''हिंदुत्व, दाऊद इब्राहिम, मुंबई बॉम्बस्फोट संदर्भात निर्णय घेण्यास आघाडी सरकार असमर्थ ठरले''

हिंदुत्व, दाऊद इब्राहीम तसंच मुंबई बॉम्बस्फोटाच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरेंवर एकनाथ शिंदेंनी टीका केली
Eknath Shinde
Eknath Shinde @ANI

मुंबई: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेना पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर एकापाठोपाठ एक जोरदार हल्ला चढवला आहे. 2019 मध्ये शिवसेना-भाजप (Shivsena-BJP Alliance) एकत्र निवडणुका लढले, मात्र शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत सरकार स्थापन केल्याचे एकनाथ शिंदे म्हटले.

पण जेव्हा-जेव्हा हिंदुत्व, दाऊद इब्राहिम, मुंबई बॉम्बस्फोट, असे अनेक मुद्दे समोर आले तेव्हा महाविकास आघाडी सरकार निर्णय घेण्यास अपयशी ठरले. सरकारच्या लोकांना कोणताही निर्णय घेता आला नाही. नवीन सरकार स्थापनेबाबत मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, आम्ही कोणतेही बेकायदेशीर काम करत नाही. लोकशाहीत कायदे आणि नियम असतात, त्यानुसार काम करावे लागते.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, आज आपल्याकडे बहुमत आहे. आमच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) गेलेल्यांनाही न्यायालयाने फटकारले आहे. ते म्हणाले, “आम्ही निवडणूक जिंकतो तेव्हा आमच्या मतदारसंघातील मतदारांना विकासाच्या अपेक्षा असतात, पण आमचे आमदार काम करू शकले नाहीत आणि निधीची कमतरता होती. याबाबत वरिष्ठांशी बोलूनही यश मिळाले नाही. त्यामुळेच आमच्या 40-50 आमदारांनी ही भूमिका घेतली.

शिवसेनेला (Shivsena) आघाडी सरकारमध्ये लाभ मिळत नव्हता - शिंदे

शिंदे म्हणाले, “आम्ही महाविकास आघाडीत बसलो आहोत, त्याचा फायदा नाही तर तोटा होत होता, हे मी अनेकदा सांगितले आहे. उद्या निवडणूक कशी लढवायची या चिंतेत आमचे आमदार आहेत. नगर पंचायत निवडणुकीत आम्ही चौथ्या क्रमांकावर गेलो. म्हणजे सरकारचा शिवसेनेला फायदा होत नव्हता. यानंतर बाळासाहेब ठाकरे यांची हिंदुत्वाच्या मुद्द्यावरची भूमिका, हिंदुत्वाचा विचार पुढे नेण्याचा निर्णय घेतला. आमच्या जवळपास 50 आमदारांनी एकाच वेळी अशी भूमिका घेतली तर यामागे मोठे कारण असेल. याचा विचार व्हायला हवा होता."

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) मोठ्या मनाने उपमुख्यमंत्री झाले : शिंदे

देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक करताना शिंदे म्हणाले, "देवेंद्र फडणवीस मोठ्या मनाने उपमुख्यमंत्री झाले, पण पक्षाचा आदेश आला की ते पक्षाचा आदेश पाळतात. त्यांनी माझ्यासारख्या बाळासाहेबांच्या कार्यकर्त्याला मुख्यमंत्रीपदावर बसवले. मी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शह आणि भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांचे आभार मानतो. ते म्हणाले, “भाजप सत्तेसाठी काहीही करते, असे लोकांना वाटले होते, परंतु या 50 लोकांनी हिंदुत्वाची भूमिका घेतल्याचे त्यांनी सर्व देशवासीयांना सांगितले आहे. त्यांचा अजेंडा हिंदुत्वाचा आहे, विकासाचा आहे, त्यांना साथ दिली पाहिजे. त्यांनी आम्हाला पाठिंबा दिला."

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in