राहुल गांधी आणि उद्धव ठाकरेंवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा, रवी राणांची मागणी

वाचा सविस्तर बातमी नेमकं काय म्हटलं आहे रवी राणा यांनी?
File sedition case against Rahul Gandhi and Uddhav Thackeray, Ravi Rana demands
File sedition case against Rahul Gandhi and Uddhav Thackeray, Ravi Rana demands

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका होत आहे. याबाबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही आपली भूमिका स्पष्ट केली आहे. राहुल गांधींच्या विधानाशी सहमत नसल्याचं उद्धव ठाकरेंनी सांगितले. मात्र अमरावती जिल्ह्यातील आमदार रवी राणा यांनी उद्धव ठाकरे यांच्यावरच टीकास्त्र सोडलं.

उद्धव ठाकरेंवर टीका करताना रवी राणांची जीभ घसरली

उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना रवी राणा यांची जीभ घसरली आहे. राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्याचा उद्धव ठाकरे यांनी समर्थन केल आहे म्हणून उद्धव ठाकरे यांनी चुल्लू भर पाण्यात डुबून मरायला पाहिजे असं वादग्रस्त विधान केलं. तसेच देश विरोधी वक्तव्य करणारे राहुल गांधी आणि त्यांना समर्थन देणारे उद्धव ठाकरे या दोघांवर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करा. अन्यथा मी आंदोलन करेल असा इशारा रवी राणा यांनी दिला. राहुल गांधी उद्धव ठाकरे यांनी देशाचे माफी मागावी अशी ही मागणी त्यांनी केली. मात्र उद्धव ठाकरे यांनी राहुल गांधींच्या वक्तव्याच समर्थन केलेलं नाही तरी देखील सातत्याने उद्धव ठाकरेवर टीका करून चर्चेत राहण्यासाठी आमदार रवी राणांनी वक्तव्य केलं अशा चर्चा रंगू लागल्या आहे.

राहुल गांधी यांनी नेमकं काय म्हटलं होतं?

राहुल गांधी यांनी हिंगोलीतल्या सभेत वीर सावरकर यांचा उल्लेख माफीवीर असा केला. एवढंच नाही तर वीर सावरकर हे ब्रिटिशांकडून पेन्शन घेत होते. त्यांनी तुरुंगातून बाहेर पडण्यासाठी इंग्रजांची माफी मागितली असा दावा केला. तसंच गुरूवारी त्यांनी एकत्र पत्रही दाखवलं त्यामध्ये त्यांनी वीर सावरकर यांनी नेमका काय उल्लेख केला होता ते वाचून दाखवलं. त्यावरून आता महाराष्ट्रात राजकारण रंगलं आहे.

नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे?

वीर सावरकरांचा अपमान झाल्यानंतर तो मुद्दा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला याचा मला आनंद वाटतो. आदरणीय वीर सावरकर यांच्याबाबत आमच्या मनात अत्यंत आदर आणि श्रद्धा आहेच. ती कुणीही पुसायचं ठरवलं तरीही ती पुसता येणार नाही. स्वातंत्र्यवीराबाबत ते प्रश्न विचारत आहेत ज्यांच्या मातृसंस्थेच्या मुलांचा किंवा पिल्लांचा स्वातंत्र्यांशी काहीही संबंध नाही. स्वातंत्र्यवीरांबाबत असं प्रेम व्यक्त करणं हे हास्यास्पद आहे. RSS स्वातंत्र्य लढ्यापासून लांब होते. त्यामुळे त्यांनी याबाबत बोलू नये.

आम्ही एकत्र आलो आहोत कारण...

स्वातंत्र्यवीरांनी ज्या स्वातंत्र्यासाठी त्याग केला ते स्वातंत्र्यच आज धोक्यात आलं आहे. त्यातून बाहेर पडण्याच्या महत्त्वाच्या उद्देशाने आम्ही एकत्र आलो आहोत. त्यामुळे हा बाष्कळपणा त्यांनी बंद करावा आणि आधी स्वातंत्र्यलढ्यात आधी आपल्या मातृसंस्थेचं योगदान काय ते सांगावं. राहुल गांधी जे बोलले ते आम्हाला मान्य नाही. मात्र स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी ज्या स्वातंत्र्यासाठी आपलं आयुष्य वेचलं ते स्वातंत्र्यच आज धोक्यात आलं आहे. तुम्ही ज्या मेहबुबा मुफ्तींसोबत पाट लावला होतात त्या भारतमाता की जय किंवा वंदे मातरम म्हणणार आहेत का? असा खोचक प्रश्नही उद्धव ठाकरेंनी विचारला आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in