
गांधीवादाने देशाची फसवणूक देशाची आणि महाराष्ट्राची फसवणूक केली गेली असं वक्तव्य गुणरत्न सदावर्ते (Gunratna Sadavarte ) यांनी म्हटलं आहे. गांधीवादाने कायम फसवणूक केली. नथुरामजी गोडसे असा उल्लेख यावेळी गुणरत्न सदावर्ते यांनी यावेळी केला. त्यावरून आता नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
काय म्हणाले आहेत गुणरत्न सदावर्ते (Gunratna Sadavarte )
"गांधीवादाने देशाची आणि महाराष्ट्राची फसवणूक केली. नथुरामजी गोडसे यांनी हे सांगितलं होतं की महात्मा गांधी यांनी मरताना हे राम म्हटलं नव्हतं" असं वक्तव्य गुणरत्न सदावर्ते यांनी केलं आहे. तसंच त्यांनी इतरही मुद्द्यांवर भाष्य केलं आहे.
नवाब मलिक हे महाविकास आघाडी सरकारमधले मंत्री आहेत. त्यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप आहेत. त्यांना मंत्रिपदावरून हटवण्यात का आलं नाही? याचं उत्तर मी मागतो आहे. या सरकारला उत्तर द्यावं लागेल. राजकारणात एंट्री करणार का? विचारलं जात होतं ना... त्यासाठी माझं उत्तर आहे. कष्टकऱ्यांचा आवाज बनून मी राजकारणात येणार आहे. कष्टकरी आणि प्रभू रामचंद्रांना मी वंदन करतो असं गुणरत्न सदावर्ते म्हणाले. त्यानंतर उपस्थितांनी जय श्रीरामच्या घोषणा दिल्या.
माझी दुसरी पत्रकार परिषद घेण्याआधी सगळ्या कष्टकऱ्यांना कामावर घ्या. मला महाराष्ट्राचे गृहमंत्री अमित शाह यांना विनंती करायची आहे की देशासाठी तुम्ही चांगलं काम करत आहेत. जय श्रीराम म्हणत मी तुम्हाला वंदन करतो असंही गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटलं आहे. तसंच यावेळी त्यांनी आणि उपस्थितांनी जय श्रीरामच्या घोषणा दिल्या.
गुणरत्न सदावर्ते म्हणाले की विलीनीकरण्याच्या लढ्यात आम्ही माघार घेतलेली नाही. संजय राऊत हे पत्रकार आहेत. आपलं हिंदुत्वाच्या बाबतीत किती प्रेम आहे मला माहित नाही. पण रामजन्मभूमीच्या ऐतिहासिक खटल्यात महाराष्ट्रातले दोन वकील होते ते मी आणि डॉ. जयश्री पाटील होतो हे मी अत्यंत स्वाभिमानाने सांगतो. राम मंदिर व्हावं म्हणून अयोध्येच्या खटल्यात आम्ही वकील होतो हे कुणी विसरू नये असंही म्हणत त्यांनी शिवसेनाला खडे बोल सुनावले आहेत.
आमचा लढा हा मारूतीरायाच्या लढ्यासारखा आहे. सीतामाईला भेटायला जाताना प्रचंड मोठा सागर होता. त्यावेळी मारूतीरायाला आठवण करून देण्यात आली तू महाबली आहेस. तसंच बाबासाहेब आंबेडकर यांनीही सांगितलं आहे की तुम्हीही महाबली आहात. आपल्या संविधानाने आपल्याला तो हक्क मिळवून दिला आहे असंही गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटलं आहे.