Mumbai Tak /बातम्या / Exclusive: संजय राऊतांच्या बोलण्यात का वाढलीय शिवीगाळ?, राऊत म्हणाले..
बातम्या राजकीय आखाडा

Exclusive: संजय राऊतांच्या बोलण्यात का वाढलीय शिवीगाळ?, राऊत म्हणाले..

Sanjay Raut Exclusive Interview: मुंबई: शिवसेना (UBT) पक्षाचे नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आज (6 मार्च) मुंबई Tak ला विशेष मुलाखत दिली. गेल्या काही दिवसांपासून संजय राऊतांच्या अनेक भाषणात शिवराळ भाषेचा वापर होत असल्याचं अवघ्या महाराष्ट्राला (Maharashtra) पाहायला मिळालं आहे. संजय राऊतांच्या भाषणांमध्ये शिव्या का वाढल्या आहेत. याबाबत त्यांनी स्वत: आपलं मत व्यक्त केलं आहे.

मुंबई Tak ला दिलेल्या मुलाखतीत संजय राऊत नेमकं काय म्हणाले:

‘गेल्या 40-45 वर्षांपासून मी लिखाण करतोय. माझ्या लिखाणात मी अशाप्रकारची भाषा मी कधी वापरलीए ते. माझी भाषा स्वच्छ, स्पष्ट पण परखड आहे. अशा शिव्यांचा वापर आपल्या संत-साहित्यात खूप आहे. असे अनेक अभंग मला माहित आहे आणि मी संतसाहित्याचा सुद्धा अभ्यासक आहे.’

‘संपूर्ण काळात तीन वेळाच प्रसंग घडला… निवडणूक आयोगाला मी ठरवून दिली शिवी. जर ती शिवी असेल तर ती ठरवून दिली. कारण ती लोकभावना आहे. ज्या पद्धतीने निवडणूक आयोगाने निकाल विकला. बाळासाहेबांची शिवसेना अशी उचलून दुसऱ्याच्या हातात दिली. हा लोकभावनेचा उद्रेक आहे. मी कशाला महाराष्ट्रच शिव्या घालतोय.’

‘मी एकदा किरीट सोमया या माणसाला चु$#@ म्हटलं होतं. हा बोली भाषेतला शब्द आहे ही शिवी नाही. तुम्ही डिक्शनरी काढून पाहा.. रोज असे शब्द वापरातत बोली भाषेत. त्याच अर्थ डिक्शनरीमध्ये पाहिला तर तो असंसदीय नाही. विंचवाला चपलेनेच चिरडावा लागतो.’

‘ज्याला तुम्ही शिवी म्हणतायेत असा प्रसंग गेल्या अनेक वर्षात 3 वेळाच घडला आहे. निवडणूक आयोगाच्या बाबत म्हणत असाल की, शिवसेना तुमच्या बापाची आहे का… मी परत बोलतो.’

‘मी प्रत्येक नेत्याची अशाप्रकारची उदाहरणं देऊ शकतो. याचा अर्थ असा का? की आम्ही शिवराळ आहोत का? आम्ही कितीही शिकलो.. मोठं झालो तरीही शिवसेना ही रस्त्यावरची संघटना आहे. त्यामुळे अशी भाषा वापरावी लागते मनात नसताना. ज्या पद्धतीने गेल्या काही दिवसात शिवसेनच्या बाबतीत घडलंय तर आमच्या मुखातून जे येतंय तो विद्रोह आहे.’

‘तीन प्रसंग सोडले तर मी कधीही अशा भाषेत टीका केलेली नाही. माझ्यावर शिवसेनेवर घाणेरड्या भाषेत टीका करतात. अशा लोकांना मी कधी उत्तरही दिलेलं नाही.’

‘महाराष्ट्राच परंपरा आम्हालाही माहिती आहे. विंचवाची नांगी ही चपलेनेच मोडावी लागते. विंचू हा विंचूच.. गेल्या काही काळात असे प्रसंग घडले आहेत ज्यामुळे आम्हाला चप्पल हातात घेऊन विंचवाची नांगी मोडावी लागतेय.’

Sanjay Raut: ”मी त्यांना चोरमंडळ म्हटलं…”, राऊतांच स्पष्टीकरण

‘निवडणूक आयोगाने दिलेला निर्णय हा शिवसेना आणि महाराष्ट्रावर अन्याय करणार आहे. हा निर्णय नसून हा निकाल दबावाखाली आहे. जर घटनात्मक पदावर बसलेली लोकं अन्याय करत असतील त्यांच्यासाठी याशिवाय दुसरी भाषा नाही. मी समर्थन करतो मी जे बोललो त्याबद्दल..’

‘फक्त 40 आमदारांबाबत मी जे शब्दप्रयोग केले आहेत तो अगदी योग्य आहे. त्यात काहीही चुकीचं नाही. मी एका घटनाबाह्य वागणाऱ्या संस्थेला शिवी दिली असेल तर त्याला मी शिवी मानत नाही. तो उद्रेक आहे.’

‘मी विशिष्ठ गटाबद्दल बोललो.. मला विधिमंडळाचा आदर आहे. लोकांचे प्रश्न तिथे मांडले जातात. एका विशिष्ठ गटापुरताच त्याचा वापर आहे. त्याचा चुकीचा पद्धतीने अर्थ काढून माझ्यावर हक्कभंग आणला असेल तर त्याबाबत मी पाहीन कसं काय ते.’

