Uddhav Thackeray : एकनाथ शिंदेंच्या बंडामागे मी नाही, मी माझ्या पाठीत वार का करू?

ऋत्विक भालेकर

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतलं आत्तापर्यंतचं सगळ्यात मोठं बंड पुकारलं आहे. त्यामुळे महाराष्ट्रात राजकीय भूकंप आला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात राजकीय पेच निर्माण झाला आहे. तसंच शिवसेना पक्ष फुटीच्या उंबरठ्यावर आहे. अशी सगळी परिस्थिती निर्माण झालेली असताना हे बंड उद्धव ठाकरेंनी घडवलंय का? ही चर्चा सुरू झाली आहे त्याबाबत उद्धव ठाकरे पहिल्यांदाच स्पष्टीकरण दिलं आहे.

काय म्हणाले आहेत उद्धव ठाकरे?

एकनाथ शिंदे यांच्याकडे भाजपमध्ये जाण्याशिवाय काही पर्याय उरणार नाही. काहीही कलाकारी करू द्या यांच्यासोत गेलेले आमदार खुश नाहीत. ते आजही फोन करत आहेत. आज यांच्यातले आमदार आहेत ते उद्या निवडून येतील का? हे जे बंड झालं आहे त्यामागे मीच आहे असं बोललं जातं आहे. मी त्यावर हे स्पष्ट सांगू इच्छितो बंडाच्या मागे मी नाही. शिवसेना प्रमुखांची अवलाद आहे. मीच माझ्या पाठीत वार कशाला करेन? असा प्रश्न उद्धव ठाकरेंनी विचारला आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

आणखी काय म्हणाले आहेत उद्धव ठाकरे?

राजकारणात आपण पुढे आलो आहोत. मात्र आत्ताचा प्रसंग वेगळा आहे. मी शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त बोललो होतो की मला दगा देणारे नकोत. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन पक्षांकडून दगा दिला जाईल, खंजीर खुपसतील म्हणत होते. मात्र शरद पवार साहेब, सोनियाजी हे आज आपल्या पाठीशी आहेत मात्र जवळचे सोडून गेले आहेत असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

ADVERTISEMENT

शिवसेना हा एक विचार आहे हा संपवण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. देशाच्या राजकारणात भाजपचं हिंदुत्व अस्पृश्य होतं तेव्हा त्यांना शिवसेनेने सोबत घेतलं. आपला हात धरून हे पुढे आले. तेव्हा हिंदुत्वाच्या मुद्द्यावर भाजपला हाक दिली होती, त्याची फळं आम्ही भोगतो आहे. एकनाथ शिंदे आणि बंडखोर आमदार यांना या सगळ्याचे परिणाम भोगावे लागणार आहेत असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

ADVERTISEMENT

माझ्या प्रकृतीचं, आजारपणाचं कारण शोधून तुम्ही जर बंड करणार असाल ते अयोग्य आहे. या बंडाच्या मागे मी आहे असा संदेश पोहोचवला जातोय. मी शिवसेनेमध्ये गद्दारी करणार नाही. आज जर वेगळा तुम्ही गट स्थापन केला आणि नंतर तो फुटला तर तुमची आमदारकी रद्द होणार. त्यामुळे शिवसेनाही संपेल आणि तुम्हीही संपाल. आज जे निवडून आले आहेत त्यांना पुन्हा निवडून येणं शक्य नाही.

उद्धव ठाकरे म्हणाले की, सर्वसामान्य व्यक्ती निवडून येतील अशा ठिकाणी आताच्या आमदारांना शिवसैनिकांनी निवडून दिलं. त्या ठिकाणी तुमचा हक्क असतानाही तुम्ही माझा आदेश पाळला आणि त्यांना निवडून दिलं. ज्यांना निवडून दिलं ते आपल्याला सोडून गेले. आजही तुम्हाला सांगतोय की पक्ष चालवायला मी जर योग्य नसेल तर मला तसं सांगा, मी हे पद सोडतो. शिवसेना हा विचार आहे, तो विचार भाजप आता संपवायला निघाला आहे. त्यांना हिंदुत्वाच्या विचारामध्ये भागिदार नको आहे, असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT