“मी नाराज नाही, २०२४ च्या तयारीला लागले आहे” नाराजीच्या चर्चांना पंकजा मुंडेंकडून पूर्णविराम

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

रोहिदास हातागळे, प्रतिनिधी, बीड

मी नाराज नाही, मी कुणावर नाराज होऊ? माझी मीडियाला हात जोडून विनंती आहे कोणत्याही आमदारांची यादी आली की त्यात माझं नाव का नाही? या बातम्या चालवणं थांबवा. मी कुणावरही नाराज नाही. मी कुणावर नाराज असण्याचं काही कारणच नाही. संघटना सर्वात आधी ही शिकवण आमच्या पक्षाची आहे आणि ती मला मान्य आहे असं भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी सावरगावरच्या दसरा मेळाव्यात म्हटलं आहे.

आणखी काय म्हणाल्या आहेत पंकजा मुंडे?

मी कुणावरही नाराज नाही. मी २०२४ च्या तयारीला लागले आहे. मला पक्षाने जर २०२४ ला निवडणुकीचं तिकीट दिलं तर पक्षासाठी जोमाने लढेन. तसंच मी तुम्हाला विचार देऊ शकते तेच द्यायला आले आहे. मला कोणत्याही पदाची अपेक्षा नाही. आपला पक्ष मोठा झाला पाहिजे हे ध्येय प्रत्येकाने समोर ठेवा असंही पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

मी तुम्हा सगळ्यांपुढे नतमस्तक

आज दसऱ्याचा शुभदिवस आहे त्यामुळे दसऱ्याच्या निमित्ताने भगवान भक्तीगडावर आणि सीमोल्लंघनासाठी कानाकोपऱ्यातून आलेल्या लोकांपुढे नतमस्तक आहे असं म्हणत भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी त्यांचं भाषण सुरू केलं. राज्याच्या प्रत्येक गावातून आलात म्हणून मी नतमस्तक होऊन तुमचं दर्शन घेतलं आहे. नवरात्रीचे नऊ दिवस देवीची विविध रूपं पाहण्यास मिळतात. या सर्व देवींच्या समोर नतमस्तक होऊन मी मागायचं असेल तर माझ्यासमोर बसलेल्या या कष्टकाऱ्यांना चांगले दिवस येऊ देत, असंही पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे.

आमचा मेळावा चिखलफेक करणाऱ्यांचा नाही-पंकजा मुंडे

आमचा मेळावा चिखलफेक करणाऱ्यांचा नाही, तर चिखल तुडवणाऱ्यांचा आहे. चिखल तुडवणं म्हणजे संघर्ष करणं हे आमच्या रक्तात आहे. ज्यांनी पातळी सोडून माझ्यावर टीका केली त्यांच्यावरही मी काही बोलले नाही. कुणावरही वैयक्तिक आरोप केले नाहीत. कधी संधीचा फायदाही घेतला नाही कारण ते आमच्या रक्तात नाही. चर्चा पसरत असतात. हकीकत को तलाश करना पडता है अफवांये तो घर बैठे बैठे मिल जाती है असंही वक्तव्य पंकजा मुंडे यांनी केलं. माझ्याकडे बसायला द्यायला खुर्च्या नव्हत्या. तुमच्यासाठी खुर्च्या लावण्याची माझी ऐपत नाही असं म्हणत शिंदे-ठाकरेंना टोलाही पंकजा मुंडे यांनी लगावला. तसंच तुम्ही जमिनीवर बसणं गोड मानलंत मी तुमचे सगळे उपकार मानते असंही पंकजा मुंडे म्हणाल्या.

ADVERTISEMENT

जोडे उचलणाऱ्यांचं नाव होत नाही संघर्ष करणाऱ्यांचं होतं

संघर्ष कुणाला चुकला आहे मला सांगा? कुणाचे जोडे उचलणाऱ्यांचं कधीच नाव झालेलं नाही. छत्रपती शिवरायांसारखाच महाराष्ट्रात भगवान बाबांसारखा संत होऊन गेला. भगवानबाबांचा शिष्य गोपीनाथ मुंडे. त्यांच्या पोटी मी जन्म घेतला आहे मी संघर्ष नाकारत नाही मी संघर्ष नाकारूच शकत नाही. छत्रपती शिवरायांची गोष्ट काय ? छत्रपती शिवरायांना शेवटपर्यंत संघर्ष सुटला नाही. भगवान बाबांनाही तसाच संघर्ष करावा लागला. भगवानगड स्थापन करावा लागला पण त्यांनी संघर्ष सोडला नाही. आपल्या लोकांना एवढीशी इजा झाली तर ज्याला त्रास होतो तोच खरा राजा झाला.

ADVERTISEMENT

गोपीनाथ मुंडे यांना संघर्ष टळला नाही. ४० वर्षांच्या राजकारणात त्यांना साडेचार वर्षे सत्ता मिळाली. माझ्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचे आणि भगवानबाबांचे संस्कार आहेत. मी संघर्षाला घाबरत नाही. संभाजीराजांचा आदर्श माझ्यासमोर आहे. होळीच्या आगीतून नारळ काढणाऱ्या संभाजीराजांचा आदर्श माझ्यासमोर आहे. संभाजीराजे लहान असताना होळीतून त्यांनी जेव्हा नारळ काढला तेव्हा त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांनी सोन्याचं कडं दिलं होतं. तसं माझं कडं तुम्ही आहात. मी कोणत्याही संघर्षाला घाबरत नाही असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे.

मी थकणार नाही, थांबणार नाही आणि कधीही कुणासमोर झुकणार नाही. मी शत्रुबाबत वाईट बोलत नाही तर ज्या पक्षात मी आहे त्यांच्याबाबत मी वाईट बोलणं शक्यच नाही. मला पद मिळालं नाही म्हणून मी नाराज आहे असं अजिबात नाही. माझ्या समाजाच्या लोकांना पदं मिळाली याचा मला आनंदच आहे असंही पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे. मी नरेंद्र मोदींच्या संस्कारात वाढली आहे. मी पंडित दीनदयाळ उपाध्याय, अटलबिहारी वाजपेयी, नरेंद्र मोदी, अमित शाह यांचाच वारसा चालवते आहे असंही पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT