"बैल नेहमी जोडीने येतो... तो पण नांगरासकट" फडणवीसांचा 'मुळशी पॅटर्न' चर्चेत!
Former CM Devendra Fadnavis says Mulshi pattern Movie dialogue in Pimpri chinchwad Bull cart Race

"बैल नेहमी जोडीने येतो... तो पण नांगरासकट" फडणवीसांचा 'मुळशी पॅटर्न' चर्चेत!

जाणून घ्या आणखी काय म्हणाले आहेत देवेंद्र फडणवीस?

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज मुळशी पॅटर्न सिनेमातला डायलॉग म्हटला आहे. तो डायलॉग चांगलाच चर्चेत आहे. मुळशी पॅटर्नमधला राहुला जसं म्हणतो की बैल कधीच एकटा येत नाही जोडीने येतो आणि तोपण नांगरासकट. हाच डायलॉग आज फडणवीसांनी म्हटला आहे. ज्याची चर्चा राज्यभरात रंगली आहे.

देवेंद्र फडणवीस आज पिंपरी चिंचवडमध्ये होते. तिथे हा डायलॉग म्हणत देवेंद्र फडणवीसांनी तुफान बॅटिंग केली. पिंपरी चिंचवड या ठिकाणी देवेंद्र फडणवीस उपस्थित झाले होते. त्यावेळी त्यांनी खास पोशाख घालत या ठिकाणी उपस्थिती दर्शवली आणि मुळशी पॅटर्नचा डायलॉग ऐकवला. देवा, शंभू, हिरा, पक्षा, लेझर, मंगुळा, बादल, सर्ज्या, बाल्या सोन्या अशी बैलगाडा शर्यतीत भाग घेतलेल्या बैलांची नाव ऐकवत त्यांनी आपल्या भाषणाला सुरूवात केली.

देवेंद्र फडणवीस या ठिकाणी गर्दीला संबोधित करताना म्हणाले की मुळशी पॅटर्न पाहिलात की नाही? त्यात डायलॉग आहे तो माहित आहे ना? बैल कधी एकटा येत नाही जोडीने येतो आणि ते पण नांगरासकट. हा नांगर बैलगाडा शर्यतीला विरोध करणाऱ्यांसाठी आहे असाही टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला. बैलगाडा शर्यत सुरू झाली ते महेश लांडगे यांचं श्रेय आहे. अनेकदा बंदी उठली आणि परत बंदी आली. मात्र सर्वोच्च न्यायलयात त्यांनी सांगितलं की बैल हा पळणारा प्राणी आहे, त्यानंतर शर्यत सुरू झाली. आता काहीही झालं तरीही शर्यत परत बंद होऊ देणार नाही असंही फडणवीस यांनी म्हटलं आहे.

आमदार महेश लांडगे यांनी भोसरी मतदारसंघात बैलगाडा शर्यतीचा कार्यक्रम आयोजित केला आहे आणि समारोपाच्या कार्यक्रमाच्या माझ्या अंगावर झूल चढवली आहे असं जेव्हा देवेंद्र फडणवीस म्हणाले तेव्हा उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. देशातली सर्वात मोठी बैलगाडा शर्यत भरवल्याबद्दल फडणवीस यांनी महेश लांडगेंचं अभिनंदनही केलं. यावेळी त्यांनी म्हटलेला मुळशी पॅटर्न सिनेमातला डायलॉग सध्या चर्चेचा विषय ठरतो आहे.

महेश लांडगे यांनी या प्रसंगी देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक केलं आहे. सर्व राज्यात बैलगाडा शर्यत सुरू झाली ती देवेंद्र फडणवीस यांच्यामुळेच. २०१७ पर्यंत कुठल्याच सरकारने आमच्यासाठी पुढाकार घेतला नव्हता. मात्र २०१७ ला देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते, त्यावेळी जो कायदेशीर खर्च होता तो फडणवीस सरकारने केला, असं म्हणत महेश लांडगे यांनी फडणवीस यांचं कौतुक केलं आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in