

गौतम अदाणींकडून काँग्रेसचं कौतुक
Exclusive: मोदींमुळे तुमची भरभराट झाली?, गौतम अदाणी म्हणाले हे तर..

प्रश्न: गौतम भाई, तुमचा जो आर्थिक विकास झालाय किंवा तुमची जी आर्थिक उलाढाल वाढली आहे ती पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळे झाली आहे. असे म्हणणाऱ्या टीकाकारांना तुम्ही कसे उत्तर द्याल?

गौतम अदाणी: पंतप्रधान मोदी आणि मी एकाच राज्यातून येतो. त्यामुळे मी अशा बिनबुडाच्या आरोपांचे सोपे लक्ष्य बनतो.

जेव्हा मी माझ्या उद्योजकीय प्रवासाकडे मागे वळून पाहतो तेव्हा मी त्याचे विभाजन चार टप्प्यात करु शकतो. हे जाणून अनेकांना आश्चर्य वाटेल की, हे सर्व राजीव गांधींच्या (Rajiv Gandhi) पंतप्रधानपदाच्या कार्यकाळात सुरू झाले जेव्हा त्यांनी प्रथमच एक्झिम धोरणात उदारीकरण आणलं आणि अनेक वस्तू या पहिल्यांदाच ओजीएल सूचीमध्ये (OGL List) आणल्या गेल्या. यामुळे मला माझे एक्सपोर्ट हाऊस सुरू करण्यास मदत झाली. म्हणूनच, त्यावेळी राजीव गांधींशिवाय माझा उद्योजक म्हणून प्रवास कधीच सुरू झाला नसता.

मला दुसरा मोठी संधी ही 1991 मध्ये मिळाली, जेव्हा नरसिंह राव (P. V. Narasimha Rao) आणि मनमोहन सिंग (Manmohan Singh) या जोडीने मोठ्या आर्थिक सुधारणांना सुरुवात केली. इतर अनेक उद्योजकांप्रमाणेच मीही त्या सुधारणांचा लाभार्थी होतो. त्याबद्दल अधिक विस्ताराने सांगण्यात अर्थ नाही कारण त्याबद्दल बरेच काही बोलले गेले आहे आणि लिहिले गेले आहे.

गौतम अदाणींकडून काँग्रेसचं कौतुक
Exclusive Interview: NDTV च्या प्रश्नावर गौतम अदाणी स्पष्टच म्हणाले, मी त्यात...

असं म्हणत गौतम अदाणी यांनी आपल्या यशाचं काहीसं श्रेय हे भारताच्या तीन माजी पंतप्रधान म्हणजेच राजीव गांधी, नरसिंह राव आणि मनमोहन सिंह यांना दिलं आहे.

आता गौतम अदाणी यांच्या या स्पष्टीकरणानंतर राहुल गांधीच्या भूमिकेत काही बदल होणार की, त्यांची अदाणींविषयीची भूमिका कायम राहणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Related Stories

No stories found.
logo
Mumbai Tak
www.mumbaitak.in