'शिवसैनिकांची अक्कल गुडघ्यामध्ये असते'; राणांवर टीका करताना खैरे काय बोलले?

नवनीत राणांनी रुग्णालयातून बाहेर आल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका केली होती, त्यानंतर खैरेंनी माध्यमांशी बोलताना हे विधान केलं...
'शिवसैनिकांची अक्कल गुडघ्यामध्ये असते'; राणांवर टीका करताना खैरे काय बोलले?

अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा आणि त्यांचे आमदार पती रवी राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या मातोश्री येथील निवासस्थानाबाहेर हनुमान चालीसा म्हणण्यावरुन चांगलाच वादा झाला. राजद्रोहाच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या राणा दाम्पत्याला कोर्टाने नुकताच जामीन मंजूर केला. यानंतरही शिवसेना आणि राणा दाम्पत्यात वादाचे खटके उडताना दिसत आहेत. अशातच शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी नवनीत राणांवर टीका करताना शिवसैनिकांची अक्कल गुडघ्यात असते असं वक्तव्य करत राणांना इशारा दिला आहे.

बीड दौऱ्यावर असलेल्या चंद्रकांत खैरेंनी राणांवर टीका केली. "नवनीत राणांबद्दल मी काहीही बोलणार नाही, कारण मी काही बोललो तर मग ते परत व्हायरल होईल. मला त्या बाईचा राग आलेला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल ती बाई काहीही बोलते आहे. ती बाई कशी होती हे आम्हाला सगळं माहिती आहे. आम्ही शिवसैनिक, आमच्या डोक्यात वेगळी अक्कल असते, गुडघ्यामध्ये आमची अक्कल असते. आम्ही जाऊन काहीही करु शकतो", असं खैरे म्हणाले.

उद्धव ठाकरे हे आमचे प्रमुख आहेत, आमचे दैवत आहेत. त्यांच्याबद्दल काहीपण बोलायचं म्हणजे काय, कोण सहन करेल? ती बाय काय होती, कसंकाय माहिती आहे ना सगळं. जातीचं खोटं प्रमाणपत्र आणून निवडणूक लढवली. आता भाजपचा पाठिंबा आहे म्हणून. पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसने पाठिंबा दिला होता. आता राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास आघाडीत आली तर ती तिकडे गेली. पक्ष बदलणारी ती बाई आहे", असा घणाघात चंद्रकांत खैरे यांनी केला.

"राजकारणाची प्रचंड प्रमाणात पातळी घसरत आहे. आमचे जुने मित्र आहेत, माजी मुख्यमंत्री ते बुद्धिवादी आहेत. पण फक्त मोठमोठे भाषण करत असतात. आम्ही त्यांना सांगू इच्छितो, शांत राहा ना जरा. उद्धव ठाकरेंना जरा काम करु द्या. उद्धव ठाकरे त्यांच्याकडे लक्षच देत नाहीय. त्यांचं कामाकडे लक्ष आहे. काम एकीकडे सुरुय. आम्ही जनतेची सेवा करतोय. महाराष्ट्र एक नंबरला आणण्याचं ध्येय मुख्यमंत्र्यांचं आहे. ते आम्ही नक्की आणू, असं चंद्रकांत खैरे म्हणाले. तसेच पक्षातील नेत्यांचे दौरे आता सुरु होतील. कोरोनामुळे दौरे बंद होते. कोरोनामुळे सभा बंद होत्या. पण आता सगळीकडे जोरात सभा आहेत", असंही त्यांनी यावेळी सांगितलं.

Related Stories

No stories found.