Shivsena तुमच्या बापाची आहे का भो*%#? संजय राऊतांचा तोल ढळला!

‘महाराष्ट्रात आणि देशात असे अनेक लोकं आहेत ज्यांना चपलेने बडवायलाच पाहिजे. असे खूप लोकं आहेत. हे मी म्हणत नाही.. आमचे संत म्हणतात. पण आपण संतांना फॉलो करतो. आपण आपले जे देव आहेत त्यांना फॉलो करतो.. त्यांना वेगळं सांगायचं आहे. अन्याय सहन करू नका. अन्यायाविरुद्ध बंड करा. हे देव सांगतात, संत सांगतात..’

‘मी माझ्या पक्षाची ढाल तलवार म्हणून काम करेन. मी पक्षासाठी तुरुंगात गेलोय. मी शरणागती नाही पत्करली.. माझा पक्ष माझ्या बरोबर आहे ठामपणे. मला बाळासाहेब सांगायचे थोडं जास्त झालीय मात्रा… मात्रा.. उद्धव ठाकरे पण माझ्यासोबत चर्चा करतात. आमच्यात कोणतेही मतभेद नाहीत. खुलेआम आम्ही चर्चा करतो. मी जे बोलतो ती पक्षाची भूमिका आहे. आमच्या पक्षाचं सैन्य आहे.’

‘खोट्या-खोट्या प्रकरणात तुरुंगात टाकलंय.. आमच्या चेहऱ्यावर भावना दिसत नाही.. पण जो भोगतो ना.. तोच बोलतो. मी शरण नाही जाणार.. काय कराल.. परत तुरुंगात टाकाल ना.. माझी तयारी आहे.’

‘मी कधीही असंस्कृत वागलो नाही.. वागणार नाही. मी काही शंकराचार्य नाही. मी लोकभावनेशी सहमत आहे. मी कमालीचा लोकशाहीवादी माणूस आहे. त्यामुळे लोकशाहीला जर कोणी छेद देत असेल सत्तेचा वापर करून.. तर मला असं वाटतं की, त्यांना त्या पद्धतीने उत्तर द्यावं लागेल.’ असं संजय राऊत

Sanjay Raut: ‘CM.. XXX चाटतायेत का?, राऊतांची जीभ घसरली; शाहांनाही सुनावलं

Rohit Sharma: धोनीचा ही शेवटची आयपीएल असेल का? पत्रकारांच्या प्रश्नावर रोहितने दिलं खास उत्तर parineeti chopra raghav chadha : राघवबद्दल प्रश्न विचारताच परिणीती लाजली, पुढे काय घडलं? Dalljiet Kaur : ब्लॅक सेन्शुअल ड्रेसमध्ये दलजीतचे हॉट फोटोशूट, पतीसोबत दिल्या रोमॅंटिक पोज अन्वेषी जैनच्या फिट बॉडीचं रहस्य काय? समजून घ्या काय करते दारूच्या सेवनाने ‘ही’ गोष्ट तुम्हाला कधीच मिळत नाही…: रिसर्च 4 पतींसह 11 लोकांचा जीव घेणारी लेडी सिरीयल किलर cross legs sitting: तुम्हीही असं बसता, बघा काय आहेत दुष्परिणाम? UPSC च्या तयारीसाठी नोट्स कशा असाव्यात? या सोप्या टिप्स वाचा Akanksha Dubey: आत्महत्येपूर्वी आकांक्षाचा या व्यक्तीला शेवटचा मेसेज, म्हणाली… vitamin e foods : व्हिटॅमिन ई जीवनसत्त्व मिळवण्यासाठी काय खायला हवं? Danish Alfaaz: टिकटॉक स्टार दानिश अल्फाजवर बलात्काराचा गुन्हा, नेमकं काय घडलं? Nanded: निवृत्त झाले तरीही करतात ‘ड्युटी’; पोलीस कर्मचाऱ्याच्या निशुल्क सेवेची होतेय चर्चा पुणेकरांचा प्रवास होणार सुखद! नव्या मार्गांवर धावली मेट्रो पाकिस्तानमध्ये महागाईचा आगडोंब! ‘या’ गोष्टींच्या किंमती ऐकून तुम्हीही म्हणाल, ‘बाप रे’ ‘तारक मेहता’साठी मिळेना दया बेन! शोधाशोध करून निर्मातेही थकले Lalu Prasad Yadav: इवली इवली बोटं, नातीला कुशीत घेतल्यानंतर असे होते लालूप्रसादाचे भाव BCCI contract list : रोहित, कोहली ते सूर्यकुमार यादव, कोणत्या खेळाडूला किती पगार? bageshwar dham sarkar: बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींविरुद्ध दुसरा गुन्हा Ameesha Patel : बॉलिवूड अभिनेत्री अमिषा पटेलचा बिकनीत बोल्ड अंदाज ग्लॅमरस जग सोडून ‘या’ 10 अभिनेत्रींनी मृत्यूला कवटाळलं, गळफास घेऊन संपवलं आयुष्य!