बंडखोर आमदारांना अपात्रतेच्या नोटीस दाखल; तात्काळ लेखी उत्तर देण्याचे आदेश

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

विधानसभेच्या बैठकीला गैरहजर राहिलेल्या बंडखोर आमदारांना अपात्रतेसंदर्भात नोटीस पाठवण्यात आली आहे. यात चोपड्याच्या आमदार लताबाई सोनवणे यांनाही नोटीस पाठवण्यात आली आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड पुकारल्यानंतर त्यांच्यासोबत अनेक आमदार गेले आहेत. यात जळगाव जिल्ह्यातील पाच आमदारांचा समावेश आहे. जळगाव जिल्ह्यातील बंडखोर पाच आमदारांपैकी चोपड्याच्या आमदार लताबाई सोनवणे यांनाही यासंदर्भात नोटीस पाठवण्यात आले आहे.

लताबाई सोनवणे यांच्या जळगावच्या निवासस्थानी गेटवर शनिवारी रात्री साडेदहा वाजल्यानंतर ही नोटीस लटविण्यात आली होती. आज सकाळी ही नोटीस लताबाई सोनवणे यांच्या कुटुंबियांना प्राप्त झाली आहेत. नोटीसवर महाराष्ट्र विधानसभा मंडळ सचिवालयाचे प्रधान सचिव यांची स्वाक्षरी आहे.

आमदार लताबाई सोनवणे यांचे पती माजी आमदार चंद्रकांत सोनवणे यांनी याबाबतची माहिती दिली आहे. आज सकाळी नोटीस मिळाली व त्यावर तत्काळ दुसऱ्या दिवशी म्हणजे सोमवारी 27 जून रोजी लेखी अभिप्राय करणेबाबत कळविण्यात आले आहे. दरम्यान बंडखोर पारोळा येथील आमदार चिमणराव पाटील यांना ही नोटीस बजावण्यात आली असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

दरम्यान एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड केल्यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना गटनेते पदावरुन काढले होते. त्यानंतर शिंदे गटाने आमच्याकडे 37 आमदारांपेक्षा जास्त आमदारांचा सपोर्ट आहे म्हणत आमदरांच्या सहीनिशी एक पत्र विधानसभा उपाध्यक्षांना पाठवले. शिवसेनेच्या घटनेमध्ये अशी तरतुद आहे की असे निर्णय पक्षप्रमुखांना घेण्याचा अधिकार आहे.

त्यानंतर शिवसेनेने (Shivsena) 16 बंडखोर आमदार निलंबीत करण्याचे पत्र उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांना दिले. झिरवाळांनी या 16 आमदारांना चैौकशीला हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. परंतु उपाध्यक्षांवर अविश्वास प्रस्ताव आणला असताना त्यांना चौकशी करण्याचे अधिकार नाहीत असं म्हणंण एकनाथ शिंदे गटाचे आहे. दरम्यान 15 बंडखोर आमदारांना केंद्र सरकारने CRPF सुरक्षा दिली आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT