'हर हर महादेव'वरुन वाद : आव्हाडांच्या राड्यात मार खाणारा प्रेक्षक कोण? मनसेशी काय संबंध?

हर हर महादेव चित्रपटाबद्दल मनसेनं घेतलेल्या आक्रमक भूमिकेची राज्यात चर्चा
Har Har Mahadev And ncp vs mns
Har Har Mahadev And ncp vs mnsMumbai Tak

ठाणे : 'हर हर महादेव' आणि 'वेडात मराठे वीर दौडले सात' हे दोन्ही चित्रपट सध्या कमलाचे वादात सापडले आहेत. संभाजीराजे छत्रपती यांनी देखील या दोन्ही चित्रपटांच्या कथांवर आणि दृथ्यांवर आक्षेप घेतला. त्यानंतर या भूमिकेचं समर्थन करत राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी ठाण्यात चित्रपटाचा शो बंद पाडला. यावेळी तिकिटाचे पैसे परत मागणाऱ्या प्रेक्षकांना मारहाण करण्यात आल्याचा प्रकार घडला.

जितेंद्र आव्हाड यांचा राडा संपताच काही वेळात मनसेचे ठाण्याचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव तिथं दाखल झाले. त्यांनी बंद पडलेला चित्रपटाचा शो पुन्हा सुरु करण्याचा आग्रह धरला. तसंच एखाद्याला मारहाण करायचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? असा सवाल आव्हाड यांना केला. ते म्हणाले, तुम्ही मंत्री होता ना काही दिवसांपूर्वी? तुम्ही संविधान मानणारे आहात ना? मारहाण करण्याचा अधिकार कोणी दिला तुम्हाला? तसंच जर दम असेल समोरा-समोर या. हे रात्री १० च्या शोमध्ये यायचं आणि पब्लिकला मारायचं ही कोणती पद्धत? असाही सवाल विचारला.

दरम्यान, हर हर महादेव चित्रपटाबद्दल मनसेनं घेतलेल्या आक्रमक भूमिकेची राज्यात चर्चा रंगली आहे. मनसेने या आंदोलनात का उडी घेतली? इतिहासाच्या विकृतीकरणाचा आरोप होतं असताना मनसेने या चित्रपटाला का पाठिंबा दिला? शिवाय मार खाणारा तो प्रेक्षक कोण होता? त्याचे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे, अविनाश जाधव यांचे काय संबंध? याबाबत चर्चा झडू लागल्या आहेत. यातच आता एक नवीन माहिती समोर येत आहे.

मार खाणाऱ्या या प्रेक्षकाचे नाव परिक्षित विजय दुर्वे असं नाव आहे. दुर्वे यांना ठाण्यातील प्रसिद्ध उद्योजक म्हणून ओळखलं जातं. दुर्वे हे मनसेचे कार्यकर्ते असल्याचीही माहिती आहे. त्यांच्याच वडिलांचे चित्र राज ठाकरे यांनी काढले होते. तसेच दुर्वे हे ठाणे-पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांचा मित्र असल्याचे समोर येत आहे. त्याचवेळी दुर्वे आणि मनसे यांच्या संबंधाबाबत अविनाश जाधव यांनी दुजोरा दिला आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in