"ओबीसी आरक्षणावरून आम्हाला बोलणाऱ्या फडणवीसांना जनाची नव्हे मनाची तरी लाज वाटली पाहिजे"

सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांची फडणवीसांवर जोरदार टीका
"ओबीसी आरक्षणावरून आम्हाला बोलणाऱ्या फडणवीसांना जनाची नव्हे मनाची तरी लाज वाटली पाहिजे"

ओबीसी आरक्षणाविषयी कोणताही निर्णय न घेता महाविकास आघाडी सरकारवर टीकेचे बाण चालवणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांना जनाची नाही तर मनाची लाज वाटली पाहिजे अशी टीका सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी जळगावमध्ये केली आहे.

"ओबीसी आरक्षणावरून आम्हाला बोलणाऱ्या फडणवीसांना जनाची नव्हे मनाची तरी लाज वाटली पाहिजे"
राज्यात ओबीसी आरक्षणाशिवायचं होणार निवडणुका?; ठाकरे सरकारला सर्वोच्च न्यायालयात झटका

ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी महा विकास आघाडी सरकारचा बुरखा टराटरा फाडला होता तसेच ओबीसींना आरक्षण देण्यावरून हे सरकार उघडे पडले असल्याची टीका केली होती. फडणवीसांच्या टिकेला मंत्री धनंजय मुंडे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

"ओबीसी आरक्षणावरून आम्हाला बोलणाऱ्या फडणवीसांना जनाची नव्हे मनाची तरी लाज वाटली पाहिजे"
"ओबीसी म्हणून पंकजांना पाडलं, जानकरांना हरवलं आणि प्रीतम मुंडेंना मंत्रीपद नाकारलं"

नेमकं काय म्हणाले धनंजय मुंडे?

जे आम्हाला सांगत आहेत की सांगत आहेत की ओबीसी आरक्षण आमच्यामुळे (महाविकास आघाडी) गेलं त्यांना खरंतर जनाची नाही तर मनाची तरी लाज वाटली पाहिजे. कारण ज्यांच्या विचारधारेतच आरक्षण नाही. त्या विचारधारेने आम्हाला सांगावं की आम्ही ओबीसी आरक्षणाच्या विरोधात आहोत. माझं हे स्पष्ट मत आहे की मागच्या पाच वर्षांच्या काळात भाजपच्या राज्यातील आणि केंद्रातील सरकारने आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात केस चालू होती त्यावेळी जो इम्पेरिकल डेटा देणं अपेक्षित होतं ते दिलं नाही. हा ओबीसींचा डेटा केंद्र सरकारने दिला नाही. त्यामुळे हे त्यांचं अपयश आहे. आज आम्हाला ते जबाबदार धरत आहेत. निकाल लागल्यानंतर ते आमच्यावर जबाबदारी टाकत आहेत हे चुकीचं आहे. लोकांचा बुद्धीभेद करणं ही भाजपची पद्धत आहे आत्ताही ते आरक्षणाच्या मुद्द्यावर तेच करत आहेत. भाजपने आता महाराष्ट्राच्या १२ कोटी जनतेचा विश्वास पूर्णपणे गमावला आहे. त्यामुळे ओबीसी असेल किंवा इतर आरक्षणाचा विषय असेल, जातीपातीचं राजकारण, धर्मांमध्ये तेढ निर्माण करणं असेल काहीही केलं तरीही भाजपला महाराष्ट्रातली जनता ओळखून आहे. त्यांना ही जनता कधीही खपवून घेणार नाही. असं म्हणत धनंजय मुंडे यांनी टीका केली आहे.

"ओबीसी आरक्षणावरून आम्हाला बोलणाऱ्या फडणवीसांना जनाची नव्हे मनाची तरी लाज वाटली पाहिजे"
राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे पुन्हा एकदा ओबीसी आरक्षणाविना निवडणुका घेण्याचा आदेश-फडणवीस

महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ओबीसी आरक्षणाचा विषय हा चांगलाच तापला आहे. सुप्रीम कोर्टाने राज्य निवडणूक आयोगाला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं वेळापत्रक दोन आठवड्यात द्या असे निर्देश दिले आहेत. अशात आज मुंबईत देवेंद्र फडणवीस यांनीही भाजप ओबीसी मोर्चाच्या बैठकीत महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे.

काय म्हणाले फडणवीस?

"ज्या परिस्थितीत ओबीसी कार्यकाररिणीची बैठक होत आहे ते कारण दुःखद आहे. मंडल आयोगाच्या अंमलबजावणीनंतर महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदा निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय होत आहेत. अशा प्रकारची असवस्था असताना कार्यकारिणीची बैठक आहे. ओबीसी आरक्षण गेलं नसून त्याचा मुडदा पाडला आहे" असं म्हणत आज देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे. या टीकेनंतर आता देवेंद्र फडणवीस यांना धनंजय मुंडेंनी प्रत्युत्तर देत तुम्हाला लाज वाटली पाहिजे असं म्हटलं आहे.

Related Stories

No stories found.